Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कांद्याचे दर वाढण्याची शक्यता

$
0
0
कांद्याचा हंगाम संपत आल्यामुळे आगामी काळात दर वाढण्याची शक्यता आहे. सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक १०० गाड्यांपर्यंत होत असून घाऊक बाजारपेठेत दहा किलो कांद्याचा दर २०० रुपयांच्या पुढे गेला आहे. किरकोळ बाजारपेठेत कांद्याची विक्री २५ ते ३० रुपये किलोने सुरू आहे.

एलबीटीबाबत अद्याप संभ्रमच

$
0
0
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच एलबीटीची वसुली पालिकेऐवजी विक्रीकर विभागाकडे देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याने यापुढील महिन्यांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा होणार का, याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

चळवळ… गृहनिर्माण सोसायट्यांची

$
0
0
गृहनिर्माण सोसायट्यांना सध्या देखभाल शुल्क वसुलीपासून ते डीम्ड कन्व्हेयन्सपर्यंत विविध समस्या भेडसावत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पुणे शहर दक्षिण-पश्चिम विभागीय सहकारी गृहनिर्माण महासंघाने (नियोजित) पुढाकार घेतला आहे.

सेन्सॉर सर्टिफिकेट बंधनकारक

$
0
0
भारतातील सर्व टीव्ही चॅनेल्सनी कोणताही चित्रपट किंवा ट्रेलर दाखविण्यापूर्वी सेन्सॉर सर्टिफिकेट दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्यातर्फे ही सूचना देशभरातील सर्व टीव्ही चॅनेल्सना करण्यात आली असून, त्याचे पालन न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

‘शिवाजीनगर’च्या मेकओव्हरला मान्यता?

$
0
0
शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचे मेकओव्हर करण्यासाठी रेल्वेकडून तयार करण्यात आलेल्या ‘मास्टर प्लॅन’ ला मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने मान्यता दिली असून लवकरच हा प्लॅन मान्यतेसाठी पुणे महापालिकेला देण्यात येणार आहे.

मार्ग होईजे श्रीरंगे

$
0
0
पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व आहे. पंढरीचा पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा चित्सूर्य आहे. आणि चैतन्याचा प्रासादिक स्त्रोत आहे. ज्ञानोबा-तुकोबा ही त्या विश्वाची ऊर्जा आहे. सर्वाभूती भगवदभाव हा त्या विश्वाचा वैश्विक धर्म आहे.

पुण्यातील संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये

$
0
0
कॅन्सरच्या प्रत्येक प्रकारच्या पेशंटला नव्या पद्धतीने स्वतंत्र उपचार करणे प्रत्येक वेळी शक्य नसल्याने ‘ओव्हॅरियन’ अर्थात स्त्री बीजांडकोषाच्या कॅन्सरच्या ट्युमरचे तीन प्रकारचे ‘मॉलिक्युलर सबटाइप’ (ग्रुप) शोधून काढण्यात आले आहेत.

वाघांच्या शिकारींच्या तपासासाठी सायबर सेल

$
0
0
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या शिकाऱ्यांना पाच वर्षांचा सश्रम कारवास दिल्याने वन्यजीवांची शिकार हा गंभीर गुन्हा असल्याचा संदेश कोर्टाने समाजाला दिला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिकाऱ्यांना पकडण्यात आले आहे.

ही तर नागरी असुविधा केंद्रे

$
0
0
कडाक्याचे ऊन.. कोणताही आडोसा नाही... अर्जासाठी रांग... बसण्याची व्यवस्था नाही.. कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत मार्गदर्शन नाही... त्रासलेले विद्यार्थी आणि नागरिक..

पुण्याचे दीडशे विद्यार्थी ‘आयआयटी’च्या रँकमध्ये

$
0
0
‘आयआयटी’चे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या ‘जेईई अॅडव्हान्स्ड’मध्ये पुण्याच्या विद्यार्थ्यांनी यंदा चमकदार कामगिरी नोंदविली. आर्मी पब्लिक स्कूलच्या कल्पेश कृष्णा याने देशात ९३ वी रँक मिळवत, पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान पटकावला.

