Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

एकवेळ पाणीही चालेल, पण पूर्ण दाबाने द्या

$
0
0
जून महिना संपला तरी यंदा वरुणराजाने अवकृपा केल्याने पुण्यासह राज्यात पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणांत १.८१ अब्ज घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शनिवारपासून शहरात एक वेळ पाणी पुरवठा होत आहे.

पुणे-सोलापूर मार्गावर चोरी

$
0
0
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद गावच्या हद्दीत पोलिस असल्याचे सांगून मारुती ओम्नी व्हॅनमधील ड्रायव्हरसह चार महिलांना लुटले. या जबरी चोरीत अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोख रकमेसह तीन लाख ऐंशी हजारांचा ऐवज लुटून नेला.

‘जलवाहिनीचे काम थांबवा’

$
0
0
भामा आसखेड धरणातून पुणे शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम आठ दिवसांत न थांबवल्यास येत्या ८ जुलैला खेड तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

खेड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

$
0
0
या वर्षी संपूर्ण जून महिन्यातच पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे खेड तालुक्यात भात रोपे वगळता कोणत्याही पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. परिणामी शेतकरी व्याकुळ झालेला आहे. जून कोरडा गेला मात्र जुलै महिन्यात तरी चांगला पाऊस पडावा अशी तो वरुणराजाकडे प्रार्थना करीत आहे.

नगर रोडवर १२ लाखांची चोरी

$
0
0
मार्केट यार्डात फळाच्या मालाची विक्री करून जमा झालेले बारा लाख रुपये घरी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याजवळील रोकड लुटण्यात आली. रस्त्याच्या कडेला चारचाकी गाडी बाजूला पार्क करून दारू पिण्यासाठी व्यापारी बसले होते.

सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चिखलगाव येथील आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. गणेश यशवंत भोमाळे (वय ११, राहणार भोमाळे, ता. खेड) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

इमारत दुर्घटनांना आळा घालण्यासाठी मोहीम

$
0
0
पावसाळ्यात धोकादायक इमारती, वाडे पडून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील धोकादायक झालेल्या तब्बल ८९६ वाड्यांना महापालिकेने कारवाईची नोटिसा बजाविल्या आहेत. तर २७२ वाड्यांच्या दुरूस्तीसाठी पालिकेने परवानगी दिली आहे.

पदवीधर मतदानासाठीही सिंगल व्होटिंग पद्धती

$
0
0
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पसंतीक्रमानुसार मतदानाची (प्रेफरन्शियल व्होटिंग) पद्धत बंद करावी, असा प्रस्ताव निवडणूक प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. ही पद्धत वेळखावू असून, संपूर्ण यंत्रणा त्यामुळे वेठीस धरली जाते, असे या निवडणुकीत आढळून आले आहे.

पिस्तुले बाळगणाऱ्या गुन्हेगाराला अटक

$
0
0
विदेशी बनावटीची दोन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली. बाळासाहेब जनक चोरघे (४२ रा. प्रियदर्शनी, भारती विद्यापीठ), योगेश दत्तात्रय मांगडे (३३ रा. शुभदा हौसिंग सोसायटी, कात्रज) अशी आरोपींची नावे आहेत.

गावांच्या विकासाची जबाबदारी सरकारची

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या ३४ गावांना मुलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेसह राज्य सरकारची असून, गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारची आर्थिक मदत आवश्यकच आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी व्यक्त केले.

ख्रिश्चन समाजालाही आरक्षण देण्याची मागणी

$
0
0
विविध समस्यांमुळे त्रस्त ख्रिश्चन समाजाला आरक्षण द्या आणि प्रलंबित मागण्या मान्य करा, अन्यथा जुलैमध्ये मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा ‘अल्फा ओमेगा ख्रिश्चन संघटने’ने दिला आहे.

जकातीची थकबाकी पालिकेने द्यावी

$
0
0
जकातीपोटी थकलेले सुमारे २४ कोटी ७९ लाख रुपये देण्यास पुणे महानगरपालिका टाळाटाळ करत आहे. त्यामुळे विकासकामांच्या पूर्ततेत अडथळा निर्माण असल्याने ही थकबाकी लवकरात लवकर द्या, असा निर्वाणीचा इशारा पुणे कँटोन्मेंट बोर्डाने दिला आहे. या बाबत पुन्हा एकदा महापालिकेला स्मरणपत्र पाठविण्यात येणार आहे.

पर्यटनविषयक नियमावलीत जाचक त्रुटी

$
0
0
गिर्यारोहण, पदभ्रमण यांसह साहसी सहली आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र सरकारने ही नियमावली उथळ माहितीच्या आधारे घाईघाईत प्रसिद्ध केल्याने अनेक त्रुटी राहिल्या आहेत.

फुले यांच्या ग्रंथांच्या सोळा लाख प्रती

$
0
0
महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व उलगडणाऱ्या सोळा ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांतून राज्य सरकारतर्फे प्रकाशित करण्यात येणार आहेत.

फुले नाट्यगृहात सुविधांची वानवा

$
0
0
वानवडीतील महात्मा फुले नाट्यगृहाचे उद्‍घाटन होऊन चार महिने लोटूनही नाट्यगृहाच्या पायाभूत सुविधा पूर्ण करण्याकडे महापालिकेने अद्याप लक्ष दिलेले नाही. परिणामी, या नाट्यगृहात देखभाल आणि अपुऱ्या मनुष्यबळाच्या उणिवेचेच प्रयोग रंगले आहेत.

औषधनिर्माण अधिकाऱ्यांचा संप सुरू

$
0
0
निदर्शने, सामूहिक रजा आंदोलन केल्यानंतर विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने अखेर राज्यातील साडेतीन हजार औषधनिर्माण अधिकारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

शालेय वाहतुकीसाठी पालकांशी करार करावा

$
0
0
शालेय बस वाहतुकीसाठी आवश्यक असणारा सामंजस्य करार शाळेकडून देण्यात येत नसल्यामुळे शालेय वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांसमोरील अडचणींमध्ये भर पडली आहे.

जातीचे बनावट दाखले देणाऱ्यांपासून सावधान

$
0
0
‘जातीचे दाखले काढण्यासाठी गेलेल्या विद्यार्थी व पालकांनी दाखले लवकर मिळवून देणाऱ्या दलालांपासून सावध रहावे. त्यांच्याकडून बनावट दाखले दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही,’ असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) केले आहे.

वैद्यकीय अधिकारी आजपासून संपावर

$
0
0
प्रलंबित मागण्यांची दहा दिवसांत अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरही त्याची राज्याच्या प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आली नाही. त्याच्या निषेधार्थ आजपासून (मंगळवारी) ‘डॉक्टर डे’चे औचित्य साधून वैद्यकीय अधिकारी संपावर जात आहेत. दुसरीकडे राज्यातील १२ हजार वैद्यकीय अधिकारी सामूहिक राजीनामे देणार आहेत.

फर्ग्युसन कॉलेजकडून तृतीयपंथीयांना अधिकृत दर्जा

$
0
0
सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना दिलेल्या अधिकृत दर्जाच्या पार्श्वभूमीवर फर्ग्युसन कॉलेजने आपल्या यंदाच्या प्रवेश अर्जामध्ये समाजाच्या या घटकाला अधिकृत दर्जा मिळवून दिला आहे. कॉलेजच्या यंदाच्या ऑनलाइन प्रवेश अर्जामध्ये ‘मेल’, ‘फीमेल’ आणि ‘ट्रान्स्जेंडर’ अशी नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>