Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘क्रॉसपॅथी’च्या विरोधात हायकोर्टात जाणार

0
0
होमिओपॅथना अॅलोपॅथची प्रॅक्टिस करणे सुप्रीम कोर्टाने अमान्य केले असतानाही राज्य सरकारने होमिओपॅथच्या बाजूने निर्णय देत त्यांना प्रॅक्टिसची मुभा दिल्याने आता हा वाद थेट हायकोर्टात पोहोचणार आहे.

‘लाइट रेल मेट्रो’ला स्थायी समितीची मान्यता

0
0
महापालिका प्रशासनाने दिलेल्या नकारात्मक अभिप्राय ग्राह्य धरत अनेक दिवसांपासून स्थायी समितीत रखडलेला ‘लाइट रेल मेट्रो’ च्या प्रकल्पाला स्थायी समितीने काही अटींवर मान्यता दिली आहे.

धरणांतील गाळामुळे पाणीसाठ्यात घट

0
0
राज्यातील धरण प्रकल्पांची निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्षातील सिंचित क्षेत्र यामध्ये धरणातील गाळामुळे फरक पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे वर्षांनुवर्षे वाहत आलेल्या गाळामुळे धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात चार टक्क्यांनी घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.

माहिती पुस्तिकांच्या वितरणात गोंधळ

0
0
इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान अर्ज स्वीकृती केंद्रांवर (एआरसी) माहिती पुस्तिकांच्या वितरणामध्ये एकवाक्यता नसल्याचे मंगळवारी समोर आले. इंजिनीअरिंग कॉलेज, पुणे (सीओईपी)मधून माहिती पुस्तिकांचे वितरण केले जात आहे.

‘पदवीधर’ला चंद्रकांत पाटील आघाडीवर

0
0
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या पसंती क्रमाच्या मतांमध्ये सात हजार मतांनी आघाडी घेतली. तर, शिक्षक मतदारसंघात शिक्षक लोकशाही आघाडीचे दत्तात्रय सावंत यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सव्वा दोन हजार मताधिक्य घेतले आहे.

सॅनहोजेतील शिवपुतळ्याची दुरावस्था

0
0
अमेरिकेतील सॅनहोजे शहरामध्ये दहा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली असून, पुणे महापालिकेने आर्थिक मदत आणि पाठपुराव्याद्वारे आवश्यक सुशोभीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी केले आहे.

'उपरा'कार लक्ष्मण मानेंचा नवा पक्ष

0
0
काँग्रेसने गांधी-नेहरू यांच्या विचारांचे राजकारण संपवले आहे. तर, लोकशाहीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा चालविणाऱ्या नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवून इतरांच्या कानफटात मारले आहे.

पेट्रोलपंप दरोडा : १० जणांना अटक

0
0
चिंचवड येथील पिंपळे पेट्रोल पंपावर भरदिवसा दरोडा टाकल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने दहाजणांना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये गुन्ह्यात मुख्य सूत्रधारांचाही समावेश आहे.

अजित पवारांना कार्यकर्ते दुरावले

धरणे आटूनही चर्चेचेच गुऱ्हाळ

0
0
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात पाण्याने तळ गाठलेला असताना उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करायचे सोडून चर्चांचे गुऱ्हाळच सध्या सुरू आहे.

तिकीटासाठी धडपडणारे नकोतः उद्धव

0
0
‘मला मुख्यमंत्री व्हायचे आहे की नाही, हा नंतरचा प्रश्न आहे; पण तुमची तयारी आहे का,’ असा सवाल करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले.

महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक

0
0
पत्नीला मारहाण करताना शेजाऱ्यांनी अडविले म्हणून शेजारी राहत असलेल्या तरुणाच्या आईचा विनयभंग करुन त्या दोघांना शिवीगाळ केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

चंदननगर भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट

0
0
चंदननगर मधील काळभैरवनाथ भाजी मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतमालाला महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे.

तुकोबारायांच्या पालखीच्या स्वागतासाठी बारामती सज्ज

0
0
जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी बारामती नगरी सज्ज झाली आहे. बारामती नगर पालिका व प्रशासन यांच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. संत तुकाराम महाराज पालखीचे उद्या (शुक्रवारी २७) दुपारी चार वाजता शहरात आगमन होणार आहे.

सासवड पालिकेने गोळा केला तीस टन कचरा

0
0
संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा सासवडमधून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. या सोहळ्यानंतर पालिकेने शहर स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर हाती घेत ३० टन कचरा गोळा करून एक वेगळा पायंडा पाडला.

विद्यार्थांच्या शिक्षणासाठी पर्यायी जागा द्या

0
0
वडगाव शेरी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेची इमारत जागा मालकाने जमीनदोस्त केल्याच्या घटनेची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या येत्या आठवड्याभरात विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पर्यायी जागेची व्यवस्था करण्याचे आदेश शाळा प्रशासनाला दिले आहे.

हडपसर बसस्थानक विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा

0
0
हडपसरमध्ये गाडीतळ बसस्थानकाजवळ उड्डाणपुलाचे काम रेंगाळल्याने या भागात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या परिसरातील बहुतांश शालेय विद्यार्थी बसनेच प्रवास करत असल्याने त्यांना जीव मुठीत घेऊन दररोज कसरत करावी लागत आहे.

महिलेचे अपहरण करून लुटले

0
0
पिण्याच्या पाण्यामध्ये गुंगीचे औषध टाकून एका महिलेला बेशुद्ध करून अपहरण करण्यात आले. तसेच, तिचे दोन मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने असा पावणे दोन लाखांचा ऐवज काढून लुटले.

समाविष्ट गावांमध्ये सुविधांसाठी २ हजार कोटी

0
0
महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या ३४ गावांना पायाभूत सुविधांसाठी महापालिकेला सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. समाविष्ट गावांमधील रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापनासाठी हा खर्च केला जाणार आहे.

औषधनिर्माण अधिकारी सोमवारपासून संपावर

0
0
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी औषधनिर्माण अधिकारी बुधवारी सामूहिक रजेवर गेले. तरीही आंदोलनाची दखल न घेतल्याने अखेर येत्या सोमवारपासून (दि. ३० जून) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images