Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सुविधा योजनेचा बोर्डाकडून बोजवारा

$
0
0
प्रशासकीय कारभारामध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी पुणे कँटोन्मेंट बोर्डाने कर्मचाऱ्यांची माहिती देणारी ‘सुविधा’ ही यंत्रणा सुरू केली आहे. मात्र, या यंत्रणेचे मशीन बंद अवस्थेत ठेऊन ‘सुविधे’चा प्रशासनाकडूनच बोजवारा उडविण्यात आला आहे.

अतिक्रमणावर पुन्हा हातोडा

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडून पुन्हा एकदा अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरुवात करण्यात आली असून, कारवाई केलेल्या विक्रेत्यांकडून दंड वसूल करण्याबरोबरच बोर्ड लेखी हमी लिहून घेत आहे. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांना यापुढे पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

नाट्यगृहांचे आता होणार ‘मूल्यांकन’

$
0
0
शहर व परिसरातील नाट्यगृहांचे पुणे महापालिकेतर्फे लवकरच मूल्यांकन केले जाणार असून नाट्यगृहांचे दरपत्रक ठरविताना त्याचा आधार घेतला जाणार आहे. नाट्यगृहांमधील सोयी-सुविधा आणि त्यांचे दर यामध्ये ताळमेळ बसविण्यासाठी हा प्रस्ताव व्यवहार्य असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे.

विश्व संमेलनाबाबत ‘ताक फुंकून पिणार’

$
0
0
विश्वसाहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग आणि भारतातून अंदमानमधून तयारी असल्याचे ई- मेल महामंडळाकडे आले आहेत. मात्र, गेल्यावर्षी टोरंटोचे विश्व साहित्य संमेलन आयत्यावेळी रद्द झाल्याने आता विश्वसाहित्य संमेलनाबाबत ‘ताक फुंकून पिण्याची’ भूमिका अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतली आहे.

जिल्हानिहाय समित्यांना स्थगिती

$
0
0
जिल्हानिहाय जातपडताळणी समित्या स्थापन करण्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या निर्णयाला राज्य सरकारने एक महिन्याची स्थगिती दिली आहे.

खूनप्रकरणी देसाईला कोठडी

$
0
0
​हडपसर येथे झालेल्या मोहसीन शेख खूनप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला मंगळवारी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली.सत्र न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

चंद्रकांत पाटलांची पहिल्या फेरीत आघाडी

$
0
0
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या पसंती क्रमाच्या मतांमध्ये सात हजार मतांनी आघाडी घेतली. तर, शिक्षक मतदारसंघात शिक्षक लोकशाही आघाडीचे दत्तात्रय सावंत यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सव्वा दोन हजार मताधिक्य घेतले आहे.

पोलिस बंदोबस्ताअभावी रखडली कारवाई

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात केल्यानंतर शिवाजी मार्केटचा परिसर फेरीवाल्यांपासून मुक्त करण्याचे ठरविले आहे. मात्र, ही कारवाई पोलिस बंदोबस्तावर अवलंबून राहिली आहे.

दाटलेल्या ढगात… पाऊसच गायब!

$
0
0
मान्सून शहरात दाखल होऊनही मोठ्या पावसाने मात्र हुलकावणीच दिली आहे. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना पुढील दोन दिवसही केवळ ढगाळ हवामानावरच समाधान मानावे लागणार आहे. पुण्याबरोबरच राज्यातही पावसाचा जोर कमीच आहे.

रेल्वे स्टेशनला पाण्याचा तुटवडा

$
0
0
पुणे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची गरज भागवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला दररोज २६ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत पालिका प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरवठा करून देखील त्याची पूर्तता करून घेण्यास रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे.

आतापर्यंत अवघा ३४ मिमी पाऊस

$
0
0
संपूर्ण जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत फक्त ३४ मिलीमीटर पाऊस पडला असून त्याचे प्रमाण जून महिन्याच्या एकूण सरासरीच्या सुमारे २४ टक्के एवढेच आहे. जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे बोअरवेल वर्षभर सुरू

$
0
0
लोकांच्या आजारांचे निदान करताना एक जबाबदार हॉस्पिटल म्हणून भूजलपातळीचे आरोग्य जपण्याचा निर्णय फर्ग्युसन रोडवरील दीनदयाळ हॉस्पिटलने दोन वर्षांपूर्वी घेतला. हॉस्पिटलच्या गच्चीतून वाया जाणारे पावसाचे पाणी वाचविण्यासाठी त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविला अन् आत्तापर्यंत तब्बल पाच लाख लिटर पावसाचे पाणी भूजलामध्ये जिरवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

भक्तिरसात रंगले सासवड

$
0
0
सासवड येथे माउलींची पालखी मंगळवारी मुक्कामी होती. लोणी काळभोरमधून तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ठेवले. ‘महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर॥ ब्रह्म सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला॥ आणि माझ्या वडिलांची मिरासी गा देवा !

हमालीच्या प्रश्नावर बैठकीत तोडगा नाही

$
0
0
टोळी पद्धतीने हमालीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी हसन मुश्रीफ यांच्याकडे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही.

बोगस डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या

$
0
0
स्वारगेट पोलिसांनी एका बोगस डॉक्टरला अटक केली आहे. बोगस प्रमाणपत्राचा वापर करून डॉक्टर असल्याचे भासवून तो नागरिकांची फसवणूक करत होता. या प्रकरणी नारायण पशुपती मलिक (३२, रा. पर्वती पायथा, रा. पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे.

केशवनगरचा समावेश पुणे पालिकेत नको

$
0
0
पुणे महानगरपालिकेत केशवनगरचा समावेश झाल्यास केशवनगरवासीयांना न्याय मिळणार नाही, अशी भूमिका घेत केशवनगरचा समावेश नवीन महापालिकेत करावा, असा ठराव केशवनगर ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यात आला.

‘ई-संग्राम’मुळे मतदारयादीत आपोआप नाव

$
0
0
एकदा जन्माची नोंद केलेल्या बाळाला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याचे नाव आपोआप मतदारयादीत समाविष्ट करण्याची आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर यादीतून नावे वगळण्याची व्यवस्था येत्या काही काळात महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे.

‘कृषी संशोधन’ची ४३ एकर जमीन पडीक

$
0
0
पुरंदर तालुक्यात राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प मैदानी विभाग या नावाने ५० एकर क्षेत्रफळात उभारलेल्या प्रकल्पातील ४३ एकर जमीन गेली चार वर्षे पडीक असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे.

शाळा पाडलेल्यांवर कारवाईचा इशारा

$
0
0
बिल्डर आणि शालेय व्यवस्थापनाच्या वादात शाळा पाडल्यामुळे रस्त्यावर आलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा विचार करून शालेय शिक्षण विभागानेही आता कडक भूमिका घेतली आहे.

वाङ्मयचौर्य रोखण्यासाठी गाइड्सची तपासणी

$
0
0
‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकांचा गैरफायदा घेऊन वाङ्मयचौर्य करणाऱ्या खासगी प्रकाशकांना आळा घालण्यासाठी बाजारात उपलब्ध गाइड्सची तपासणी करण्याचे आदेश ‘बालभारती’ प्रशासनाने दिले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images