Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नानासाहेब शितोळे यांचे निधन

$
0
0
पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर अरविंद ऊर्फ नानासाहेब शितोळे (वय ७५) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी (१८ जुलै) निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून शितोळे यांची राजकीय ओळख होती.

लष्कराच्या वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

$
0
0
लष्कराच्या वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. हा अपघात दापोडीतील सीएमई गेटसमोर शुक्रवारी (१८ जुलै) सकाळी अकराच्या सुमारास झाला. वृषाली सचिन लांडगे (वय ३२, रा. कासारवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

पणन संचालकांच्या कार्यालयाची राज्य सरकारकडून तपासणी

$
0
0
पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी केलेल्या कारवाईची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिकाऱ्यांचा समावेश असणारे तपासणी पथक थेट त्यांच्या कार्यालयात पाठवल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.

लोणावळ्याला वाहतूक कोंडीचा विळखा

$
0
0
पर्यटन आणि वर्षाविहारासाठी नावलौकिक असणाऱ्या लोणावळ्याला नित्याची वाहतूक कोंडी ही लागलेली कीड असून, या कोंडीमुळे पर्यटकांसह स्थानिक संताप व्यक्त करत आहे.

‘मल्टिप्लेक्स’कडील करवसुलीला स्थगिती

$
0
0
करमाफी असताना प्रेक्षकांकडून बेकायदा आकारलेला ६८ कोटी ६५ लाख रुपयांचा करमणूक कर मल्टिप्लेक्सकडून वसूल करण्यास राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्थगिती दिली आहे. महसूलमंत्र्यांच्या या आदेशामुळे कर न भरणाऱ्या सहा मल्टिप्लेक्स मालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याच्या कामाला खीळ बसली आहे.

पुण्यात आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव

$
0
0
महाविद्यालयीन पातळीवर मानाचे पान समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पुणेकरांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या नाटकांच्या महोत्सवाची दुर्मिळ पर्वणी मिळणार आहे.

‘अमी’ची एमबीए सीईटी तीन ऑगस्टला होणार

$
0
0
असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ एमबीए/एमएमएस इन्स्टिट्यूट्स (अमी) या संस्थेतर्फे घेण्यात येणारी एमबीएची प्रवेश परीक्षा ३ ऑगस्टला होणार आहे. राज्य सरकारची एमबीए सीईटी देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश परीक्षा संधी ठरणार आहे.

पुनर्मूल्यांकन शुल्क परत करण्याची मागणी

$
0
0
पुनर्मूल्यांकनामध्ये गुणवाढ झाल्यास पुनर्मूल्यांकनासाठी घेण्यात आलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पुणे विद्यापीठाकडे केली आहे. यासह इतर मागण्यांचे निवेदन शुक्रवारी देण्यात आले.

शुल्क विनिमय समिती स्थापन करा

$
0
0
शहरातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये येत्या १५ ऑगस्टपूर्वी शुल्क विनिमय समित्या स्थापन करण्याचे आदेश पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून देण्यात आले आहेत.

सेनापती बापट रोडवरील ‘ते’ कार्यालय अधिकृतच

$
0
0
‘शिवाजीनगर भांबुर्डा येथील सेनापती बापट रोडवरील जागा महापालिकेने काढलेल्या टेंडर प्रक्रियेतून आम्ही घेतली आहे. जागा वापरण्याबाबतचा ना हरकत दाखला (एनओसी) पालिकेने आम्हाला दिला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे ही जागा लाटल्याचा आरोप आकसाने करत आहेत.

‘SLR’बाबतचा आदेश रद्द करा

$
0
0
स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो (एसएलआर) अंतर्गत सहकारी बँकांतील एकूण ठेवीच्या २५ टक्के रक्कम स्वतःकडे न ठेवता फक्त राष्ट्रीयकृत बँका व गर्व्हमेंट सिक्युरिटीजमध्ये ठेवण्यासंबंधीच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काढलेल्या परिपत्रकाला राज्य सरकारने विरोध दर्शविला आहे.

महासंचालकांकडून तपासाचा आढावा

$
0
0
फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारातील बॉम्बस्फोटाच्या तपासाचा आढावा पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी शुक्रवारी घेतला. पुणे ग्रामीण, सातारा, पुणे शहर, दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मुसळधार नाही, रिमझिम गिरे सावन

$
0
0
गेल्या आठवड्यापासून सक्रीय झालेल्या मान्सूनने पुण्यात शुक्रवारीही हजेरी लावली. शहरात ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस आणि उन्हाचा खेळ दिवसभर सुरू होता. पण या आठवड्यातही मुसळधार पावसाचा अनुभव पुणेकरांना मिळाला नाही.

धरणांत साडेतीन ‘टीएमसी’ पाणीसाठा

$
0
0
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत ३.५३ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने हा साठा आणखी वाढणार आहे. तथापि, धरणसाठ्यांची स्थिती अद्याप चिंताजनकच आहे.

ATM फोडण्याचा अपयशी प्रयत्न उघड

$
0
0
वडगाव शेरी परिसरातील सनसिटी सोसायटीसमोर शुक्रवारी पहाटे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. या सेंटरवर सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नसल्याचे समोर आले आहे.

‘बीआरटी’ नाही, पण बस धावणार

$
0
0
नगर आणि आळंदी रोडवर ‘बीआरटी’साठी निर्माण केलेल्या सुविधांचा वापर अखेर ‘पीएमपी’च्या बस वाहतुकीसाठी केला जाणार आहे. टर्मिनल आणि आयटीएमएससाठी वर्षभर थांबण्याऐवजी उपलब्ध परिस्थितीत हा मार्ग खुला करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

ब्रेलशिक्षणासाठी ‘मुद्रा’चे वरदान

$
0
0
ब्रेललिपी हे दृष्टिहीन व्यक्तींना मिळालेले वरदानच. परंतु, आजही ब्रेल लिपी जाणणाऱ्या डोळस आणि दृष्टिहिनांची संख्या मोजकीच आहे. म्हणूनच अधिकाधिक दृष्टिहीन व्यक्तींना ब्रेल शिकता यावे, यासाठी बिट्स पिलानी संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांनी ‘मुद्रा’ ही यंत्रणा विकसित केली आहे.

मेट्रोसाठी स्वतंत्र कंपनी स्थापणार

$
0
0
मेट्रोसाठी आवश्यक अटींची पूर्तता न केल्याने केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद न झाल्याचा फटका बसल्यानंतर अखेर राज्य सरकारला जाग आली आहे. पुणे मेट्रोसाठी विशेष हेतू प्राधिकरणाच्या (स्पेशल पर्पज व्हेइकल) माध्यमातून स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे.

‘पाणीमाफियां’ची दादागिरी

$
0
0
पाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व टँकरना ‘जीपीआरएस’ यंत्रणा बसविण्याबाबत महापालिकेने काढलेला आदेश धाब्यावर बसवून टँकरचालकांनी मनमानी कायम ठेवली आहे. पालिकेने ‘जीपीआरएस’ची सक्ती केल्यास मंगळवारपासून शहरातील टँकर बंद ठेवण्यात येतील, असा इशारा देत टँकरचालकांनी पाणीचोरीचा उद्योग कायमच ठेवण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.

‘तुमची मौज होते, पण आम्ही जिवाला मुकतो’

$
0
0
पावसाळ्यात घाटांमधील निसर्गसौंदर्य आणि धबधबे पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे घाटरस्ते सध्या मृत्यूचा सापळा बनले आहेत. एकट्या पाबे घाटात दर वर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांत गाडीखाली दोन हजारांहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे साप चिरडले जात आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images