Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पानपट्टी विक्रेते पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

$
0
0
सुगंधी तंबाखू आणि सुगंधी सुपारीवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील पानपट्टी व्यावसायिक दहा जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत.

कुठं कुठं जायाचं साहित्य संमेलनाला?

$
0
0
आगामी साहित्य संमेलनाचे स्थळ निवडण्याबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक आज, मंगळवारी पुण्यात होत आहे. यंदा हा मान मराठवाड्यातील उस्मानाबादला मिळण्याची दाट शक्यता आहे.

वनजमीन हडपण्याचा डाव पोलिसांनी उधळला

$
0
0
वारजे माळवाडी येथील वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या घुसखोरांना पोलिसांनी जबरदस्तीने बाहेर काढले. ही जमीन भटक्या विमुक्तांसाठी वाटप झाली असल्याचा दावा करून त्याजागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी चालविला आहे.

रमजानच्या नमाजानंतर पावसासाठी ‘दुवा’

$
0
0
मुस्लिम बांधवात सर्वांत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजानला सोमवारपासून उत्साहात सुरुवात झाली. महिन्याचा पहिला उपवास शहरातील सर्व मशिदींमधून सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आला.

पुण्यात पुन्हा हेल्मेटसक्ती

$
0
0
शहरात हेल्मेट सक्ती करण्याचे सूतोवाच पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी वाहतूक शाखेत असलेल्या एका कार्यक्रमात केले. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करत त्यांची माहिती विशेष शाखेला देऊन पासपोर्ट मिळवू न देण्याचा प्रयत्नही केला जाईल, अशी तंबी माथूर यांनी दिली.

३० जुलैपर्यंत लोडशेडिंग नाही

$
0
0
आषाढी एकादशी आणि रमजान महिन्यानिमित्त राज्यभरातील लोडशेडिंग महिन्याभरापुरते मागे घेण्यात आले आहे. येत्या ३० जुलै पर्यंत राज्यातील लोडशेडिंगच्या सर्व वर्गांमधील लोडशेडिंग न करण्याचा आदेश महावितरणने काढला आहे.

दौंडजवळ रेल्वे प्रवाशांना लुटले

$
0
0
पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर दौंडजवळील जिंती रोड क्रॉसिंग येथे यशवंतपूर-जयपूर एक्स्प्रेसवर दरोडा टाकून, प्रवाशांना मारहाण करून १.६५ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेण्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

स्कॉलरशिप चौथी, सातवीलाच?

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी स्कॉलरशिपची परीक्षा किमान यंदा तरी चौथी आणि सातवीनंतर होणार आहे. अशा परीक्षा पाचवी आणि आठवीनंतर घेण्याबाबतचा प्रस्ताव सरकारी मान्यतेच्या अखेरच्या टप्प्यात आहे.

‘बीआरटी’त गैरव्यवहार

$
0
0
सातारा-हडपसर रोडवर बीआरटी अस्तित्वातच नसल्याचे वास्तव नुकतेच समोर आले असताना, त्याच्या कामात गैरप्रकार अथवा गैरव्यवहार झाल्याची शक्यता राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने वर्तविली आहे.

‘मान्सून सरासरी भरून काढेल’

$
0
0
‘बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे सध्या दडी मारलेला मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पाच ते सात जुलैदरम्यान मध्य भारतासह राज्यात मान्सून सक्रीय होईल,’ अशी माहिती हवामान विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी दिली.

रेल्वे पोलीस ३० वर्षांपूर्वीचेच

$
0
0
रेल्वे पोलिसांना ३० वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या मनुष्यबळावरच पोलिसिंग करावे लागत असल्याने दरोडेखोरांचे फावत असल्याची प्रतिक्रिया एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केली. दिवसेंदिवस रेल्वेगाड्यांची, तसेच प्रवाशांची संख्या वाढत असली तरी पोलिस मनुष्यबळ वाढलेले नाही आणि त्यामुळेच पोलिसांना परिणामकारक पोलिसिंग करता येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

बारावीच्या गुणपडताळणीत अडचणींचा डोंगर

$
0
0
बारावीच्या निकालानंतर गुणपडताळणीसाठी अर्ज केलेल्या पुणे विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना गुणपडताळणीच्या प्रक्रियेमध्ये नानाविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

कालव्यातून हजारो लिटर पाण्याची गळती

$
0
0
मगरपट्टा येथील लोहिया उद्यानाजवळ जुन्या कालव्यातून हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे त्याला धबधब्यासारखे स्वरूप आले आहे. एकीकडे महापालिकेतर्फे ‘पाणी जपून वापरा’, असे अवाहन करण्यात येत असताना, पाटबंधारे विभागाकडून या गळतीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

भेसळीच्या संशयावरून तेलसाठा जप्त

$
0
0
जुन्या डब्यांचा पुन्हा वापर करून त्याच्यात तेलाचे पॅकिंग करीत असल्याचे आढळून आल्याने भेसळीच्या संशयावरून चार लाख रुपयांच्या तेलाचा साठा मार्केट यार्डातून जप्त करण्यात आला.

जलसंधारण कार्यक्रमावर भर देण्याचा आग्रह

$
0
0
‘राज्यस्थानच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त पाऊस होऊनही सिंचन क्षेत्रात मात्र आपण त्यांच्या मागे आहोत. त्यामुळे राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता जलसंधारणाचे कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्याची आवश्यकता आहे.

भोरमध्ये भातपिके करपली

$
0
0
पावसाने ओढ दिल्याने पश्चिम घाट क्षेत्रात मोडत असलेल्या भोरमध्ये शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या भागात अनेक ठिकाणी धुळवाफेवर पेरणी केलेली भातबियाणे उगवली मात्र ती करपून गेली आहेत.

पेट्रोल पंपाबाबतच्या तक्रारीत वाढ

$
0
0
पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या महिलेला कमी पेट्रोल देणाऱ्या पंपावर कंपनीने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता नागरिकांमध्ये या प्रश्नाबद्दल जागृती झाली आहे. शहरातील अनेक नागरिकांनी पेट्रोल भरताना येणाऱ्या अडचणींची नोंद करण्यास सुरुवात केली आहे.

कपड्यांच्या दुकानाला आग

$
0
0
तळेगाव दाभाडे येथील स्टेशन परिसरातील सिंडीकेट बँकेशेजारील जयहिंद क्लॉथ सेंटर या कपड्याच्या दुकानाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. ही घटना सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

इनामदार हॉस्पिटलचा अहवाल ‘स्थायी’ समोर ठेवावा

$
0
0
वानवडी येथील इनामदार हॉस्पिटलला महापालिकेने भोगवटापत्र देताना त्यांच्याकडून केलेल्या करारानुसार अद्यापही जागा ताब्यात का घेतली नाही, याची संपूर्ण चौकशी करावी. तसेच, त्याचा सविस्तर अहवाल सात दिवसांत स्थायी समितीसमोर ठेवावा, असे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त विकास देशमुख यांना देण्यात आले.

पुणे जिल्ह्यात फिरती लोकअदालत

$
0
0
मुंबई हायकोर्ट आणि महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणाच्या सहकार्याने पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सात ते ३१ जुलै या कालावधीत पुणे जिल्ह्यात फिरते लोकअदालत आयोजित करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images