Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तरुणीवर बलात्कार करणाऱ्याला शिवसैनिकांनी चोपले

$
0
0
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नृत्य संस्थेच्या संचालकास शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळे फासत चप्पलेचा प्रसाद दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

लोणावळ्यासह मावळात पाऊस

$
0
0
लोणावळ्यासह मावळात पावसाने मंगळवारी एक महिन्याच्या विश्रांतीनंतर दमदार हजेरी लावली. पावसाअभावी कोरड्या संकटात सापडलेला बळीराजा आणि पर्यटकांअभावी आर्थिक संकटात सापडलेले या भागातील व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर यामुळे हास्य फुलले आहे.

सांगलीत कार्बाइन, मशिनगन जप्त

$
0
0
दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मध्य प्रदेशातून विक्री करण्यासाठी आणलेली कार्बाइन मशिनगन आणि तीन पिस्तुल सांगली येथे जप्त केले आहेत. सांगली येथील म्हैसाळ-मिरज रोडवर राजेश पेट्रोल पंपासमोर सोमवारी सकाळी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडमध्येही एक वेळ पाणी

$
0
0
पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही मंगळवारपासून (दोन जुलै) दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे शहरवासियांना प्रथमच पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार असून, त्याबाबत येत्या १५ जुलैला फेरआढावा घेण्यात येणार आहे.

नव्या एकांकिकांचा ऑनलाइन शोध

$
0
0
नव्या धाटणीच्या एकांकिका आणि उदयोन्मुख लेखकांना शोधण्यासाठी ‘मुंबई थिएटर गाइड’ आणि ‘अस्तित्व’ यांनी ऑनलाइन शोध सुरू केला आहे. मराठीसह गुजराती, इंग्रजी आणि हिंदी या चार भाषांतील नव्या एकांकिकांसाठी ‘ई-नाट्य संहिता’ ही अभिनव ऑनलाइन नाट्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेतील सर्वोत्तम एकांकिकांचे ई- बुकच्या माध्यमातून रंगकर्मींसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.

पालिकांच्या स्वायत्ततेसाठी ‘एलबीटी’ आवश्यकच

$
0
0
महापालिकांची स्वायत्तता टिकून राहण्यासाठी स्थानिक संस्था कर (एलबीटी) आवश्यक असल्याचा सूर मान्यवरांनी चर्चासत्रात आळवला. समाज विज्ञान अकादमीतर्फे ‘एलबीटी आणि करविषयक मानसिकता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

साथीच्या रोगांवरील नियंत्रणकक्ष कार्यरत

$
0
0
राज्यात साथीचा उद्रेक वाढल्यास तत्काळ उपाययोजना करता याव्यात यासासाठी आरोग्य खात्याच्यावतीने पुण्यात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षात चोवीस तास सेवा दिली जाणार असून, राज्यातील परिस्थितीवरही लक्ष ठेवले जाणार आहे.

राज्यातील जमीन मोजणीला खो

$
0
0
ब्रिटिश राजवटीत झालेल्या जमीन मोजणीनंतर सुमारे शंभर वर्षांनी राज्यातील जमिनीची पुनर्मोजणी करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधीच्या अडचणीमुळे ‘खो’ बसला आहे. पुनर्मोजणीसाठी केंद्र सरकारने सहा वर्षांपूर्वी निश्चित केलेल्या दराने मोजणीचे काम करण्यास कोणतीही संस्था तयार नसल्याने हे काम खोळंबले आहे.

संमेलनस्थळाच्या निवडीचे निकष काय?

$
0
0
साहित्य संमेलनाची निमंत्रणे आलेल्या सर्व ठिकाणांना भेटी देऊन मगच निर्णय घेणार, असे सांगणाऱ्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाने केवळ दोनच ठिकाणांची पाहणी करून पंजाबमधील घुमान या ठिकाणाची निवड केली आहे.

