Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बिल्डरला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

$
0
0
दांडेकर पुलानजीक भिंत कोसळून झालेल्या अपघातामध्ये तीन महिला दगावल्यानंतरही गेल्या वर्षभरात संबंधित बिल्डरवर कोणतीही कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी पालिकेवर मूक मोर्चा काढण्यात आला.

वेळकाढूपणामुळे ‘एसओपी’ चार वर्षे धूळ खात

$
0
0
राज्य वीज नियामक आयोगाच्या वेळकाढू धोरणामुळे वीजपुरवठा आणि ग्राहकसेवाची कृतिमानके (एसओपी) गेली चार वर्षे धूळ खात पडली आहेत. दोनवेळा यावर हरकती-सूचना मागविण्याचा फार्स झाल्यानंतरही अद्याप त्यांना अंतिम रूप मिळालेले नाही.

बोर्ड समिती सदस्यत्वासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

$
0
0
पुणे कॅटोन्मेंट बोर्डाची कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर नेमण्यात येणाऱ्या त्रिसदस्यीय समितीत नामनिर्देशित सदस्य म्हणून स्थान मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

५० स्मरणपत्रे पाठवूनही मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष

$
0
0
‘मृत जनावरांच्या विल्हेवाटीसाठी पालिकेने मुंढवा परिसरात उभारलेला कारकस प्रकल्पातील अडचणींबाबत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आजपर्यंत ५० स्मरणपत्रे (रिमाइंडर) पाठवली. मात्र त्याची कोणतीही दखल अद्याप घेतली गेलेली नाही,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी आपली नाराजी व्यक्त केली.

श्याम कोपर्डेकर यांचे निधन

$
0
0
गेली ‘इंद्रायणी साहित्य प्रकाशन’चे संचालक श्याम दयार्णव कोपर्डेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

प्रत्येक जिल्ह्यासाठी एकच जात पडताळणी समिती

$
0
0
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गासाठी असलेल्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या बरखास्त करून, आता प्रत्येक जिल्ह्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आम्ही फेटे नेले नाही, आम्ही पैसे देणार नाही!

$
0
0
महापालिकेच्या उद्घाटन कार्यक्रमातून गायब होऊन माननीयांच्या घरी गेलेल्या फेट्यांची किंमत नगरसेवकांच्या मानधनातून वसूल करण्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. ‘आम्ही फेटे बांधले नाहीत, आम्ही पैसे देणार नाही’ असे सांगत मानधनातून हे पैसे कापून घेण्यास ‘माननीयांनी’ विरोध केला आहे.

इंजिनीअरिंगच्या राज्यात ७,७५९ जागा वाढल्या

$
0
0
राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांतील जागा गेली काही वर्षे सातत्याने रिक्त राहत असूनही यंदा राज्यात तब्बल साडेसात हजारांहून अधिक जागांना नव्याने मान्यता मिळाली आहे. राज्यात यंदा आठ नव्या इंजिनीअरिंग कॉलेजेसनाही मान्यता मिळाली आहे.

शिंदेवाडी येथे कंट्रोल रूम सुरू करणार

$
0
0
गेल्या वर्षी पावसाळ्यात शिंदेवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महसूल प्रशासनाने सावधगिरीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी स्वतंत्र कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार आहे.

आपले नाव न वापरण्याचा ‘यूपीएससी’कडून इशारा

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) नाव चुकीच्या पद्धतीने वापरणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि कोचिंग क्लासच्या विरोधात जागरूक राहण्याचे आवाहन खुद्द ‘यूपीएससी’नेच नागरिकांना केले आहे.

६८ कोटी रुपये भरण्याची सहा मल्टिप्लेक्सना नोटीस

$
0
0
प्रेक्षकांकडून बेकायदा करमणूक कर आकारणाऱ्या शहरातील सहा मल्टिप्लेक्स थिएटरना ६८ कोटी ६५ लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्याची नोटीस करमणूक कर विभागाने बजावली आहे. ही रक्कम न भरल्यास थिएटर बंद करण्याबरोबरच बँक खाती गोठवण्याच्या कारवाईची तंबी नोटिशीद्वारे देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या ‘दुखण्यां’वर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचे ‘मलम’

$
0
0
वर्गामध्ये बसण्यासाठी बेंचेस आरामदायी नाहीत..., क्लासरूममध्ये एसी असावा...,लायब्ररीमध्ये अद्ययावत पुस्तके, जर्नल्स नाहीत..., मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून स्कॉलरशिप नाही.. मुलींसाठी हॉस्टेल अपुरे...

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या डॉक्टरला अटक

$
0
0
मारहाण झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

ग्रामपंचायत निवडणुकीने घेतला बांदल यांचा बळी

$
0
0
बावधन ग्रामपंचायतीची निवडणूक शिक्षण संस्थाचालक संदीप बांदल यांच्या जीवावर उठल्याचे गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींच्या तपासात स्पष्ट झाले आहे. बांदल यांच्यावर गुरुवारी सकाळी करण्यात आलेला गोळीबार हा निवडणुकीतील परभावाचा वचपा काढण्यासाठी केला गेल्याचे उघड झाले आहे.

नाव काहीही द्या; पण निधी अडवू नका!

$
0
0
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (जेएनएनयूआरएम) शहराला कोट्यवधींचा निधी मिळाला असून, आणखी काही प्रकल्पांची कामे सुरू आहेत. शहराच्या विकासासाठी हे प्रकल्प आवश्यक असल्याने या योजनेला कोणतेही नाव द्या; पण त्यासाठीचा निधी अडवू नका.

नागरिक नाराज आहेत, हे मान्यच केले पाहिजे!

$
0
0
‘लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल पाहता लोक आमच्यावर नाराज आहेत, हे मान्यच केले पाहिजे. निवडणुकीत कुठे कमी पडलो याचा संपूर्ण अभ्यास करून आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार आहोत,’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

‘राष्ट्रवादी’ला जादा जागा हव्यातच

$
0
0
‘लोकसभेत कॉँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉँग्रेसला जास्त जागा मिळाल्याने आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात, या मागणीवर आम्ही ठाम राहणार आहोत,’ अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

शाळेचा पहिला दिवस औत्सुक्याचा…

$
0
0
शाळांच्या आवारामध्ये लावलेली कार्टून हिरोंची मोठ-मोठी कट-आउट्स.... पालकांना सूचना करण्यासाठी रंगबेरंगी खडूंनी रंगविलेले फळे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी काढलेल्या तितक्याच आकर्षक रांगोळ्या...

पोलिस भरती हवी ‘सुरक्षित’

$
0
0
पोलिस भरतीवेळी पाच किलोमीटर धावण्याची पात्रता चाचणी उमेदवारांच्या जीवावर बेतल्याचे चित्र आहे. राज्यात या चाचणीवेळी चौघांचा बळी गेल्याने पुणे पोलिसांनीही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

एलबीटी नको, तर जकात द्या

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करताना महापालिकेला आपली स्वायत्तता टिकविण्यासाठी जकात वसूल करण्याचे अधिकार मिळावेत, अशी भूमिका पालिकेची असल्याचे महापौर चंचला कोद्रे यांनी सोमवारी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images