Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

धोकादायक इमारतींची पाहणी ‘स्पेशल स्क्वाड’द्वारे होणार

$
0
0
पावसाळ्यातील संभाव्य जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शहरातील धोकादायक इमारतींची पुनर्तपासणी करण्यात येणार असून, त्याकरिता ‘स्पेशल स्क्वाड’ नेमण्यात आले आहे. यामुळे, पालिकेला धोकादायक इमारतींची माहिती तत्परतेने समजू शकणार असून, अशा इमारती त्वरेने रिकाम्या करून घेणेही शक्य होणार आहे.

वारकऱ्यांच्या आतिथ्यासाठी पुणेकर नागरिक सरसावले

$
0
0
संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या पालख्यांसोबत पुण्यात दाखल झालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी नेहमीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक संस्था, गणेश मंडळे आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. चहापाण्यापासून अन्नदान, रेनकोट वाटप आणि वैद्यकीय सेवेपर्यंतची मदत वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली.

तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पैकिंकरा

$
0
0
मुखी विठ्ठलनाम, मनी विठुरायाचेच ध्यान असलेला आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन मैलोनमैलाच्या प्रवासासाठी सज्ज झालेला लाखो वैष्णवांचा महामेळा शनिवारी सायंकाळी पुण्यनगरीत दाखल झाला.

मतदार नोंदणीपासून नागरिक दूरच

$
0
0
मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत शनिवारी पाच हजार जणांनी अर्ज दाखल केले. ही संख्या पाहता या मोहिमेबद्दल अधिक व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी सांगितले.

आठवडा उलटूनही पुस्तके नाहीत!

$
0
0
शालेय प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याच्या घोषणेला यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच खो बसला आहे. पुस्तकांच्या वाहतुकीसाठी नेमलेल्या वितरकांकडे वाहनाची व्यवस्थाच नसल्याने पाठ्यपुस्तकांबाबत अडचण निर्माण झाल्याची बाब संबंधित अधिकाऱ्यांकडून पुढे करण्यात येत असली, तरी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे नियोजन फसल्यानेच ही अडचण निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.

बस खरेदीसाठी PMPची दौलतजादा

$
0
0
‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’तर्फे करण्यात येणारी बसखरेदी पुन्हा वादात सापडली असून, पाचशे बससाठी ५० कोटी रुपये जादा खर्च होणार आहे. त्यामुळे, केंद्राला सादर केलेल्या मूळ दरांनुसारच बसखरेदी केली जावी, अशी मागणी काँग्रेसने पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.

‘‘एलबीटी’ला राजकीय हेतूने विरोध’

$
0
0
‘शहराच्या विकासासाठी स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून आवश्यक असलेला विकास निधी व्यापारी देतात; मात्र काही व्यापारी प्रति‌निधी एलबीटी भरण्यास राजकीय हेतूने विरोध करत आहेत. राज्यात काँग्रेसबरोबर सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही या विरोधात भूमिका घेत आहेत,’ असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी केला.

पालख्यांच्या स्थळी पार्किंगबंदी

$
0
0
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम असलेल्या भागांमध्ये रविवारी सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या-जाण्यास आणि या परिसरात पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे.

आयटीची ऐटीत दिंडी

$
0
0
आयटी क्षेत्रात विविध कंपन्यात काम करणाऱ्यांच्या आयटी दिंडीतही गेल्या वर्षीप्रमाणे यंदा उत्साहाचे वातावरण होते. आठ वर्षांपूर्वी आठ व्यक्तींनी सुरू केलेल्या या दिंडीमध्ये आज पावणे चारशे जण सहभागी झाले होते. यंदा सामाजिक उपक्रमावर भर देण्यात आला आहे.

पालखीच्या स्वागतासाठी सासवडवासीय सज्ज

$
0
0
पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी प्रशासन आणि पालिकेने केली असून दिवे घाट माथा विसावा ते सासवड मुक्काम तळ या जागांची पाहणी पुरंदर-दौंड विभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे आणि पोलिस उप अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी एकत्रितपणे करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यावर अधिक भर दिला.

