Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘मान्सून सेल’वर ‘पाणी’

$
0
0
पावसाच्या पहिल्या सरींबरोबरच छत्र्या, रेनकोट, जर्किनच्या ‘मान्सून सेल’च्या जाहिरातींनी गजबजून जाणाऱ्या बाजारपेठेत यंदा शुकशुकाट आहे. पावसाने ओढ दिल्याने ‘मान्सून सेल’चे फलक कुठेही दिसत नसून, पावसाळी साहित्यावर विक्रेत्यांनी मोठी सूट देऊनही ग्राहक खरेदी करत नसल्याचे चित्र आहे.

पैशांना 'भुयारी पाय'

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) अनिश्चिततेमुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असताना, कर्वे रोड आणि पौड रोडवर आता प्रत्येक चौकात भुयारी मार्गांसाठी पैसे खर्च करण्याची तयारी पालिकेने केली आहे.

मराठी सारस्वतांचे सत् श्री अकाल!

$
0
0
मायमराठीची पताका महाराष्ट्राबाहेर नेणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्याशी जिवाभावाचे, अतूट नाते असलेल्या पंजाबमधील घुमान या गावी ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार असून, त्यामुळे महाराष्ट्र व पंजाब यांच्यातील साहित्यबंधांना एक नवा आयाम मिळणार आहे.

वीजग्राहकांना झटका

$
0
0
बँक खात्यातून ‘इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टिम’द्वारे (ईसीएस) विजबिले भरलेल्या हजारो ग्राहकांना आधीच्या महिन्यातील थकबाकीसह वीज बिल आल्याने झटका बसला आहे. या ग्राहकांच्या खात्यातून बिलाची रक्कम कापली गेली असली, तरी बँकेकडून ती ‘महावितरण’कडे न गेल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.

पेट्रोलला ‘काटा’ मारल्यास दाद मागा

$
0
0
पंपावर पेट्रोल भरण्याचे काम सुरू झाल्यानंतर ‘तुम्ही कॅश देणार का, क्रेडिट कार्डने पैसे देणार आहात, तुमच्या गाडीची काच साफ करून देऊ का, गाडीच्या चाकांमध्ये हवा कमी आहे, अशी अनेक कारणे सांगून लक्ष विचलित करण्याचे काम पंपावरील कर्मचारी करत असतात.

‘GPRS’शिवाय पास देण्यास बंदी

$
0
0
पालिकेच्या टँकर भरणा केंद्रावरून पाणी घेणाऱ्या खासगी टँकरला जीपीआरएस यंत्रणा बसविल्याशिवाय टँकर चालकांना पाणी भरण्याचे पास न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

बोगस डॉक्टरवर खराडीत कारवाई

$
0
0
वैद्यकीय शाखेची पदवी नसतानाही मूळव्याधावर आयुर्वेदाचे उपचार करणाऱ्या खराडीतील एका बोगस महिला डॉक्टरविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली. श्यामल सुशील विश्वास (रा. गल्ली क्रमांक २, तुळजाभवानीनगर, खराडी, मूळ कुशीयामोरा, पो, गोपाळनगर, पश्चिम बंगाल) असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे.

भाटघरमध्ये फक्त ३ टक्केच पाणीसाठा

$
0
0
नीरा खोऱ्यातील भाटघर, निरा देवघर, वीर या तीन धरणांत अनुक्रमे फक्त तीन, दीड व चार टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी दोन दिवसांपूर्वी ३ टक्के पाणी सोडल्यामुळे भाटघरमध्ये आता फक्त ३ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.

पुणे विभागातील गावागावांत ३२१ टँकरने पाणीपुरवठा

$
0
0
जून महिना कोरडा गेल्याने या वर्षी कमी प्रमाणात जाणवलेल्या पाणी टंचाईचे स्वरुप आता हळूहळू वाढत आहे. पुणे विभागामध्ये सध्या ३२१ टँकरने ३५२ गावे आणि १४७७ वाड्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पुरंदरमध्ये पेरण्या खोळंबल्या

$
0
0
पुरंदर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. इथे दरवर्षी जून महिन्यात खरिपाच्या पेरण्या केल्या जातात, पण संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने उन्हाळ्यासारखी परिस्थिती झाली आहे. अनेक ठिकाणी मशागती झाल्या पण पेरण्या नाहीत अशी केविलवाणी स्थिती निर्माण झाली आहे.

