Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राज्यात ७१ टक्के कमी पाऊस

0
0
जूनचा संपूर्ण महिन्याबरोबरच जुलैचा पहिला आठवडाही कोरडाच गेल्याने अवर्षणाचे संकट आणखी गहिरे होत आहे. प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे आणखी तीन-चार दिवस तरी पाऊस होणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या चक्रीवादळाची तीव्रता ओसरल्यानंतरच पाऊस परतेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

समस्या धरणातील गाळाची

0
0
नवीन धरणे बांधण्यापेक्षा सध्या देशामध्ये असलेल्या धरणांमधील गाळ काढल्यास त्यांची क्षमता निश्चितच वाढू शकेल. धरणांमधील गाळाच्या समस्येचा घेतलेला हा वेध...

‘महावितरण’ची शेतकऱ्यांना ‘संजीवनी’

0
0
थकबाकीदार कृषिपंपधारकांसाठी ‘महावितरण’ने कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार कृषिपंपधारकांनी मार्च २०१४ अखेर थकित असलेल्या बिलातील ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन हफ्त्यांमध्ये भरली तर, उरलेली ५० टक्के रक्कम आणि व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे.

खेड तालुक्यात वाळूचा उपसा

0
0
खेड तालुक्यात कोरेगाव, बोरदरा व चांदूस गावांच्या हद्दीतील भीमा नदीपात्रात प्रचंड प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. नदीपात्रात अनेक ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. वाळू तस्करांनी वाळूचा उपसा करताना नदीचे दोन्ही काठही पोखरून काढलेले आहेत.

कृपमंच्या परीक्षेसाठी वेगळी प्रश्नपत्रिका

0
0
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने वरिष्ठ स‌हायक पदासाठी हडपसर येथील चंद्रभागा तुपे साधना कन्या विद्यालयात बहु पर्यायी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. कृषी पणन विभागाच्या पश्नपत्रिकेऐवजी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाची प्रश्नपत्रिका मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला.

राजगुरूंच्या जन्मगावीही टपाल तिकिटाची वानवा

0
0
थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर काढण्यात आलेले पाच रुपयांचे विशेष टपाल तिकीट प्रकाशित होऊन तब्बल पंधरा महिन्यांचा काळ लोटला. मात्र, अद्यापही त्यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड तालुक्यातील पोस्ट कार्यालयांमध्ये संबंधित तिकीट उपलब्ध झालेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

वेल्ह्यात ७० टक्के पेरण्या वाया

0
0
पुणे जिल्ह्यातील भरपूर पावसाचा तालुका अशी ओळख असलेल्या वेल्हा तालुक्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेला आहे. संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाच्या आशेने या भागात करण्यात आलेल्या पेरण्यांपैकी ७० टक्के पेरण्या वाया गेल्या आहेत.

‘डीसीबी’ बँकेला ३ लाखांचा गंडा

0
0
सोन्याच्या वेढण्या असल्याचे भासवून त्यावर दोन लाख ९७ हजार रुपयांचे तारण कर्ज घेऊन ढोले-पाटील रस्त्यावरील डीसीबी बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनकर नारायण शेणॉय (वय ५२, रा. कोरेगाव पार्क) यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे.

अवतरले शिवकालीन वैभवाचे साक्षीदार

0
0
भाटघर धरण कोरडे पडल्याने या परिसरातील वेळवंडी नदीच्या तीरावरील धरणात बुडालेल्या शिवकालीन वैभवाच्या अनेक साक्षीदारांचे दर्शन नागरिकांना घडत आहे. राजगडाच्या पूर्वेच्या पायथ्याजवळ वेळवंड गावाजवळील शिवकालीन नागेश्वर शंभू महादेवाचे मंदिर, तसेच या परिसरातील मंदिरे, सभामंडप, बाजारपेठेचे भग्न अवशेष प्रथमच पाण्याबाहेर आले आहेत.

