Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कचऱ्यापासून वीटनिर्मितीचा प्रस्ताव

$
0
0
वाढत्या नागरिकरणामुळे शहराचा विस्तार चारही दिशांना मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महपालिका हद्दीत ३४ नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर सध्या असलेल्या कचऱ्याच्या समस्ये‌त वाढच होणार आहे.

फर्ग्युसन कॉलेजची स्वायत्तता अडचणीत

$
0
0
कॉलेजच्या स्थापनेपासूनची कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने फर्ग्युसन कॉलेजला स्वायत्तता मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. कॉलेजच्या स्वायत्ततेच्या प्रस्तावाला पुणे विद्यापीठाने यापूर्वीच परवानगी दिली असली, तरी या कागदपत्रांची पूर्ततेपोटी कॉलेजची स्वायत्तता अडकून राहिल्याचे गुरुवारी समोर आले.

‘आयटीआय’साठी दोन लाख अर्ज

$
0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत दोन लाख ३३ हजार ४९५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील एक लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी आपले अर्ज कन्फर्मही केले आहेत.

विद्यार्थिनीचा व्हिसेरा राखून ठेवला

$
0
0
विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण पोस्टमार्टेममध्येही स्पष्ट न झाल्याने, तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, तपासाअंती संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

इंजिनीअरिंगचे निकाल दोन दिवसांत

$
0
0
इंजिनीअरिंगच्या तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल येत्या दोन दिवसांत जाहीर होणार आहेत. इंजिनीअरिंगच्या निकालामधील नानाविध त्रुटींच्या पार्श्वभूमीवर, या त्रुटींची पडताळणी करूनच अंतिम निकाल जाहीर होणार असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

पुणेकरांना ‘बॅनरजीं’चे अजीर्ण

$
0
0
विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपला चेहेरा पुणेकर मतदार आणि पक्षश्रेष्ठींपुढे झळकवण्यासाठी विविध पक्षांमधील ‘बॅनरजी’ मंडळी सज्ज झाली आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये जळी-स्थळी शेकडो फ्लेक्स झळकू लागल्याने पुणेकरांना दिवसरात्र या माननीयांच्या छबीचे दर्शन घडू लागले आहे.

१ ऑगस्टपासून मतदारनोंदणी

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ ऑगस्टपासून मतदार नोंदणी मोहीम सुरू होणार असून, १ जानेवारी २०१४ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे.

कसब्यात ‘बदल हवाय?’

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहराच्या मध्यवस्तीत ‘बदल हवाय?’ अशा आशयाचे फलक जागोजागी लागले असून, त्यावर दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधणाऱ्यांची संख्या वाढल्याने कसब्यातील संभाव्य उमेदवारांमध्ये चलबिचल झाली आहे.

मुलींना हवं घराजवळचं कॉलेज

$
0
0
‘मुलींचे शिक्षण दहावीनंतर अर्धवट राहू नये, असे शिक्षण विभागाला वाटत असेल तर त्यांनी अकरावीला मुलींना घराच्या जवळील कॉलेजमध्ये प्रवेश दिला पाहिजे. एवढेच नव्हे तर प्रवेश प्रक्रियेत ८० ते ९० टक्के जागा या स्थानिक विद्यार्थ्यांसाठीच राखीव असाव्यात,’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

मान्सून जोरात

$
0
0
पुण्यासह राज्याच्या विविध भागांत सध्या सक्रिय झालेल्या मान्सूनचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटरीऑलॉजी’ने (आयआयटीएम) वर्तवली आहे.

एज्युकेशन लोन’ गेले कोटींवरी

$
0
0
केवळ मास्टर्ससाठीच नाही, तर डिग्रीसाठीही ‘अमेरिका कॉलिंग’ असल्याचा ट्रेंड शहरात दिसू लागला आहे. त्यासाठी १५-२० लाखांपर्यंत नव्हे, तर तब्बल ८० लाख ते सव्वा कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज १२ ते १३ टक्के व्याजदराने घेऊन शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्याकडे विद्यार्थी आणि पालकांचा कल दिसतो आहे, हे विशेष!

धरण क्षेत्रात वाढला पाऊस

$
0
0
पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये गेल्या २४ तासांत जवळपास ०.७५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वाहून आले आहे. हे पाणी पुणे शहराला किमान वीस दिवस पुरेल एवढे आहे. धरण क्षेत्रातील पावसामुळे खडकवासला प्रकल्पाचा जलसाठा २.४७ ‘टीएमसी’वर पोहोचला आहे.

स्फोटातील संशयिताचे स्केच तयार

$
0
0
फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवणारे दोघे संशयित बाजीराव रोडवर तुळशीबागेजवळील एका ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) यातील एका संशयिताचे स्केचही काढले असून, या दोघा दहशतवाद्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.

‘दिवाकर’ ११ केंद्रांवर

$
0
0
‘नाट्यसंस्कार कला अकादमी’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाकर नाट्यछटा स्पर्धा यावर्षी ११ केंद्रांवर होणार आहे.

‘केटूएस’ स्पर्धेच्या नोंदणीला प्रतिसाद

$
0
0
तेराहून अधिक टेकड्यांचं आव्हान, चिखलराडा आणि पावसात सिंहगडाचा माथा गाठण्याचं आव्हान, हे चॅलेंज कॉलेजियन्सनं स्वीकारलं आहे. येत्या २ आणि ३ ऑगस्टला रंगणाऱ्या केटूएस अर्थातच कात्रज ते सिंहगड स्पर्धेच्या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

खड्ड्याच्या पाण्यात बसून होणार आंदोलन

$
0
0
पावसामुळे धानोरीतील रस्त्यांवर खड्ड्यात जमा होणाऱ्या पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचे श्रेय घेण्यावरून राजकीय नेतेमंडळी आणि पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. समस्यांचे निवारण वेळेत होत नसल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पाणीपुरवठ्यासाठी लोकवर्गणी नको़

$
0
0
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी आता लोकवर्गणी गोळा करण्याची गरज उरलेली नाही. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली १० टक्के लोकवर्गणीची अट राज्य सरकारने रद्द केली आहे. योजनांच्या जास्त किमतीमुळे लोकवर्गणी भरणे ग्रामस्थांना शक्य होत नसल्याने हा निर्णय सरकारने घेतला आहे.

‘पुणे मेट्रो’ आजपासून हरकती-सूचनांच्या यार्डात येणार

$
0
0
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी शहरात मेट्रो प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे, असे स्वप्न सर्वसामान्य नागरिकांना दाखविण्यात आले.

माजी महिला अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

$
0
0
अनधिकृत नियुक्त्या केल्याप्रकरणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटरीऑलॉजी (आयआयटीएम) या संस्थेमधील माजी महिला अधिकाऱ्याविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी त्यांनी कोर्टात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी कोर्टाने फेटाळला.

मोहसीनच्या मेव्हण्याचा दहशतवादात हात नाही

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मोहसीन चौधरी याचा मेव्हणा एजाज सईद अब्दुल कादर शेख हा पुण्यातून गायब होण्याचा बॉम्बस्फोटाशी कोणताही संबंध नाही. त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे तो निघून गेला आहे, असे त्याच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images