१३ हजार विद्यार्थ्यांनी घेतलेच नाहीत प्रवेश

$
0
0
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत तब्बल १३ हजार १२६ विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश निश्चितीसंबंधीची कोणतीही कार्यवाही पूर्ण केलेली नाही. २७२ विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात आले असून, २३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत.

पुण्यातील २ संस्थांना खासगी विद्यापीठाचा दर्जा

$
0
0
पुण्यातील एमआयटी आणि अजिंक्य डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूटला स्वतंत्र स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. त्यामुळे या दोन नव्या संस्थांना आता अधिकृतरीत्या विद्यापीठाचा दर्जा मिळला आहे.

आयुर्वेद ई - शेड्यूलमधील डॉक्टरांना सरकारचा दिलासा

$
0
0
गोवा आणि कर्नाटक येथील विद्यापीठांमध्ये आयुर्वेदाची पदवी घेतलेल्या राज्यातील दहा हजारांहून डॉक्टरांना आता ‘ई-शेड्यूल’मधून ‘अ१’ या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने जारी केल्याने त्यांना आधुनिक चिकित्सा पद्धती (मॉडर्न मेडिसीन) वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल रखडला

$
0
0
जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. ही परीक्षा होऊन साडेतीन महिने उलटून गेल्यानंतरही निकालाबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.

पाचवी, आठवीच्या टप्प्यावर गुणवत्ता चाचणीचा विचार

$
0
0
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत मूल्यमापनासंदर्भात कठोर नियमावलीचे पालन करताना राज्य सरकार पाचवी आणि आठवीच्या टप्प्यावर काही विषयांसाठी गुणवत्ता चाचणी घेण्याचा विचार करीत आहे.

दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिक्षणापासून राहणार वंचित

$
0
0
मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकातील ‌विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी सर्व शाळांमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देऊन शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात करण्यात आली.

अभ्यासक्रमाचा पत्ता नाही; स्कॉलरशिप द्यायची कशी?

$
0
0
स्कॉलरशिपची परीक्षा चौथी आणि सातवीलाच होणार असल्याचे अंतिम झाल्याने विद्यार्थी आणि पालकांचा जीव भांड्यात पडला असला तरी, चौथीच्या स्कॉलरशिपसाठी अभ्यासक्रमच निश्चित नसल्याने विद्यार्थी-पालक, शिक्षकांमधील संभ्रम कायम राहणार आहे.

दुचाकी चोरल्याप्रकरणी आरोपीची चौकशी

$
0
0
सेव्हन लव्ह ब्रिजखाली पेट्रोलपंपासमोर शंकरशेठ रोडवर पार्क केलेली दुचाकी चोरल्याप्रकरणी खडक पोलिसांनी एकाला अटक केली आहे. खडक पोलिसांनी कोर्टातून प्रोड्युस वॉरंट घेऊन येरवडा जेलमधून आरोपीला तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

लष्कर भरतीचे आमिष दाखवून फसवणूक

$
0
0
लष्करात सुभेदार पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने २० जणांकडून साडेअठ्ठावन्न लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना खडकीमध्ये उघडकीस आली. हर्षवर्धन श्रीकांत भोसले (वय २१ रा. कवठे-महाकाळ, सांगली) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली असून, या प्रकरणी संदीप बळवंत गुरव (रा. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलनिस्सारण प्रकल्पासाठी सल्ला घेणार

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडून बुटी स्ट्रीट येथे मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यापूर्वी बोर्ड महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक सल्ला घेणार आहे. बोर्डाने तयार केलेला प्रकल्प आराखडा आणि एस्टिमेंट याची तांत्रिक तपासणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केली जाणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images