Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पर्वती प्रकल्पाच्या निधीसाठी पालिका आशावादी

$
0
0
शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणाला निधी देण्यास केंद्र सरकारने हात आखडता घेतल्याने खासदार-आमदारांसह मंत्र्यांकडे पाठपुरावा करून मंजूर प्रकल्पासाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न पालिकेने युद्धपातळीवर सुरू केला आहे.

इनामदार हॉस्पिटलवरील कारवाई थांबवली

$
0
0
वानवड‌ी येथील इनामदार हॉ‌स्पिटलवर कारवाई करण्यास गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशामुळे कारवाई न करता हात हलवत परतावे लागले. हॉस्पिटलवर होत असलेली कारवाई तातडीने थांबवावी, यासाठी काही राजकीय मंडळींनी महापालिकेवर दबाव आणल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

शादाबच्या जिद्दीला हवी मदतीची शाबासकी!

$
0
0
फिट्स-मणक्याच्या आजाराने वडिलांची सुटलेली नोकरी, बहिणीचे मानसिक आजारपण, औषधोपचारासाठीचा वारेमाप खर्च, घर चालविण्यासाठी धुणीभांडी करणारी आई… अशा बिकट परिस्थितीवर मात करून शादाब शेखने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९६ टक्के गुण मिळविण्याचा पराक्रम केला.

शहरात आणखी पाणीकपात?

$
0
0
‘शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी धरणातील पाणीसाठा तळाला जात असून, या स्थितीचा अभ्यास करून शहरात पाण्याची आणखी कपात करावी लागेल का, याचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्या‌त बैठक घेण्यात येणार आहे,’ असे महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी सांगितले.

‘डोमिसाइल’ची अट शिथिल होणार?

$
0
0
दहावी आणि बारावीची परीक्षा महाराष्ट्रातून दिली असेल, तर डोमिसाइल सर्टिफिकेटची आवश्यकता नसल्याबाबतचा निर्णय मुंबई हायकोर्टाने मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांबाबत नुकताच दिला आहे. हा निर्णय इंजिनीअरिंगच्या प्रवेशांनाही लागू होणार का, असा सवाल विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

भटकळच्या मदनीसाची रेखाचित्रेे

$
0
0
इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) म्होरक्या यासीन भटकळला स्वारगेट एसटी स्टँडवर तीन वेळा स्फोटके पुरवणारा संशयित ‘इब्राहिम'चे रेखाचित्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) प्रकाशित केले आहे.

‘सुगम संगीत’ मैफल फेसबुकवर

$
0
0
सोशल मीडियावरील पोस्टने सामाजिक शांततेचा भंग झाल्याचे उदाहरण ताजे असतानाच याच फेसबुकच्या माध्यमातून सुगम संगीताचा अभ्यास आणि प्रचारासाठी करण्याचा अभिनव प्रयोग एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या निरंतन आणि प्रौढ शिक्षण आणि विस्तार विभागातर्फे करण्यात येत आहे.

लहान मुलांसाठीही पुणे असुरक्षित

$
0
0
राज्यातील नऊ शहरांच्या तुलनेत पुणे शहरातील जबरी चोरीच्या गुन्ह्यांत वेगाने वाढ होत आहे. सोनसाखळी हिसकावण्याचे गुन्हे या वाढत्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना जबाबदार आहेत. गेल्यावर्षी १८.५ टक्के गुन्हे वाढल्याचे निरीक्षण ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्‍स ब्यूरो’च्या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

पुणे मेट्रो निधीला यंदाही ग्रहण?

$
0
0
शहराच्या मेट्रो प्रकल्पावर राज्यासह केंद्राने मान्यतेचे शिक्कामोर्तब केले असले, तरी त्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापनेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पुणे मेट्रोसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद होण्याची शक्यता धूसर असून, गेल्या वर्षीप्रमाणे तुटपुंज्या बजेटवरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत.

