Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राज्यातील शेकरूंची गणना होणार

$
0
0
महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेल्या शेकरूची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे पहिल्यांदाच राज्यातील जंगलांमध्ये शेकरूंची गणना करण्यात येणार आहे. आतापर्यंत केवळ भीमाशंकर अभयारण्यापर्यंत मर्यादित असलेली ही गणना राज्यव्यापी करून शेकरूंच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

सीसीटीव्ही खरेदीत घोलमाल

$
0
0
शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावताना शासकीय तसेच निमशासकीय विभागांनी ‘आयपी’ बेस्ड ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा लावण्याचे बंधन शासनाने घातले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत महापालिकेने ‘अॅनालॉग’ पद्धतीचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर, तेरा ते पंधरा हजार रुपयांना विकत मिळणारे हे कॅमेरे तब्बल २५ हजार रुपये या दराने भाड्याने घेण्याचा ‘प्रताप’ महापालिका करत आहे.

२५ लाख लिटर पाण्याची नासाडी

$
0
0
पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील कृष्णानगरमधील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीचा वॉल कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे निखळल्यामुळे सुमारे २५ लाख लिटर पाण्याची नासाडी झाली.

‘बायोमेडिकल वेस्ट’साठी आता २१०० रुपये वार्षिक शुल्क

$
0
0
शहरातील छोटे-मोठे दवाखाने, रक्तपेढ्या, लॅबमध्ये जमा होणारा ‘बायोमेडिकल वेस्ट’ (जैववैद्यकीय कचरा) उचलण्यासाठी देण्यात येणाऱ्या शुल्काबाबत अखेर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे कित्येक महिन्यांपासून पालिकेचा आरोग्य विभाग आणि जनरल प्रॅक्टिशनर्स यांच्यात सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला.

चौकशीला सहकार्य करणार

$
0
0
पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटरीऑलॉजीतील (आयआयटीएम) भ्रष्टाचार प्रकरणी संस्थेच्या उच्चाधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी माध्यमांमधून प्रश्न उठवण्यात आल्यानंतर आयआयटीएमच्या वतीने निवेदन जारी करण्यात आले आहे.

नोटीस मागे घेण्याची मागणी

$
0
0
पुणे मेट्रोच्या प्रकल्प अहवालातील अनेक त्रुटी कायम असतानाच, ‘मेट्रो कॉरिडॉर’मध्ये कोणत्याही नियोजनाशिवाय चार एफएसआय देण्याबाबत पालिकेत जाणीवपूर्वक घाई सुरू असल्याची टीका स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

बेशिस्त वाहतूकदारांवर कारवाई

$
0
0
वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये नियम तोडणाऱ्या १४ हजार ७५८ वाहनचालकांकडून १५ लाख ४४ हजार रुपयांच्या दंडाची वसुली वाहतूक पोलिसांनी केली आहे.

द‌ूषित पाण्याचा धोका

$
0
0
पुणे जिल्ह्याच्या १३ तालुक्यांमधील सरासरी २० टक्के नागरिकांवर गेल्या चार महिन्यांपासून दूषित पाणी पिण्याची वेळ आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

‘एनए’ मुक्तीवर शिक्कामोर्तब

$
0
0
विकास आराखडा प्रसिद्ध झालेल्या महापालिका व नगरपालिका क्षेत्रामध्ये जमिनीच्या बिनशेती (एनए) परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेण्याची अट राज्य सरकारने काढून टाकली आहे. या निर्णयामुळे ‘एनए’ परवानगीसाठी सर्वसामान्यांना होणारा जाच आणि ‘लक्ष्मीदर्शना’च्या प्रकारांनाही आळा बसणार आहे.

सार्वजनिक सुविधांचा बारामतीत अभाव

$
0
0
बारामतीमधील रुई, तांदूळवाडी, देसाई इस्टेट या भागांमध्ये रस्ते, पाणी, पथदिवे, सार्वजनिक स्वच्छतागृहे आदी सार्वजनिक सुविधांचा अभाव आहे. विकासाचा पॅटर्न म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. मात्र, प्रत्यक्षात या भागामधील विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

लष्कराच्या डेपोचे होणार आधुनिकीकरण

$
0
0
खडकी येथील लष्कराच्या सेंट्रल आर्मर्ड फायटिंग व्हेइकल डेपोचे (सीएएफव्हीडी) लवकरच आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या आधुनिकीकरणाच्या प्रकल्पाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेचेही महत्त्व

$
0
0
‘केंद्रात सत्ता मिळविल्यानंतर मित्रपक्षाला राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व जागा जिंकण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना भाजपचा मोठा भाऊ आहे,’ याची जाणीव ठेवावी असे परखड मत पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते खासदार गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केले

पुणे विद्यापीठात लवकरच आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रे

$
0
0
पुणे विद्यापीठामध्ये जर्मनी, अमेरिका आणि कॅनडामधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांची अभ्यास आणि संशोधन केंद्रे लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत केलेल्या शैक्षणिक सामंजस्य करारांच्या माध्यमातून हे साध्य होणार आहे.

कोर्टात ‘सीसीटीव्ही’ बसवा

$
0
0
शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाला घातपाताचा धोका असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने कोर्टाच्या आवारात ‘सीसीटीव्ही’ कॅमेर लावण्यात यावेत अशी मागणी वकिलांकडून वेळोवेळी करण्यात येते आहे. १५ ऑगस्टपर्यंत सीसीटीव्ही लावण्याचे काम पूर्ण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे बार असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे.

फेरीवाल्यांचा आकडा २५ हजारांपर्यंत

$
0
0
शहरातील रस्त्यांवर आणि फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या तब्बल २० हजार फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण पालिकेने पूर्ण केले असून, त्यातील १३ हजार जणांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

वनमंत्र्यांच्या सुचनेनुसार होणार वृक्षांची छाटणी

$
0
0
बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या रस्त्यावरील (बीएमसीसी रोड) वृक्षांची छाटणी करण्याचे पत्र वनमंत्री पतंगराव कदम यांनी पालिकेला दिले असले, तरी स्वयंसेवी संस्थांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे.

पुणे शहरात दोन हजार गुन्हेगार फरार

$
0
0
पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून फरार असलेल्या दोन हजार गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी पुन्हा दिले आहेत.

दुचाकीचोरी ‘टॉप गिअर’मध्ये

$
0
0
फरासखाना पोलिस स्टेशनच्या बाहेर झालेल्या बॉम्बस्फोटासाठी चोरीच्या दुचाकीचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर शहरातील वाहनचोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुणे शहरात गेल्या तीन वर्षात पाच हजार ४०६ दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

साहित्य संमेलनासाठी ‘ट्रॅव्हल पॅकेज’चा फंडा

$
0
0
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येऊ इच्छिणाऱ्या साहित्यप्रेमींच्या सोयीसाठी ‘ट्रॅव्हल पॅकेज’ करण्याची योजना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आयोजक सरहद संस्थेकडून आखण्यात येत आहे

अभ्यासिकेच्या जागेवर ऑफिस थाटले

$
0
0
झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेसाठी शासनाने दिलेल्या जागेवर शिवाजीनगरचे विद्यमान आमदार विनायक निम्हण यांनी आपल्या कुटुंबीयांचे ‘सेव्हन स्टार’ ऑफिस थाटल्याचा आरोप होत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images