Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वाहनप्रवेशातून साडेआठ कोटी

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या उत्पन्नाच्या प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या वाहनप्रवेश कराचे कंत्राट देण्यात आले असून, यातून बोर्डाला वर्षाला सुमारे साडेआठ कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. वाहनप्रवेश कराच्या दरामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

उसने पैसे मृत्यूनंतर वारसांना देण्याचा आदेश

$
0
0
व्यवसाय करण्यासाठी मित्राला उसने दिलेले पैसे त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या वारसांनी पैसे परत देण्यास नकार दिल्यामुळे एकाला कोर्टात दावा दाखल करावा लागला. मयताच्या मिळकतीत आणि व्यवसायात पत्नीचा हिस्सा असल्यामुळे ती कायदेशीर वारस असल्यामुळे उसने घेतलेले पैसे उर्वरित ५ लाख ५० हजार रूपये सहा महिन्याच्या आत परत करावेत, असा आदेश कोर्टाने दिला. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर. आर. राठी यांनी दिला.

अतिरिक्त शिक्षकांना सेवेत सामावून घेणार

$
0
0
जिल्हा परिषेदच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट संख्येनुसार सप्टेंबर २०१३ मध्ये अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या ७३५ शिक्षकांना आता समायोजित करून घेण्यात येणार असून जिल्हा परिषदेतर्फे त्याची प्रक्रिया या महिनाभरात पूर्ण केली जाणार आहे.

दोषी अधिकाऱ्यांची ‘समज’ देऊन सुटका

$
0
0
रस्त्यांच्या कामांमध्ये चुकीची दरपत्रके तयार करून जादा दराने बिले काढल्याने पालिकेच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून, तज्ज्ञ सल्लागारांना निलंबित करणाऱ्या पालिकेने दोषी अधिकाऱ्यांना मात्र पूर्ण पाठिशी घातले आहे.

पालिकेच्या शाळांमध्ये खासगी शिक्षकांची भरती

$
0
0
महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये खासगी शाळेतील अतिरिक्त शिक्षक घेण्याचा घाट शिक्षण मंडळाने घातल्याचा आरोप केला जात आहे. राज्य सरकारने २०११मध्ये केलेल्या शाळांच्या पटनोंदणीमध्ये तीन विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक हा निकष लावला आहे.

जैवविविधता समिती केवळ सहाशे ग्रामपंचायतींमध्येच

$
0
0
गावातील अथवा शहरातील जैववैविध्याच्या संवर्धनासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणे कायद्याने बंधनकारक आहे; मात्र राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतींपैकी केवळ सहाशे ग्रामपंचायतींनी आतापर्यंत समित्या स्थापन केल्या आहेत.

पणन संचालकांच्या बदलीला ‘मॅट’ची स्थगिती

$
0
0
गैरकारभाराच्या आरोपांवरून मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळावर बरखास्तीची कारवाई करणारे राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांच्या बदलीस महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) बुधवारी स्थगिती दिली. यामुळे राज्य सरकारमधील सत्ताधारी आघाडीला धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

भुयारी मार्गांच्या प्रकल्पांना स्थगिती द्या

$
0
0
‘पादचारी संख्येची पाहणी न करताच उभारण्यात आलेले पादचारी मार्ग ओस पडले असताना, कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावर पुन्हा तीच चूक करून पालिका नेमके काय साध्य करू इच्छित आहे,’ अशी विचारणा स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.

घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक

$
0
0
शहरात रात्रीच्या वेळी घरफोड्या करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून २२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या टोळीने घरफोडीचे २०, तर वाहनचोरीचे तीन गुन्हे केले असल्याचे उघडकीस आले आहे.

जिंती रेल्वे स्टेशनवरील चार पोलिस निलंबित

$
0
0
जिंती रेल्वे स्टेशनवर बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले चौघे पोलिस कर्मचारी रेल्वेवरील दरोड्याच्या वेळी बंदोबस्तावर हजर नव्हते, अशी धक्कादायक माहिती चौकशीदरम्यान उघड झाली आहे. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

४ बांधकाम व्यावसायिकांवर खटले

$
0
0
बांधकामाच्या ठिकाणी पाणी साठवून त्यात ‘एडिसी इजिप्ती’ या डेंगीच्या प्रसार करणाऱ्या डासांची पैदास होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी शहरातील चार बांधकाम व्यावसायिकांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने खटले दाखल केले आहेत.