सेवेत दिरंगाई केल्यास ग्राहकांना भरपाई

$
0
0
वीजबिलांसंदर्भातील तक्रारींवर तातडीने पोचपावती...,बिल न मिळाल्याच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण..., आणि थकीत बिलांसाठी खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यासाठी आठ तास...,

बनावट कागदपत्रांद्वारे ५ लाखांची फसवणूक

$
0
0
बनावट कागदपत्रांद्वारे सीटीसी तसेच आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट कार्डद्वारे खरेदी तसेच रोख रक्कम काढून पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या दोघांना येत्या नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यास शाळांना मज्जाव

$
0
0
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आरक्षित गटातील २५ टक्के जागांवरील विद्यार्थ्यांकडून शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यास राज्य प्राथमिक शिक्षण संचालकांनी मज्जाव केला आहे. २५ टक्के जागांवरील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सरकारकडूनच प्रतिपूर्ती केली जाणार असल्याने संबंधित विद्यार्थ्यांकडून गणवेश, पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य आदी बाबींसाठीही शुल्क आकारू नये, असे संचालकांनीच स्पष्ट केले आहे.

अधिकाऱ्यांचे काम आम्ही करायचे?

$
0
0
सलग सात वर्षे सत्तेत असूनही पालिकेतील अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णतः अपयशी ठरल्याचे ‘बीआरटी’च्या नव्या डेडलाइनवरून शनिवारी पुन्हा स्पष्ट झाले. धोरण ठरवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचे काम करू शकतो; पण प्रकल्पाचे नियोजन आणि प्रत्यक्ष कामही आता आम्हीच करायचे का, अशी हतबलता व्यक्त करून अधिकाऱ्यांच्या बेपर्वा कारभारावर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त करण्यात आली.

भुयारी मार्गांची उपयुक्तता तपासा

$
0
0
कोथरूड परिसरात कर्वे रोड आणि पौड रोडवर भुयारी मार्गांची ‘खैरात’ करणाऱ्या पालिकेला सत्ताधारी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनीच घरचा आहेर दिला आहे. प्रस्तावित भुयारी मार्गांच्या उपयुक्ततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याचा आढावा घेण्याच्या सूचना खासदार अॅड्. वंदना चव्हाण यांनी केल्या आहेत.

कामावर हजर व्हा; अन्यथा कारवाई

$
0
0
विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या राज्यातील सरकारी डॉक्टरांनी उद्यापासून (रविवारी) चोवीस तासाच्या आत कामावर हजर व्हावे; अन्यथा त्यांच्याविरोधात ‘मेस्मा’अंतर्गत पोलिस कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या आरोग्य खात्याच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी दिला.

‘आलिया ट्रॅफिक’सी असावे सादर

$
0
0
सिनेमाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आलेली अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता वरुण धवन यांच्यामुळे शनिवारी फर्ग्युसन कॉलेज रोड ‘जॅम’ झाला. ‘नो पार्किंग’मध्ये लावलेली गाडी आणि त्या दोघांच्या चाहत्यांनी घातलेल्या गोंधळामुळे झालेले ट्रॅफिक जॅम पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सुरळीत झाले.

‘पीएमपी’चा तोटा दुपटीने वाढला

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) तोट्यात वर्षभरात दुपटीहून अधिक वाढ झाली असून, १३१ कोटी रुपयांची तूट भरून काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.

बीआरटी वर्षभर दूरच

$
0
0
शहरातील पथदर्शी बीआरटी प्रकल्पात नियोजनाअभावी पालिकेचे हात पोळले असताना, आता अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आळंदी-नगर रोड ‘बीआरटी’च्या वाटचालीला ‘खो’ बसला आहे.

साडेचौदा लाखांची फसवणूक

$
0
0
ट्रकच्या इंजिन आणि चासी क्रमांकात खाडाखोड करून त्याची परस्पर विक्री करून सुमारे साडेचौदा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

३४ संस्थांतील प्रवेशास मनाई

$
0
0
तंत्रशिक्षणाचा डिप्लोमा अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील ३४ संस्थांचे संलग्नत्व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) रद्द केले असून, या संस्थांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी (२०१४-१५) प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षाचे प्रवेश देऊ नयेत, अशी सूचना राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) विभागीय सहसंचालकांना केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images