Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

४ धरणांत २.०४ TMC पाणी

0
0
पावसाने मारलेल्या दडीमुळे धरणातील पाणीसाठा घटत चालला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या चारही धरणात मिळून सध्या केवळ २.०४ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास धरणातील पाण्याची पातळी आणखीच कमी होण्याची शक्यता असून, त्याचा गंभीर परिणाम होणार आहे.

सोशल मीडियाचा ‘व्हायरस’

0
0
सातासमुद्रापार बसलेल्या एका समाजकंटकाने महापुरुषांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली आणि सलग दोन आठवडे संपूर्ण पुणे शहर वेठीला धरले गेले. शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून अडीचशे-तीनशे बसची तोडफोड झाली.

‘नेट’कऱ्यांनो जरा दमानं...

0
0
सोशल मीडियाचा गैरवापर करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे.

‘IB’कडून पुणे शहराला अलर्ट

0
0
राज्यात लवकरच होणारी विधानसभा निवडणूक, रमजानचा सण या काळात पुण्यातील कायदा सुव्यवस्था बिघडण्याची भीती केंद्रीय गुप्तचर विभागाने (आयबी) व्यक्त केली असून, याबाबत पुणे पोलिसांना दक्ष राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

स्कॉलरशिप नेमकी कधी?

0
0
इयत्ता चौथी आणि सातवीऐवजी पाचवी आणि आठवी इयत्तेला स्कॉलरशिप परीक्षा घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार याविषयी स्पष्टता नसताना, गाइड-पुस्तकांसह चौथी-सातवी स्कॉलरशिपच्या अभ्यासाचे साहित्य बाजारपेठेत खपविण्यात येत आहे; तसेच खासगी क्लासेसही सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी-पालक मात्र संभ्रमावस्थेत आहेत.

पाणीकपातीचे संकट

0
0
जून संपत आला तरी पुण्यासह राज्यात पावसाचा मागमूस नसल्याने पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. ‘येत्या दोन दिवसांत पाऊस न पडल्यास पुण्याला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल,’ असे मत व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यात पाणीकपात करावी लागणार असल्याचा इशारा दिला.

राज्यात ११.४ टक्के पाणी ‘दूषित’

0
0
पावसाळ्यात साथीचा उद्रेक होण्यापूर्वी गावागावांतील पाण्याच्या तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नाशिक, नगर, कोल्हापूर, औरंगाबादसारख्या सतरा जिल्ह्यांतील पाणी सर्वाधिक दूषित असल्याचे उघड झाले आहे. तर राज्यातील दूषित पाण्याचे प्रमाण हे ११.४ टक्के एवढे आहे. तर पुणे, सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याची स्थिती मात्र इतर जिल्ह्यांपेक्षा चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नव्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी

0
0
शालेय शिक्षणाच्या पातळीवर विविध धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीही नव्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार केला आहे. त्या विषयी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्याशी योगेश बोराटे यांनी साधलेला हा संवाद...

परदेशी नागरिकांनीही अनुभवली वारी

0
0
निस्वार्थी हेतूने संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या नामाचा गजर करणारे लाखो वारकरी, टाळ-मृदुंगांच्या गजरामुळे वारीमध्ये तयार होणारे भक्तिमय वातावरण… शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारीचे विविध पैलू उलगडत गेले अन् नकळत परदेशातील नागरिकांनीही महाराष्ट्राच्या संस्कृतीला सलाम केला.

चालली दिंडी पंढरीच्या वाटेवरी…

0
0
विठूरायाच्या भेटीसाठी डोळे लावून बसलेल्या वारकऱ्यांनी दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सोमवारी सकाळी पुण्यातून मार्गस्थ झाले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडकडे, तर जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेने रवाना झाल्या.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण ठरवा

0
0
पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक भूमिक घेऊन धोरण ठरवावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

विकासकामांतील त्रुटी दूर करा

0
0
पिंपरी-चिंचवडमधील विकासाची सर्व कामे जागतिक दर्जाची होण्यासाठी त्रुटी आत्ताच दूर करा. आवश्यक खबरदारी घ्या. तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करा, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (२३ जून) महापालिका प्रशासनाला दिल्या. विशेष म्हणजे या दौऱ्यात एकाही पदाधिकाऱ्यांचा समावेश नव्हता.

एक्स्प्रेस वेवरील अपघात दोघांचा मृत्यू; ६ जखमी

0
0
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील खोपोली एक्झिट येथे जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर आडोशी येथे खासही बस आणि टेम्पोच्या धडकेत दोन प्रवासी जागीच ठार झाले आहेत, तर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात सोमवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास झाला.

घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पालिकेची नाही

0
0
घनकचरा व्यवस्थापन ही केवळ महापालिकेची जबाबदारी नाही, कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीने देखील याचे भान राखणे आवश्यक आहे. कचरा वर्गीकरण, विल्हेवाट लावण्याचे काम महापालिका बघून घेईल, हा दृष्टीकोन टाळला पाहिजे.

पालिका हॉस्पिटलचे खासगीकरण करणार?

0
0
महापालिकेच्या मालकीची असलेली आणि वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली हॉस्पिटल खासगीकरणाने देण्याचे धोरण ठरविण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

ठरावीक पगार, सुटीचा पर्याय

0
0
टोळी पद्धतीने हमालीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आडते असोसिएशनने हमालांना ठरावीक पगार आणि विश्रांतीसाठी सुटी असे दोन पर्याय ठेवले आहेत. या संदर्भातील प्रस्ताव आडते असोसिएशन गुरुवारी माथाडी मंडळाकडे सादर करणार आहे. या प्रश्नावर आज, मंगळवारी अंतिम निर्णय होणार आहे.

पाण्याच्या बाटल्यांच्या उत्पादनावर बंदी

0
0
अन्न सुरक्षा कायद्यानुसार पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन करण्याची विना परवाना विक्री करता येत नसतानाही विक्री करणाऱ्या बारामती तालुक्यातील तीन कंपन्यांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.

राज्यात ११.४ टक्के पाणी ‘दूषित’

0
0
पावसाळ्यात साथीचा उद्रेक होण्यापूर्वी गावागावांतील पाण्याच्या तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नगर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिकसारख्या सतरा जिल्ह्यांतील पाणी सर्वाधिक दूषित असल्याचे उघड झाले आहे. तर राज्यातील दूषित पाण्याचे प्रमाण हे ११.४ टक्के एवढे आहे.

१५ ऑक्टोबरपासून शेतीला किती पाणी सोडले?

0
0
‘शहराच्या पाण्यासंदर्भात कोणताही कठोर निर्णय घेण्यापूर्वी गेल्या काही काळात शेतीला किती पाणी सोडले, याची माहिती जाहीर करावी,’ अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.

कृत्रिम पाऊस तांत्रिकदृष्ट्या अयोग्य

0
0
‘दुष्काळी स्थितीची शक्यता उभी राहिली असली, तरी कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे दोन ते तीन मिलीमीटर इतकाच पाऊस पडतो, असे आढळून आले आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरलेला नाही,’ असे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images