Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अकरावी प्रवेश गुरुवारनंतरच

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडील (बोर्ड) विद्यार्थ्यांची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीला उशिराने उपलब्ध होणार असल्याने, अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशीरा सुरू होणार आहे.

दहावीचा निकाल आज

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (१७ जून) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मात्र २६ जूनला मिळणार आहेत.

दहावीचा निकाल ८८.३२ टक्के

$
0
0
शालेय शिक्षणाचा शेवटचा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरवणारा दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्याच्या नऊ विभागांतून या परीक्षेला बसलेल्या १७ लाख २८ हजार ३६८ विद्यार्थ्यांपैकी ८८.३२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा आजवरचा सर्वोत्तम निकाल आहे.

इथे पाहा दहावीचा निकाल

$
0
0
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी फक्त एक क्लिक करा.

‘PMP’कडून ७० कोटींची देणी थकली

$
0
0
आर्थिक बाजू कमकुवत असणाऱ्या पीएमपीच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यामुळे प्रशासनाकडून ७० कोटी रुपयांची देणी थकली आहेत. थकित रक्कम देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले तरी त्यांना अद्याप यश आलेले नाही, त्यामुळे देणी कधी दिली जाणार याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुण्याच्या आरोग्य परिमंडळात सातारा जिल्ह्याचा समावेश

$
0
0
प्रशासकीयदृष्ट्या आरोग्य विभागाचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी आरोग्य विभागाच्या पुणे विभागाच्या परिमंडळात पुणे, सोलापूरसह आता सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय मुंबई आणि कोल्हापूर परिमंडळातील जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातही बदल करण्यात आला आहे.

सरकारी दूध योजना बंद होण्याच्या मार्गावर

$
0
0
‘शासकीय दूध योजनेतील दूध संकलन घटल्यामुळे सरकारी दूध योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे,’ असे आरे दूध सरिता पूर्ण वेळ दूध केंद्रचालक संघटनेचे अध्यक्ष सुभाष हुगे यांनी स्पष्ट केले. सहकारी दूध संघातर्फे त्यांच्या दररोज होणाऱ्या संकलनाच्या २५ टक्के दूध सरकारला देणे गरजेचे आहे.

हुजूरपागा शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

$
0
0
किमान वेतन कायदा धाब्यावर बसवून काही कर्मचाऱ्यांना वर्षानवर्षे तुटपुंज्या पगारावर राबवून घेत असल्याचा आरोप करत हुजूरपागा शाळेच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

‘स्मार्ट’ ग्राहकांचा ‘पीसी’ला बाय बाय

$
0
0
दिवसेंदिवस अधिकाधिक स्मार्ट होत चाललेल्या स्मार्टफोनमुळे आणि लॅपटॉपसाठीच्या वाढत्या मागणीमुळे पर्सनल कम्प्युटरची (पीसी) मागणी कमी होऊ लागली आहे. जागतिक बाजारपेठेत पीसींच्या मागणीत मागील वर्षात (२०१३) जवळपास दहा टक्क्यांनी घट झाली होती.

रस्त्यांची कामे रखडली

$
0
0
नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे भोरमधील रस्त्यांची कामे रखडली आहेत. नगर परिषदेकडे पुरेसा निधी उपलब्ध असूनही रस्त्यांची कामे न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

येरवड्यातील ग्रंथालयात ताज्या पुस्तकांची वानवा

$
0
0
येरवडा परिसरातील गरजू विद्यार्थ्यांकरिता सुरू केलेल्या ग्रंथालयामध्ये पुस्तकांच्या ताज्या आवृत्त्या उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदी करावी लागत आहेत. येरवडा परिसरात अनेक गरीब कुटुंबे राहत असून, या भागात झोपडपट्टीही आहे.

धनकवडी उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी

$
0
0
सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील रेंगाळलेल्या उड्डाणपुलाच्या कामाबाबत पतित पावन संघटनेनच्या पर्वती विभागाने अहिल्यादेवी चौकात निदर्शने केली. ‘उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन दोन ते तीन वर्षे होत झाली आहेत. मात्र, प्रशासन आणि ठेकेदारांच्या संगनमताने उड्डाणपुलाचे काम संथगतीने होत आहे.

पुरंदर योजना शेतीसाठी ‘शाप’

$
0
0
पुरंदर उपसा सिंचन योजनेचा फायदा कोरडवाहू जमिनींसाठी होईल, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र ही योजना शेतीसाठी शाप ठरत आहे. पुरंदरसह चार तालुक्यातील दुष्काळी भागांसाठी सुरू झालेल्या या योजनेमुळे अनेक तोटे होत असून, उभी पिके डोळ्यासमोर वाळत चाललेली आहेत.

जागेच्या नुकसानभरपाईसाठी पालिकेची टाळाटाळ

$
0
0
शहरात झालेल्या युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या काळात रस्तारुंदीकरणासाठी जबरदस्तीने जागा ताब्यात घेणाऱ्या पालिकेने जागा मालकाला त्याची नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे.

पिंपरीच्या नगरसेविका निघाल्या महाबळेश्वरला

$
0
0
महापालिकेतील सर्वसाधारण सभेचे शास्त्र काय आहे, कायद्यातील तरतुदी कशा आहेत, याबाबतची माहिती घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वपक्षीय तीसहून अधिक नगरसेविका बुधवारी (१८ जून) महाबळेश्वरला प्रशिक्षण दौऱ्याला निघाल्या आहेत.

मायलेकींना मारहाण करून ७५ हजारांचा ऐवज लांबवला

$
0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ताजे-पिंपळोली पेट्रोल पंपासमोर मार्गालगत उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून कारमधील मायलेकींना लोखंडी सळईने मारहाण करत त्यांच्याजवळील ७५ हजार रुपयांच्या ऐवजांसह पासपोर्ट लुटल्याची घटना सोमवारी पहाटे तीनच्या दरम्यान घडली.

‘मंगळावरील जीवसृष्टीचा शोध शक्य’

$
0
0
मंगळावरील वातावरणात मिथेन वायू आहे का, याचा शोध मंगलयान मोहिमेत घेण्यात येणार असून त्याआधारे याठिकाणी जीवसृष्टी होती का याचा शोध घेतला जाणार असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद काळे यांनी सांगितले.

वारीचे पैलू उलगडणार सांस्कृतिक कार्यक्रमातून

$
0
0
महाराष्ट्राची वारी म्हणजे हजारो वर्षांपासून चालत आलेला सांस्कृतिक आणि धार्मिक ठेवा! या वारीतील समरसता, अध्यात्म असे विविध पैलू ‘वारी : सेलिब्रेट द सेक्युलर स्पिरिट ऑफ महाराष्ट्र’ (वारी : महाराष्ट्रातील धर्मनिरपक्षेतचा उत्सव) या अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमातून उलगडणार आहेत.

यात्राकाळात देहू, आळंदीला जादा बस

$
0
0
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीने आळंदी आणि देहू येथे जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. पीएमपीतर्फे १७ ते २० जून या कालावधीत ६५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

रेडझोन मोजणीच्या खर्चावरून तिढा

$
0
0
देहूरोड दारूगोळा भांडाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन हजार यार्डापर्यंतच्या रेडझोनच्या मोजणीचा ४२ लाख रुपये खर्च महसूल खात्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न लष्कराकडून केला जात आहे. मात्र, महसूल खात्याने ही रक्कम लष्कराने भरावी, अशी भूमिका घेतल्याने त्याबाबत तिढा निर्माण झाला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images