‘सीओईपी’च्या विद्यार्थ्यांनी तयार केली फॉर्म्युला वन कार

$
0
0
आपल्या शिक्षणाचा प्रत्यक्षात वापर करून कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी चक्क फॉर्म्युला वनची रेसिंग कार तयार केली आहे. १७ ते २० जुलैदरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या ‘सुप्रा २०१४’ या स्पर्धेत ही कार सहभागी होणार आहे.

प्रथम वर्ष प्रवेशांचा तिढा आता सुटणार

$
0
0
शहरातील जवळपास ४०हून अधिक कॉलेजांना प्रथम वर्ष पदवीच्या प्रवेशांसाठी १० टक्के जागा वाढवण्यास राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बारावीच्या विक्रमी निकालानंतर शहरात निर्माण झालेला प्रथम वर्षाच्या प्रवेशांचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शशिकांत कुलकर्णी यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ रंगकर्मी शशिकांत कुलकर्णी यांचे मंगळवारी निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. प्रा. भालबा केळकर यांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन (पीडीए) या संस्थेचे ते विद्यमान सचिव होते.

निराशेच्या मळभावर आशेचा शिडकावा

$
0
0
अनेक दिवसांच्या खंडानंतर मंगळवारी शहरात अंशतः ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास शहराच्या काही भागांत हलकासा शिडकावा झाला. दरम्यान, शहराच्या काही भागांत दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अर्जांच्या छाननीअभावी त्रुटी वाढल्या

$
0
0
दाखल्यांसाठी एकदा अर्ज दाखल करून घेतल्यानंतर अनेक दिवसांनी त्यातील नवनव्या त्रुटी (क्वेरी) काढण्याचे प्रकार नागरी सुविधा केंद्रात वाढले आहेत. त्यामुळे एकाच कामासाठी अनेकदा हेलपाटे घालण्याची वेळ विद्यार्थी आणि पालकांवर आली आहे.

अनधिकृत नळ कनेक्शनद्वारे शहरात खुलेआम पाणीचोरी

$
0
0
अपुऱ्या पावसाअभावी पाणीटंचाईतून मार्ग काढण्यासाठी शहरात एकवेळ पाणीपुरवठा केला जात असला, तरी अनधिकृत नळ कनेक्शनद्वारे खुलेआम होणारी पाणीचोरी रोखण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे समोर येत आहे.

रेल्वे तिकीट आरक्षणाचा घोटाळा CBI कडून उघड

$
0
0
रेल्वेमध्ये मंत्री आणि खासदारांसाठी आरक्षित असलेल्या व्हीआयपी कोट्याचा गैरवापर करून घोटाळा करणारे रॅकेट केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) उघडकीस आणले आहे. या प्रकरणी सीबीआयने चिंचवडजवळील थेरगाव येथील साई टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला अटक केली आहे.

पणन संचालक मानेंची तडकाफडकी बदली

$
0
0
सव्वाशे कोटी रुपयांच्या एफएसआय घोटाळ्याप्रकरणी मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळावर कारवाई करणारे राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांची सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

महसूल कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी आंदोलन

$
0
0
महसुलेतर कामांसाठी नवीन पदनिर्मिती करण्यात यावी, नायब तहसीलदारांची पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत, कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, लिपिकांचे पदनाम महसूल सहायक असे करावे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलाला खात्यात नोकरीत घ्यावे, आदी २५ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केले आहे.

गावठाण रहिवास क्षेत्रवाढीची अधिसूचना आठवड्याभरात

$
0
0
गावठाणांच्या रहिवास क्षेत्रात वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयासंदर्भातील अधिसूचना येत्या आठवड्यात जारी केले जाणार आहे. या अधिसूचनेनंतर त्यावरील हरकती व सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती अवर सचिव सुनील मरळे यांनी मंगळवारी दिली.

मनपात नवी गावे येणार?

$
0
0
महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्यावर हरकती व आक्षेप घेण्याची मुदत संपल्यानंतर आता त्यावरील सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सुनावणीनंतर सप्टेंबरपूर्वी गावांच्या महापालिकेतील समावेशाचा निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images