सुस्थितीत नसलेली शिवनेरी रस्त्यावर सोडणार नाही

$
0
0
शिवनेरी व्होल्व्होच्या संदर्भात कोणतीही तक्रार आल्यास ही बस मार्गावर न सोडण्याचे एसटी ठरवले आहे. एसटीच्या ताफ्यात असणाऱ्या भाडेतत्त्वावरील बस नाकारण्यास एसटीच्या अधिकाऱ्यांनी सुरवात केली असून, गेल्या आठवड्यात चार ते पाच बस नाकारण्यात आल्याचे एसटीच्या सूत्रांनी सांगितले.

पालिकेमुळेच पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट!

$
0
0
शहरातील मैलापाण्याचा फेरवापर होण्यासाठी पालिकेने तयार केलेल्या नियमावलीला सर्वसाधारण सभेचीच मंजुरी मिळाली नसल्याने शंभर टक्के मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यात पालिकेला अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही होत असून, शहराला सातत्याने पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे.

मुंबईत तडाखा, पुण्यात शिडकावा

$
0
0
राज्याच्या किनारपट्टी भागात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून, कोकणासह मुंबईला बुधवारी जोरदार पावसाने तडाखा दिला. सांताक्रूझ येथे १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. किनारपट्टीबरोबरच दक्षिण मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. तर पुणेकरांना मात्र हलक्या शिडकाव्यावरच समाधान मानावे लागले.

ठेकेदाराला १५ लाखांचा दंड

$
0
0
सातारा रोडवरील बालाजीनगर येथील उड्डाणपुलाचे काम महापालिकेने ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला प्रतिदिन दोन हजार रुपये या हिशेबाने काम पूर्ण होईपर्यंत १५ लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. या उड्डाणपुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने ही कारवाई केली जात आहे.

‘पीएमपी’च्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव लाल फितीत अडकला

$
0
0
विविध घटनांमध्ये ‘पीएमपी’च्या बसचे झालेले एक कोटी ८४ लाख रुपयांचे नुकसान वसूल करून देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला प्रस्ताव लाल फितीत अडकल्याचे समोर आले आहे.

पीएमपी पगाराचा तिढा आंदोलनानंतर सुटला

$
0
0
‘पीएमपी’च्या कर्मचाऱ्यांच्या थकित पगाराची रक्कम तातडीने द्यावी, या मागणीसाठी ‘इंटक’च्या पदाधिकाऱ्यांनी ‘पीएमपी’चे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण आष्टीकर यांना घेराव घातला. ‘पीएमपी’च्या कार्यालयात तीन तास हे नाट्य सुरू होते. अखेरीस प्रशासनाने पगार केल्यानंतर हा तिढा सुटला.

आरोग्य सेवा ‘व्हेंटिलेटरवर’

$
0
0
प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा हॉस्पिटल, ग्रामीण हॉस्पिटल आणि जिल्हा हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी संपावर गेल्याने राज्यातील सरकारी आरोग्य सेवा अक्षरशः ठप्प झाली आहे.

इनामदार हॉस्पिटलची ‘बेइमानी’

$
0
0
वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता तब्बल पाच मजले बेकायदा बांधकाम केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व बांधकामाला महापालिकेने नोटीस बजावली असून, गेल्या किती दिवसांपासून पूर्णत्वाचा दाखला न घेता बांधकामाचा वापर केला जात आहे, याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आल्याचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.

राज्यातील रेल्वे दरोड्यांच्या ट्रॅकवर

$
0
0
रेल्वे, रेल्वे स्टेशन आणि रेल्वे ट्रॅकवर घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राने बिहार-उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक असे ४७५९ गुन्हे दाखल झाले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images