Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तंबाखू, पानबंदीची अंमलबजावणी होणार कशी?

0
0
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळणे, पान व गुटखा खाण्यास बंदी घालण्याचे धाडस आरोग्य खात्याने दाखविले असले तरी प्रत्यक्षात या धोरणाची अंमलबजावणी कशी आणि कोण करणार यावर मात्र सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

सध्याच्याच कंत्राटदाराचा शाळांमध्ये पोषण आहार

0
0
सेंट्रलाइज्ड किचन करण्याबाबतचा आदेश येईपर्यंत पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या शाळांमधील मुलांना सध्याच्या कंत्राटदारामार्फतच शालेय पोषण आहार पुरविण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे बोर्डाच्या शाळेतील मुलांच्या शालेय पोषण आहाराचा प्रश्न मार्गी लागला आहे.

एक्स्प्रेस-वेवरील अपघातात १ ठार

0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ स्विफ्ट कारच्या अपघातात एक ठार दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास झाला आहे.

शास्ती करावरून घरचा ‘आहेर’

0
0
अनधिकृत बांधकामांबाबत राज्य सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत शास्ती कर भरू नये, असा ठराव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शुक्रवारी (चार जुलै) झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाकडून पाठविण्यात येणाऱ्या नोटीसा बंद करा असे आदेशही महापौर मोहिनी लांडे यांनी दिले.

येरवड्यातील ‘स्काय वॉक’वर अंधाराचे साम्राज्य

0
0
विश्रांतवाडी चौकात सहा कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या स्काय वॉकच्या (पादचारी पूल) छतावर दिवेच लावले नसल्याने रात्री या पुलावर अंधार होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी महिला, लहान मुलांना या पुलावरून जा-ये करणे धोकादायक झाले आहे.

अबब! दीडशे विद्यार्थ्यांचा बावधनमध्ये एकच वर्ग

0
0
शाळांची पटसंख्या अधिक असूनही अनेक शिक्षक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या दिमतीला असल्याने एकाच वर्गात दीडशेहून अधिक विद्यार्थी बसवण्याची वेळ पालिकेच्या काही शाळांवर आली आहे.

डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सेसकडून उपचार

0
0
‘गेल्या चार तीन दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालोय. पण डॉक्टर लोक संपावर गेल्यात. काय दुखलं तर कोणाला बोलावायचं ? शेवटी नर्सेसशिवाय आम्हाला पर्यायच नायं... मग त्याच येतात. गोळी देत्यात. अन सलाइन लावून निघून जात्यात... आम्हाला कोणी विचारायलाच तयार नाय..’.

प्रवेशप्रक्रियेत सुधारणेची संघटनांची मागणी

0
0
अकरावीची ऑनलाइन पद्धत ही तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने राबविण्यात येत असून, याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसत असल्याचा दावा महाराष्ट्र नागरी कृती समिती आणि इतर संघटनांतर्फे गुरुवारी करण्यात आला. या प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या आठ जुलैला दुपारी बारा वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

‘IT’ कर्मचाऱ्यांसाठी ‘PMP’ची व्होल्व्होसेवा

0
0
हिंजवडी आयटी पार्कमधे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि लोहगाव विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा, म्हणून पीएमपी व्होल्व्हो बसेसची सेवा सुरू करणार आहे. मात्र, त्यासाठी पुढील वर्षीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मागासवर्गीय योजनांच्या आढाव्यास वेळच नाही

0
0
पालिकेच्या बजेटमध्ये मागासवर्गीयांच्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली गेली असली, तरी प्रत्यक्षात त्याचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनाच वेळ नसल्याने बुधवारी समितीची बैठकच होऊ शकली नाही.

व्यापाऱ्यांमुळे नव्हे; वायदेबाजारामुळे भाववाढ

0
0
घाऊक आणि किरकोळ व्यापारी साठेबाजी करत नाहीत, वायदेबाजारामुळे बाजारपेठेत भाववाढ होते, त्यामुळे सरकारने योग्य नियम करून कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी केली आहे.

शेतकऱ्यांचा फायदा, ग्राहकांना सुविधा

0
0
कांदा बटाट्याचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये झाल्यामुळे साठेबाजीला पूर्णपणे आळा बसणार आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना कांद्याची विक्री करण्यासाठी घाऊक बाजारपेठेत यावे लागायचे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आत कुठेही कांदा बटाट्याची विक्री करता येणार आहे.

मार्केटयार्ड घाऊक बाजारातील किरकोळ विक्रीचे परवाने रद्द

0
0
गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील घाऊक भुसार बाजारात किरकोळ विक्रीचे परवाने तातडीने रद्द करा, असा आदेश राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांनी बाजार समितीच्या प्रशासनास दिला आहे. या आदेशामुळे बाजारात खळबळ उडाली आहे.

शिवाजीनगर गोदामाची जागा कोर्टाला देण्याची मागणी

0
0
शिवाजीनगर गोदामाची जागा जिल्हा व सत्र न्यायालयाला देण्याचा निर्णय होऊनही अद्याप हस्तांतरण झाले नाही. या जागेचा तात्काळ ताबा देण्यात यावा अशी मागणी पुणे बार असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

स्वारगेट, शिवाजीनगरच्या ‘प्रीपेड’चा ‘थांबा’

0
0
प्रवाशांच्या सेवेसाठी स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकाच्या बाहेर सुरू करण्यात आलेली प्रीपेड रिक्षासेवा बंद पडली आहे. काही दिवसांपूर्वी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी मोठा गाजावाजा करत प्रवाशांच्या सेवेसाठी ही रिक्षासेवा सुरू केली होती.

शिक्षण हे व्यवसाय करण्याचे ‘प्रॉडक्ट’ नाही

0
0
‘शिक्षण हे पैसे कमावण्याचे अथवा व्यवसाय करायचे ‘प्रॉडक्ट’ नाही. प्रशस्त इमारत, अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली संस्था किंवा आकर्षक दिखाऊ जाहिराती देऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देता येत नाही.

‘कट प्रॅक्टिस’च्या विरोधात मेडिकल असोसिएशनचे इंजेक्शन

0
0
कमिशनबाजी करत वैद्यकीय क्षेत्राला बदनाम करणाऱ्या ‘कट प्रॅक्टिस’च्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने पुन्हा मोहीम उघडली आहे. ‘कट प्रॅक्टिस’ करणाऱ्या डॉक्टरला ‘आयएमए’मधून निलंबित करून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे त्याची तक्रार करण्यात येणार आहे.

उपोषणाला बसलेल्या वृद्ध दाम्पत्याचे अपहरण

0
0
कौन्सिल हॉल कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेले वृद्ध दाम्पत्य गुरुवारी रात्रीनंतर अचानक गायब झाले आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्या‌त आली आहे.

विवाहितेच्या छळाप्रकरणी गुन्हा

0
0
कार आणि दागिने घेण्यासाठी वडिलांकडून पैसे आणावेत म्हणून एका २४ वर्षीय विवाहितेचा वारंवार मानसिक आणि शारिरिक छळ केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तिचा पती आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दमदार पावसासाठी आठ दिवस थांबा…!

0
0
पावसासाठी अनुकूल स्थिती असतानाही वातावरणातील कमी झालेली आर्द्रता ही पाऊस पूर्ण ताकदीने सुरू होण्यातील अडचण ठरते आहे. त्यामुळे पुणेकरांना पावसासाठी किमान आठ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images