शास्तीकर आकारणीविरोधात थेरगाव येथे मोर्चा

$
0
0
अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणाऱ्या शास्तीकर आकारणीच्या विरोधात माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव करसंकलन कार्यालयावर नुकताच मोर्चा काढण्यात आला.

भाविकांनाही चोरट्यांचा हिसका

$
0
0
आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही चोरट्यांनी हिसका दाखविला. याप्रकारच्या दोन घटना पिंपरी-चिंचवड परिसरात घडल्या.

गुजराती ‘केशर’ने खाल्ला भाव

$
0
0
गुजरातच्या ‘केशर’ आंब्याचा भाव वधारला आहे. बाजारपेठेत त्याची विक्री ८० ते १०० रुपये किलो दराने सुरू आहे. रविवारी मार्केट यार्डमधील बाजारपेठेत एक ते दोन टन केशर आंब्याची आवक झाली.

आवक मंदावल्याने भाजीपाला महागला

$
0
0
वळवाच्या पावसाची गैरहजेरी, कडाक्याचा उन्हाळा, गारपीट आणि मान्सूनची अनुपस्थिती या कारणांमुळे बाजारपेठेत भाजीपाला महाग झाला आहे. पालेभाज्यांच्या दरांमध्ये तेजी असून फळभाज्यांच्या किमतीमध्ये दहा ते वीस टक्यांनी वाढ झाली आहे.

रविवार सुटीचा दिन खास… पालखी दर्शनाची आस

$
0
0
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी व पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लहानांपासून वृद्ध पुणेकरांनी पहाटेपासूनच पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंगा विठ्ठल मंदिर येथे रविवारी गर्दी केली होती. सुटीचा दिवस असल्याने अनेक जण कुटुंबीयांसमवेतच दर्शनासाठी आले होते.

वारकरी सेवेतून रंगला पांडुरंग भक्तीचा सोहळा

$
0
0
पालखी मुक्कामी वारकरीवर्गाची केलेली सेवा-सुशृषा पांडुरंगीचरणी अर्पण होते, या श्रद्धेने शहर व परिसरातील संस्था-संघटना, व्यक्तींनी शनिवारपासून विविध उपक्रम आयोजित केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासन वारकऱ्यांना सुरू असलेला मदतीचा ओघ रविवारीही सुरू होता.

उत्तराखंडातील मृतांच्या नातेवाइकांना मदत

$
0
0
उत्तराखंडमधील महाप्रलयात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील २४ यात्रेकरूंच्या कुटुंबियांना प्रत्येकी साडेपाच लाख रुपयांची आर्थिक मदत वाटप करण्यात आली आहे. एका मृत यात्रेकरूच्या नातेवाइकांनी मदत घेण्यास नकार दिला आहे.

तरुणावर वार : आरोपींना पोलिस कोठडी

$
0
0
वस्तीतील वर्चस्व दाखविण्यासाठी तळजाई झोपडपट्टीजवळून पायी चाललेल्या तरुणावर तलवारीने वार केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या पाचजणांना २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

औषधनिर्माण अधिकाऱ्यांचाही संपाचा इशारा

$
0
0
सहाव्या वेतन आयोगात सुधारित वेतन-श्रेणी लागू करावी, कंत्राटी अधिकाऱ्यांचे वेतन वाढवावे, पदोन्नतीच्या संधी देण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी शासकीय औषध निर्माता कर्मचारी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (सोमवारी) धरणे आंदोलन करणार आहे.

बाजीराव रोडवर वारकऱ्याचा मृत्यू

$
0
0
बाजीराव रोडवर नू. म. वि. जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडला. नंदकिशोर राधेशाम शर्मा (वय ५९, रा. राजस सोसायटी, कात्रज) असे अपघातात ठार झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images