Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भामाआसखेडचे ‘पाणी’ गावकऱ्यांनी रोखले

$
0
0
भामा आसखेड धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविल्याशिवाय या धरणातून पुणे शहराला पाणी देण्यास गावकऱ्यांनी विरोध केला आहे. पुण्यात पाणी नेण्यासाठी सुरू असलेल्या जलवाहिनीचे काम गावकऱ्यांनी बंद पाडले आहे. या आंदोलनामुळे भामा आसखेडचे पाणी शहरात आणण्याच्या योजनेला विलंब होणार आहे.

काटकसरीने वापरल्यास ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल

$
0
0
जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी १५ जुलैपर्यंतच्या पाण्याचे नियोजन केले आहे. मात्र काटकसरीने पाणी वापरल्यास ३१ जुलैपर्यंत हे पाणी पुरेल. मात्र येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न आल्यास शहरातील पाणीकपात अटळ आहे, असे महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी सोमवारी मुख्य सभेत सांगितले.

चेक न वटल्याप्रकरणी ४ लाखांचा दंड

$
0
0
व्यवसाय करण्यासाठी मित्राकडून घेतलेले पैसे धनादेशाद्वारे परत करणाऱ्याला चेक न वटल्याप्रकरणी चार लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. शिंदे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

बोगस डॉक्टरला अटक

$
0
0
शहरातील विविध भागात पदवी नसतानाही काही जण वैद्यकीय प्रॅक्टिस करीत असल्याचे आढळून येऊ लागले आहे. अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी नसतानाही बेकायेदशीर प्रॅक्टिस केल्याप्रकरणी दांडेकर पुलाजवळ बोगस डॉक्टरला अटक करण्याची कारवाई स्वारगेट पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

औषध निर्माणशास्त्र अधिकाऱ्यांचे धरणे

$
0
0
प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय औषधनिर्माण अधिकारी (गट क) कर्मचारी संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलने केली. या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

‘कॅफे क्युबा’च्या शीतपेयाच्या लेबलमध्ये दोष

$
0
0
‘कॅफे क्युबा’ ब्रॅन्डच्या शीतपेयात कॉफीचा घटक पदार्थ नसतानाही लेबलवर त्याचा उल्लेख केल्याच्या आरोपावरून अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) एक लाख पाच हजार रुपयांचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

जागेच्या मालकाकडून शाळेची इमारत जमीनदोस्त

$
0
0
वडगांव शेरी येथील ‘नॅशनल चिल्ड्रन अॅकॅडमी’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची इमारत जागामालकाने जमीनदोस्त केल्याने शेकडो विद्यार्थ्यांना शाळेबाहेरच पटांगणात थांबण्याची वेळ आली.

पावसाची मर्जी ठरविणार पाणीकपात

$
0
0
पुणे शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा खडकवासला धरण प्रकल्पात शिल्लक असल्याने लगेचच पाणीकपात केली जाणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट करण्यात आले.

विज्ञान व गणिताच्या शिक्षकांचा तुटवडा भासणार

$
0
0
शिक्षणहक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदीनुसार राज्यात पदवीधर शिक्षकांची नव्याने नेमणूक केली जाणार असली, तरी विज्ञान आणि गणिताच्या शिक्षकांचा तुटवडाच भासण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातून वर्तविली जात आहे.

महापालिकेची ऑनलाइन शिष्यवृत्ती कागदोपत्रीच

$
0
0
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठी पालिकेने त्याचा अर्ज यावर्षी ‘ऑनलाइन’ उपलब्ध करून दिला असला, तरी नगरसेवकांच्या आग्रहाखातर छापील अर्ज भरून देण्याची मुभाही देण्यात आली आहे.

निधी नाकारणाऱ्या मंत्र्यांना शहर प्रवेशबंदीचा इशारा

$
0
0
शहराच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुर्ननिर्माण योजने (जेएनएनयूआरएम) अंर्तगत मिळणारा निधी केंद्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तातडीने बंद करण्यात आला. हा निधी देण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याने शहराचा विकास थांबणार आहे.

