Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दांडेकर पूल पोटनिवडणुकीत ४८ टक्के मतदान

$
0
0
दांडेकर पूल प्रभागाच्या पोटनिवडणुकीत रविवारी ४८ टक्के मतदान झाले. पैसे वाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करण्याव्यतिरिक्त मतदान शांततेत पार पडले. आज (सोमवारी) मतमोजणी होणार असून, दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

‘बायोकेमिस्ट’ही पॅथॉलॉजी लॅब चालवू शकतात

$
0
0
रक्त, लघवी, थुंकी तपासून रिपोर्ट देणाऱ्या डीएमएलटी, एमएलटीसारख्या पदविकाधारकांनी दिलेले रिपोर्ट नाकारावेत, असे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेने काढलेले फर्मान चुकीचे आहे.

सातबारा पाहूनच दस्तनोंदणी

$
0
0
राज्य सरकारने हाती घेतलेल्या ई-म्युटेशन कार्यक्रमाअंतर्गत तहसीलदार आणि दुय्यम निबंधकांची कार्यालये सर्व्हरने जोडण्यात येत आहेत. त्याद्वारे येत्या काही काळातच दुय्यम निबंधकांकडे जागेचा सातबारा पाहिल्यानंतरच खरेदीखताच्या दस्ताची नोंदणी सुरू होणार आहे.

प्रयोग... ‘कुकिंग एक्सरसाइज’चा

$
0
0
आर्इ-बाबा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बराच वेळ बाहेर असतात. अशा वेळी मुलांची खाण्यापिण्याची आबाळ होते. स्वयंपाकाच्या मावशी कधी सुट्टी मारतील याचा नेम नाही. घरात ज्येष्ठांचा हातही कमी. अशा वेळी मुलांना भूक लागल्यावर पटकन स्वतःचे स्वतः काही करून खाता आले तर... ?

स्वस्त भाजीपाला विक्री केंद्राचा गाशा गुंडाळला

$
0
0
पुणेकरांना स्वस्त दरामध्ये भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मार्केट यार्डच्या परिसरात सुरू करण्यात आलेले स्वस्त भाजीपाला केंद्र बंद पडले आहे. बाजार समितीकडून हे केंद्र सुरू करण्यासाठी कोणताही प्रयत्न होत नसल्याने ऐन महागाईच्या काळात पुणेकरांचे हाल होत आहेत.

पालेभाज्यांच्या दराची ‘पंचविशी’

$
0
0
पावसाने दडी मारल्यामुळे बाजारपेठेत भाजीपाला महागला आहे. पालेभाज्यांच्या दराने पंचविशी गाठली असून फळभाज्यांच्या किमतीमध्ये दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पर्यटकांअभावी लोणावळा ओस

$
0
0
यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पावसाळी पर्यावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची लगबग दिसून येत नसल्याचे चित्र आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी डॅमने तळ गाठला आहे. पाऊस गायब झाल्याने बळीराजा हतबल आणि चिंताग्रस्त झाला आहे.

आडत बंद करण्याचा निर्णय?

$
0
0
आडत बंद करण्याचा निर्णय येत्या १५ दिवसांमध्ये घेण्यात येणार असल्याचे राज्याचे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी सांगितले. आडत रद्द झाल्यानंतर शेतकऱ्यांवरील भुर्दंड कमी होणार आहे.

यशवंतपूर-जयपूर एक्सप्रेसवर दरोडा

$
0
0
सप्ताहात एकदाच धावणाऱ्या यशवंतपूर-जयपूर एक्सप्रेसवर आज पहाटे कुर्डुवाडी-दौंड दरम्यान दरोडा पडला. यावेळी प्रवाशांकडील पैसे, दागिने, बॅग असा ऐवज दरोडेखोरांनी लटून नेला. यासोबतच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, अशी तक्रारही प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

पवित्र रमजानला सुरुवात

$
0
0
मुस्लिम बांधवात सर्वांत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजानला सोमवारपासून उत्साहात सुरुवात झाली. महिन्याचा पहिला उपवास शहरातील सर्व मशिदींमधून सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आला.

पालिकेवर कुत्र्यांसह मोर्चाचा इशारा

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महापालिकेवर बँड पथकासह कुत्र्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे. यासंदर्भात तापकीर यांनी महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन दिले आहे.

‘कलापिनी’चा प्रयोग ऑस्ट्रेलियात सादर

$
0
0
तळेगाव दाभाडे येथील कलापिनी निर्मित आणि सृजन नृत्यालय प्रस्तुत ‘अमृत संजीवनी’ नृत्यनाट्याचा प्रयोग सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे नुकताच सादर झाला. या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार जगभर पोचविण्याचा प्रयत्न झाला.

अनधिकृत बांधकामाचा स्लॅब कोसळला

$
0
0
कार्ल्याजवळील शिलाटणे गावच्या हद्दीत अनधिकृत इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून एक मजूर ठार झाला आहे, तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

बालिकेवरील बलात्कार प्रकरणी एकाला अटक

$
0
0
चिखली कुदळवाडी येथील रस्त्याच्याकडेला खड्ड्यामध्ये सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पुनवासी राममिलन गौतम (२०, रा. कुदळवाडी) असे या आरोपीचे नाव आहे.

‘डेंगीवर तातडीने उपाययोजना करा’

$
0
0
पिंपरी-चिंचवडमध्ये डेंगीचे रुग्ण आढळण्यास सुरवात झाली असून, या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून नागरी सुरक्षा कृती समितीचे स्वयंसेवक जनजागृती मोहिम राबवित आहे.

कचरा व्यवस्थापनासाठी तरतुदीचा अहवाल द्या

$
0
0
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनावरील तरतूद तसेच उपाययोजनांबाबतचा अहवाल एका महिन्यात सादर करावा,’ अशी सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून, ती गरोदर राहिल्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपात करून, जन्माला आलेल्या अर्भकाची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना सांगवी येथे उघडकीस आली.

लवकरच मानव विकास आराखडा

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘यशदा’च्या मदतीने मानव विकास आराखडा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याअंतर्गत मानवी विकासाचा सर्वंकष विचार करण्यात येणार आहे. शहराचा गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने विकास झाला आहे.

‘महावितरण’पुढे जनरेटर चोरीची डोकेदुखी

$
0
0
ग्रामीण भागात वाढत्या जनरेटर चोरीचा महावितरणला फटका बसत आहे. जनरेटर चोरीस गेल्यानंतर वीजसेवा विस्कळीत होण्याबरोबरच कंपनीलाही आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने ग्राहकांनाच साकडे घातले असून, पोलिस यंत्रणा व कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सरकार सोडवणार सोसायट्यांचे प्रश्न

$
0
0
सोसायट्यांमधील रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी सरकारने फिल्टरसाठीचा व्हॅट कमी केला पाहिजे. तसेच स्वच्छता, खत प्रकल्प व रस्त्यावरील अतिक्रमणे याबाबत पालिकेच्या समन्वयाचा अभाव हा नेहमी सोसाट्यांची डोकेदुखी ठरत आहे...
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images