नोकरीचे आमिष दाखवून फसविणाऱ्याच्या कोठडीत वाढ

0
0
पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४७ लाख ८७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेच्या पोलिस कोठडीत ५ जुलैपर्यत वाढ करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

‘नो व्हेइकल झोन’साठी पालिकेने भरपाई द्यावी

0
0
महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आठवड्यातून एक दिवस ‘नो व्हेइकल झोन’ केल्यास त्या दिवशी कमी दरात बससेवा पुरवण्यास पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमप‌ी) मान्यता दिली आहे; मात्र या काळात होणारे ‘पीएमपी’च्या उत्पन्नातील नुकसान महापालिकेने भरून द्यावे, अशी अट पीएमपी प्रशासनाने घातल्याने ‘नो व्हेइकल झोन’ करण्याचे पालिकेचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यता धूसर झाली आहे.

हक्काच्या ‘बायफोकल’ जागांवर पाणी?

0
0
‘टेक्निकल’चे विषय घेऊन दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत आपल्या हक्काच्या ‘बायफोकल’च्या जागांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. ‘बायफोकल’च्या प्रवेशांसाठी यंदा राबविण्यात येत असलेल्या कॉलेज पातळीवरील प्रवेश प्रक्रियेत संबंधित ज्युनिअर कॉलेजांच्या गुणवत्ता यादीत स्थानच न मिळाल्यास, या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ४० टक्के जागांचा पुन्हा एकदा ‘बाजार’च होण्याची शक्यताही यातूनच वर्तविली जात आहे.

डिप्लोमाच्या ३४ संस्थांत प्रवेश करण्यास मनाई

0
0
तंत्रशिक्षणाचा डिप्लोमा अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील ३४ संस्थांचे संलग्नत्व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) रद्द केले आहे. या संस्थांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी (२०१४-१५) प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षांचे प्रवेश देऊ नयेत, अशी सूचना राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) विभागीय सहसंचालकांना केली आहे.

१६ कोटी देणाऱ्या ठेकेदाराकडे कँटोन्मेंटचे लक्ष

0
0
खडकी कँटोन्मेंट बोर्डाला वाहनप्रवेश कराच्या माध्यमातून १६ कोटी रुपये मिळवून देणारी निविदा एका ठेकेदाराने गेल्या आठवड्यात भरली. मात्र, निविदा जाहीर झाल्यानंतर हा ठेकेदार कँटोन्मेंटकडे फिरकलाच नसल्याने बोर्डाचे अधिकारी त्याच्या रस्त्याकडे डोळे लावून बसले आहेत.

चाकणमधील प्लास्टिक कारखान्याला आग

0
0
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये खराबवाडी येथील ड्रीम प्लास्ट इंडिया प्रा.लि. या प्लास्टिकची खेळणी व वस्तू बनविणाऱ्या कारखान्याला रविवारी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

पिंपरीत महापालिकेचे जलतरण तलाव तूर्त बंद

0
0
शहरातील पाणीटंचाईमुळे पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे दहा जलतरण तलाव रविवार (६ जुलै) पासून बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यात पाऊस पडला नसल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी नगरसेवकांच्या पात्रतेचा प्रस्ताव तहकूब

0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नितीन काळजे आणि नगरसेविका विनया तापकीर यांच्या चऱ्होलीतील अवैध बांधकामप्रकरणी त्यांच्या पात्रतेबाबत कोर्टाने मत मागविण्याचा प्रस्ताव शनिवारच्या महापालिकेच्या सभेमध्ये तहकूब करण्यात आला. त्यामुळे मिळाला आहे.

धनगर समाजाला आरक्षणाची मागणी

0
0
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी पुण्यश्लोक अहल्यादेवी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष किसन फसके यांनी केली आहे. धनगर समाज दऱ्याखोऱ्यात, रानोमाळ भटकंती करीत असतो.

भाजपमधील इच्छुकांच्या अपेक्षा कायम

0
0
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघावरील दावा सोडणार नसल्याचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले असले तरी भारतीय जनता पक्षाकडील इच्छुकांच्या अपेक्षा कायम आहेत.

‘पालिका हद्दीत गावांच्या समावेशाला विरोध करा’

0
0
पुणे महापालिकांच्या हद्दीत ३४ नव्या गावांचा समावेश करण्याचा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात येऊ नये, सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र यावे, असा सूर चर्चासत्रामध्ये काढण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images