इराकमध्ये अडकले मराठवाड्यातील तरुण

$
0
0
अंतर्गत संघर्षामुळे यादवीच्या उंबरठ्यावर असलेल्या इराकमधील बसरा शहरात मराठवाड्यातील चार तरुण अडकले असून, मायदेशी परतण्याची प्रतीक्षा ते करीत आहेत. निलंगा तालुक्यातील (जि. लातूर) हे तरुण बांधकाम कामगार म्हणून तेथे गेले आहेत.

पोलिसांच्या रडारवर स्कूलबस चालक

$
0
0
शहरात सुरू असलेल्या सुमारे तीन हजार स्कूलबसच्या चालक आणि मदतनिसांची माहिती गोळा करण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले ​आहे. पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी सुरक्षेच्या दृष्ट‌िकोनातून चालक आणि मदतनिसांची माहिती संग्रहित करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत.

‘लवासा’सारखे राज्यात आणखी २६ प्रकल्प शक्य

$
0
0
राज्यात लवासा सिटीसारखे २६ प्रकल्प होऊ शकतात, अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देऊन, विकासाच्या आड येणाऱ्यांना माध्यमांनी प्रसिद्धी देऊन नये, असे आवाहन सोमवारी केले.

इथेनॉलचा निर्णय दिलासादायक

$
0
0
उसाचे प्रचंड उत्पादन होण्याची शक्यता असल्याने यंदाच्या हंगामात त्यापैकी काही ऊस थेट इथेनॉल उत्पादनासाठी पाठविण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. दरम्यान, असा निर्णय घेतल्यास साखर उद्योगासाठी तो फायदेशीर ठरेल, अशी प्रतिक्रिया साखर उद्योगातील ज्येष्ठ नेते आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) उपाध्यक्ष शिवाजीराव गिरीधर पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली.

कॅम्पसमध्ये स्कूलबस नाही?

$
0
0
मध्यवस्तीतील शाळांच्या कॅम्पसमध्ये स्कूल बस घेण्यास परवानगी न देणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कॅम्पसमध्ये शालेय वाहनांना परवानगी नाकारणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करता येईल का, याची चाचपणी करण्यात येत असल्याचे समजते.

धरणांत केवळ २०% पाणीसाठा

$
0
0
राज्यात मान्सून सक्रिय झाला नसल्याने धरणांतील जलसाठ्यांची स्थिती खालावत चालली असून सद्यस्थितीत धरणांमध्ये फक्त २० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाने आणखी ताण दिल्यास पाण्याची स्थिती बिकट होणार आहे. परिणामी, पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

‘तत्काळ’ सुविधा बंद?

$
0
0
तातडीने प्रवासाला जाणाऱ्यांसाठी रेल्वेची तत्काळ सुविधा फायदेशीर ठरत असली, तरी आगामी रेल्वे अर्थसंकल्पात ही सुविधा रद्द केली जाण्याची शक्यता आहे, असे कळते. रेल्वेगाड्यांना असणारी वेटिंग लिस्ट कायमस्वरूपी बंद करून संबधित गाडीला जादा डबा लावणे किंवा त्या मार्गावर जादा गाडी सोडण्याचे नियोजन अर्थसंकल्पात येणार असल्याचे समजते.

महेश खासगीवाले यांचे निधन

$
0
0
पुण्यातील ‘श्री पद्मा पब्लिसिटी’ या जाहिरात संस्थेचे संचालक महेश खासगीवाले यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

पेन्शनमध्ये हवी वाढ

$
0
0
खाजगी कंपनी आणि केंद्र, राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या निमसरकारी उद्योगांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशनकडून (ईपीएफओ) मिळणारी पेन्शन तुटपुंजी असल्याने महागाई निर्देशकाशी पेन्शन जोडण्याची मागणी पेन्शनधारकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय माहिती प्रसारण आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images