Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पेठांमधील शाळांचा प्रश्न गंभीर

$
0
0
भरधाव वेगाने जाणारी वाहने, रस्ता ओलांडण्यासाठी विद्यार्थ्यांची सुरू असणारी धावपळ, वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती अशा परिस्थितीमुळे शहराच्या मध्यवस्तीतल्या शाळांसमोरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

‘दरवाढ टप्प्याटप्प्याने करायला हवी होती’

$
0
0
‘अच्छे दिन आनेवाले है’ असे म्हणणाऱ्या मोदी सरकारने केलेल्या रेल्वेच्या भाडेवाढीवर प्रवासी आणि संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे अनेक दिवसांपासून तोट्यात आहे, हे मान्य असले तरी रेल्वे भाडेवाढ टप्प्याटप्प्याने करण्याची आवश्यकता होती, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

RBI च्या बनावट कॉलपासून सावधान!

$
0
0
मी रिझर्व्ह बँकेच्या कॉल सेंटरमधून बोलतोय, तुमचे डेबिट कार्ड तीन तासांत बंद होणार आहे. ते बंद होऊ द्यायचे नसेल, तर आम्हाला आवश्यक माहिती द्या....’…असा कॉल तुम्हाला आला असेल, तर सावध व्हा. हा कॉल फसवा आहे.

मतदानाबाबत सुशिक्षित उदासीनच

$
0
0
पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे कमी मतदान झाले. पदवीधर मतदारसंघात फक्त २५ टक्के, तर शिक्षक मतदारसंघासाठी सुमारे ५२ टक्के मतदान झाले आहे.

कुत्र्यांच्या नसबंदीत महापालिकेला अपयश

$
0
0
शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील सर्वच भागातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने हैराण झालेले असताना या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यात पालिका प्रशासन अयशस्वी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

विद्यापीठाच्या परवानगीविना प्रवेश दिल्यास कारवाई

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या ज्या ७१ कॉलेजांना नवे प्रवेश करण्यास बंदी घालण्यात होती, त्यांनी विद्यापीठाचा निर्णय डावलून परस्पर प्रवेश दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या कॉलेजांना विद्यापीठाच्या परवानगीनेच प्रवेश देता येणार आहेत.

जमीन पाहण्यासाठी गेलेल्या गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून

$
0
0
सातारा रोडजवळील गुजर-निंबाळकरवस्ती परिसरात जमीन पाहण्यासाठी गेलेला रेकॉर्डवरचा गुन्हेगार परशुराम आबा जाधव याचा गोळ्या झाडून खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. कारमध्ये आलेल्या हल्लेखोरांनी जाधवचा चालक आणि मित्रासमोरच गोळीबार केला आणि त्यानंतर तेथून पळ काढला.

बीआरटी चक्रव्यूहातून कधी सुटणार?

$
0
0
‘ट्रान्स्फर टर्मिनल’ आणि ‘आयटीएस’बाबत महापालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आळंदी-नगर रोडवरील बीआरटी चक्रव्यूहातून कधी सुटणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘एलबीटी’ची गुंतागुंत सोडवायला वेळ लागेल

$
0
0
‘‘एलबीटी’चा प्रश्न गुंतागुंतीचा असून, त्यावर तोडगा काढणे सोपे नाही. आगामी काळात संपूर्ण राज्यात ‘एलबीटी’बाबत समान धोरण राबवणे आवश्यक असून, यासाठी एकमत करूनच निर्णय घेतला जाईल,’ असे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘एलबीटी’च्या प्रश्नाचे घोंगडे भिजतच राहणार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सुचवले आहे.

विकासाचे सर्वाधिक निर्णय माझेच

$
0
0
‘विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे,’ असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केला. ‘सत्तेवर असताना राज्याच्या विकासासंदर्भातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण निर्णय मी घेतले आहेत.

‘तपासावर लक्ष ठेवण्यासाठी याचिका’

$
0
0
दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आल्यानंतर आता सीबीआयच्या तपास कामावर लक्ष ठेवण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे डॉ. दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी सांगितले.

‘एलबीटी’चे उत्पन्न १० कोटींनी घटले

$
0
0
शहरातील व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था करासह (एलबीटी) अन्य कोणताही कर भरण्यास नकार दिल्याने व्यापाऱ्यांकडून दर महिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नात काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत चालू महिन्या‌त दहा कोटी रुपये कमी एलबीटी पालिकेकडे जमा झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्टंटबाजी

$
0
0
शहराच्या व्यापक हितासाठी यापूर्वी अभावानेच आंदोलनाच्या दिशेने वळणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी वॉर्डातील स्थानिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले.

महामार्गावर पुन्हा लूटमार

$
0
0
जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर इंद्रायणी पुलाजवळील ढाब्यावर चहा पिण्यासाठी उतरलेल्या प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील पावणे चार लाख रुपयांचा ऐवज शुक्रवारी पहाटे लुटण्यात आला. चोरट्यांच्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजीनाम्याची सूचना नाही : मुख्यमंत्री

$
0
0
‘मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याबद्दल मला अद्याप कोणीही सांगितलेले नाही. कोणताही निर्णय होईपर्यंत राज्यातील जनतेसाठी मी निष्ठेने काम करीत राहणार आहे,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पेट्रोलिंगसाठी इंधनच नाही

$
0
0
महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात गाड्या असल्या, तरी डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा होत नसल्यामुळे महामार्ग पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या जागेवरच थांबल्या असून, महामार्गाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे.

चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू

$
0
0
ट्रॅक्टरच्या धडकेने पडलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावरून चाक गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कोंढवा रोडवर येवलेवाडी येथे सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अमर स्वामी फेकरी (रा. कैलास हाईट प्लॉट, नवी मुंबई) असे अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

कॉलेजांचे पर्याय नोंदविताना विद्यार्थ्यांची दमछाक

$
0
0
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यावर कॉलेजांचे पर्याय नोंदविताना शहरातील विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून रिक्षाचालकाची आत्महत्या

$
0
0
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) घरे बांधल्यानंतरही ती लाभार्थींना न देता भाड्याने देऊन पैसे कमवत असलेल्या बांधकाम व्यावसायिकामुळे शनिवारी एका रिक्षाचालकाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

कायदा अस्तित्वात असेपर्यंत एलबीटी भरणा वेळेत करावा

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द केला जावा, अशी आग्रही भूमिका व्यापाऱ्यांकडून मांडण्यात येत असतानाच, हा कायदा अस्तित्वात असेपर्यंत सर्व व्यावसायिकांनी एलबीटी भरणा वेळेत करावा, असे आवाहन ‘दी पूना मर्चंट्स चेंबर’तर्फे शनिवारी पुन्हा करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images