इराकमध्ये अडकलेले पुणेकर ‘नेटिझन’ सुखरूप

$
0
0
पुण्यातील एका आयटी कंपनीचे इराकमध्ये अडकलेले सात कर्मचारी सुरक्षित स्थळी असून सुखरूप आहेत. सध्या ते इराकमधील कर्बाला या शहरात असून त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे.

‘पदवीधर-शिक्षक’ची आज निवडणूक

$
0
0
विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवारी) मतदान होणार आहे. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील अकराशे मतदान केंद्रांवर आज सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे.

गावठाणे फुगणार

$
0
0
शहर आणि जिल्ह्यातील गावठाणांची हद्दवाढ करण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी मान्यता दिली. त्यामुळे शहरालगत आणि अन्य गावांमध्ये निवासी वापरांसाठी मोठ्या प्रमाणावर क्षेत्र उपलब्ध होणार आहे. या गावांमध्ये दोनशे ते दीड हजार मीटर इतके क्षेत्र गावठाण हद्दीत येणार आहे.

डीएनए गोळा करण्याचे काम हाती

$
0
0
‘भारताच्या तिन्ही संरक्षण दलांमध्ये धोकादायक ठिकाणी काम करणारे अधिकारी आणि जवानांच्या ‘डीएनए’चे नमुने गोळा करून त्यांची साठवणूक करण्याचा प्रकल्प लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे (एएफएमसी) राबवण्यात येत आहे.

मान्सूनची दौड पुन्हा सुरू

$
0
0
चार दिवसांच्या ब्रेकनंतर राज्यात मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरू झाली आहे. गुरुवारी मान्सून अहमदनगर, नाशिकसह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत, तसेच नागपुरात दाखल झाला. मान्सून दोन दिवसांत विदर्भाच्या उर्वरित भागांत दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे.

आठ लाख रुपये लपवले

$
0
0
‘नाबार्ड’कडून गोंदिया येथील एका स्वयंसेवी संस्थेला देण्यात येणारे अनुदानाचे आठ लाख २१ हजार रुपये गोंदियातील एका महिलेच्या अकाउंटवर चुकून वर्ग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रायसोनी पतसंस्थेने गाशा गुंडाळला

$
0
0
कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार करणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेने पुण्यासह राज्यातील शाखांचा गाशा अचानक गुंडाळल्याने ठेवीदार चिंताग्रस्त झाले आहेत.

छ्या... ही कसली ‘बीआरटी’?

$
0
0
सातारा-सोलापूर रोडपाठोपाठ आता आळंदी-नगर रोडवरील पीएमपीच्या मार्गाला ‘बीआरटी’ म्हणून संबोधण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात मात्र ती ‘बीआरटी’ नाहीच! स्थानिक सेफ्टी ऑडिटमध्ये काठावर पास करण्यात आलेल्या या ‘पुणेरी बीआरटी’ला आंतरराष्ट्रीय मानांकनात गुणांचे खातेही उघडता आलेले नाही.

मिळेल ते काम करत राहीन!

$
0
0
‘काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतात. ते जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. जे काम मिळेल ते करत राहीन,’ असे सांगतानाच, ‘सध्या तरी मला कोणी काही सांगितलेलं नाही आणि बोलावलेलंही नाही,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

‘सॅमसंग’ला ग्राहक मंचाचा दणका

$
0
0
वॉरंटीच्या काळात बिघाड झालेला आणि दुरुस्तही होऊ न शकलेला मोबाइल हँडसेट बदलून न देता ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी सॅमसंग कंपनीने तक्रारदाराला मोबाइलची मूळ किंमत २० हजार ८०० रुपये परत करावी, असा आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images