Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुलांच्या पालकांना नोकरी द्या

$
0
0
बालहक्क कायदा अस्तित्वात असताना आजही शहरातील हॉटेल, ढाबे आणि छोट्या कार्यालयांमध्ये लहान मुले काम करीत आहेत. या मुलांना कामावर ठेवण्याऐवजी त्यांच्या पालकांना नोकरी देऊन पुरेसा पगार द्या, असे आवाहन बालहक्क कृती समितीने केले आहे.

कायदे कागदावर, मुले कामावर

$
0
0
बालकामगारांच्या नियंत्रणासाठी कितीही कायदे कागदावर असले तरी पुण्यातील हॉटेलचालकांकडे सर्वाधिक बालमजूर कामाला असून त्यांच्यावर मालकांकडून शारीरिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक असल्याचे माहिती ‘चाइल्ड लाइन’च्या ‘बालसेने’नी शोधली आहे.

थेंबे थेंबे तळे साचे...

$
0
0
गेली तेरा वर्षे भरता भरत नसलेला अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा संमेलन निधी (महाकोश) अखेरीला एक कोटींवर पोहोचला आहे. साहित्य संमेलन स्वयंपूर्ण करण्यासाठी सुरू हाती घेण्यात आलेल्या महाकोश निधीची रक्कम ‘थेंबे थेंबे..’ करत एक कोटींच्या ‘ड्रीम फीगर’पर्यंत पोहोचली आहे.

पासपोर्टसाठी बोगस सह्या केल्या

$
0
0
मुलांच्या पासपोर्टसाठी पतीच्या नावाच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी पतीने आपल्या पत्नीविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्याचे एकमेकांशी पटत नसल्याने त्यांचा कोर्टात वाद सुरू आहे.

‘संतसूर्य तुकाराम’ प्रकरणी प्रकाशक हायकोर्टात जाणार

$
0
0
‘संतसूर्य तुकाराम’, ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ या संत चरित्रात्मक कादंबऱ्या नष्ट करण्याच्या प्रथम वर्ग कोर्टाच्या निर्णयानंतर प्रकाशक सुनील मेहता हायकोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

पदवीधर मतदारसंघासाठी ‘सर्च इंजिन’

$
0
0
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदारांसाठी आता स्थानिक पातळीवर सर्च इंजिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारांना यादीत नाव शोधणे अधिक सुलभ होणार आहे.

उड्डाणपुलांची कामे रेंगाळलेलीच

$
0
0
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी विविध भागात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलांची कामे अद्याप रेंगाळलेलीच आहे. गेली अनेक वर्षे उड्डाणपुलांची कामे सुरू असल्याने वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी त्यात भर पडून पुणेकरांच्या मनस्ताप वाढत आहे.

माहितीपुस्तिका ‘आउट ऑफ स्टॉक’

$
0
0
प्रवेशाच्या ऐन धामधुमीच्या काळात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी आवश्यक माहितीपुस्तिकाच ‘आउट ऑफ स्टॉक’ होण्याचा प्रकार पुण्यातील अकरावी प्रवेश मार्गदर्शन केंद्रांवर घडला.

स्मार्टफोन आता बनले…‘फॅमिली’!

$
0
0
पुण्यातील दहापैकी नऊ टीनएजर्सकडे मोबाइल असून पुण्यातील ३८.८२ टक्के मुले तर देशातील ३२.७१ टक्के मुले दररोज अर्धा ते एक तास इंटरनेट वापरत आहेत. केवळ करिअर-चॅटिंगच नव्हे, तर कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहण्यासाठी ‘सोशल मीडिया’च प्रभावी असल्याचे पुण्यातील ७९.८१ टक्के आणि देशभरातील ५८.२७ टक्के मुलांना वाटत आहे.

मतिमंद मुलीवर पणदरे येथे बलात्कार

$
0
0
खाऊचे आम‌िष दाखवून अल्पवयीन मतिमंद मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पणदरे (ता. बारामती) येथे उघडकीस आली आहे. संबंधित मुलीला तिच्या आईने पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले असता हा प्रकार उघड झाला.

जळालेली बेकरी पुन्हा सुरू

$
0
0
हडपसर परिसरात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकाने काळेपडळ येथील वेलकम बेकरी जाळली होती. मालक इफ्तखार अहमद अन्सारी यांनी मोठ्या हिमतीने बेकरी पुन्हा उभी केली आहे.

बेकरीवर दगडफेक करणाऱ्या ५ जणांना पोलिस कोठडी

$
0
0
बेकायदा जमाव करुन हडपसर येथील काळेपडळ येथील पटेल बेकरीवर दगडफेक करुन ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अटक केलेल्या पाचजणांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोहसीन शेख प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम सरकारी वकील

$
0
0
सोशल मीडियावरून महापुरुषांची आक्षेपार्ह चित्रे प्रसिद्ध झालेल्या प्रकारातून निर्माण झालेल्या रोषातून हडपसर येथे मोहसीन शेख या तरुणावर हल्ला करून त्याचा खून केल्याच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम काम पाहणार आहेत.

धनंजय देसाईला १ दिवसाची कोठडी

$
0
0
मोहसीन शेख या तरुणाच्या खून प्रकरणी अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याच्यासह तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. झांबरे यांच्या कोर्टाने बुधवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

‘ICT’ गुणांमुळे निकाल लांबला

$
0
0
दहावीच्या अभ्यासक्रमात यंदा पहिल्यांदाच अनिवार्य म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या ‘इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी’च्या (आयसीटी) गुणांमुळे दहावीचा निकालास विलंब होत असल्याची माहिती आता समोर येत आहे. या विषयाच्या गुणांच्या डेटा एन्ट्रीचे काम लांबल्यानेच हा विलंब होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

‘रायसोनी’भोवती ‘CBI’चा फास

$
0
0
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ‘सीबीआय’ने चौकशीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. पतसंस्थेने केलेल्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत बोलविण्यात आले आहे.

‘एलबीटी’चा फैसला आज?

$
0
0
स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) व्यापाऱ्यांची मते जाणून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार उद्या, गुरुवारी सर्वपक्षीय नेत्यांसह एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे. तर, ‘एलबीटी’ रद्द केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा कामगार संघटनांतर्फे देण्यात आला आहे.

मामलेदार कचेरीवर मेट्रो स्टेशन

$
0
0
महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) मामलेदार कचेरीच्या सुमारे दोन एकर भूखंडावर मेट्रो स्टेशनचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मेट्रो स्टेशनचे आरक्षण इतरत्र हलविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने महापालिका आयुक्त विकास देशमुख यांना पत्र देऊन चर्चेसाठी वेळ मागितली आहे.

वादळाने अडवली मान्सूनची वाट

$
0
0
नैर्ऋत्य मान्सूनने बुधवारी गोव्यासह कोकणात रत्नागिरीपर्यंत धडक मारली असून, येत्या दोन दिवसांत कोकण किनारपट्टीच्या उर्वरित भागांत त्याची आगेकूच होण्याची शक्यता आहे. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘नानौक’ या चक्रीवादळामुळे मान्सूनची महाराष्ट्रातील आगेकूच रोखली जाणार आहे.

विज्ञानातील प्रगतीबाबत राष्ट्रपती आग्रही

$
0
0
देशाची विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी उंचावण्यासाठी स्वतः राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही आग्रही आहेत. देशभरातील उच्चपदस्थ वैज्ञानिकांच्या एका बैठकीमध्ये राष्ट्रपतींनी त्या विषयीची आपली मते मांडली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images