Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शेकरूंची संख्या वाढली

$
0
0
भीमाशंकर अभयारण्यामध्ये यंदा झालेल्या प्रगणनेमध्ये 'शेकरू' व त्यांच्या घरटयांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले आहे. १९ मे ते ३१ मे या दरम्यान अभयारण्यातील बारा बीटमध्ये ही प्रगणना करण्यात आली.

वीज ग्राहकांना तात्पुरता दिलासा

$
0
0
‘महावितरण’च्या जुन्या थकबाकीपोटी आणखी सव्वासोळाशे कोटी रुपयांच्या वसुलीस राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी परवानगी दिली. मात्र, यासाठी लगेच वीज दरवाढ लागू करण्यास आयोगाने नकार दिला आहे.

आरक्षित फ्लॅटचे पैसे परत द्या

$
0
0
फ्लॅट आरक्षित केल्यानंतर उर्वरित रक्कम देणे शक्य झाले नाही म्हणून आरक्षण करण्यासाठी भरलेली रक्कम परत देताना ५० हजार रुपये कापल्याप्रकरणी तक्रारदाराला कापलेली रक्कम परत देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.

गदिमांचा शब्दठेवा समग्र स्वरूपात

$
0
0
आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांच्या अलौकिक शब्दसाहित्याचा प्रत्यय समग्र स्वरूपात जगभरातील साहित्यप्रेमींना घरबसल्या घेता येणार आहे.

वीज ग्राहकांना तात्पुरता दिलासा

$
0
0
‘महावितरण’च्या जुन्या थकबाकीपोटी आणखी सुमारे सोळाशे कोटी रुपयांच्या वसुलीस राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी परवानगी दिली. मात्र, यासाठी लगेच वीज दरवाढ लागू करण्यास आयोगाने नकार दिला आहे.

आळंदीतील खड्डे कायम

$
0
0
आषाढी यात्रेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असला, तरी श्री क्षेत्र आळंदी शहरातील प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. याबद्दल भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रदक्षिणा मार्गावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे वारकरी व भाविकांना चालताना मोठा त्रास होतो.

नव्या मंडईचा वाद कायम

$
0
0
शीला साळवे भाजी मंडईच्या जागेवर बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या नवीन मंडईविषयी गाळेधारकांशी बुधवारी येरवड्यात चर्चा करण्यात आली; मात्र अजून तरी नवीन मंडईचा वाद मिटला नसून, अजूनही गाळेधारकांमध्ये संभ्रम आहे.

अपंग कर्मशाळांचा आढावा घेणार

$
0
0
अपंगांना व्यावसायभिमुख शिक्षण देणाऱ्या कर्मशाळांमधे शिकविल्या जाणाऱ्या कोर्सेसचा आढावा अपंग कल्याण आयुक्तालय घेणार आहे. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून आवश्यकता असल्यास कोर्समध्ये बदल करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तालय राज्य सरकारला पाठविणार आहे.

मतदारयादीतील गोंधळाविरोधात तक्रार

$
0
0
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयादीत गोंधळ असून अनेक नावे दुबार किंवा तिबार आहेत. मतदान केंद्र मतदारांच्या घरापासून खूप दूर आहेत. तसेच, मराठी आणि इंग्रजीतील मतदार यादीत फरक आहे, अशी तक्रार कृषी पदवीधर मंचाचे उमेदवार हणमंतराव मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केली.

महिला मतदारांचा टक्का घटलेलाच

$
0
0
महिला मतदारांची संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट निवडणूक आयोगाने देऊनही पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महिला मतदारांचा टक्का कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये महिला मतदारांचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे.

मराठी कादंबऱ्या मरणासन्न

$
0
0
‘जागतिकीकरणाचे भान मराठी लेखनामध्ये आल्याचे दिसत नाही. त्यामुळे मराठी साहित्य ठरावीक चौकटीत अडकले आहे. मराठी कादंबऱ्या मरणावस्थेला लागल्या आहेत,’ असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

आरोग्य खात्याच्या उपाययोजना

$
0
0
पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य, कीटकजन्य आजारांना नियंत्रित करण्यासाठी आरोग्य खात्याने राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व आरोग्य केंद्राच्या प्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. आजारांचा उद्रेक थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

रक्तपेढ्यांवर ‘एफडीए’चा वॉच

$
0
0
राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेच्या आदेशानुसार ‘प्रोसेसिंग चार्ज’ आकारण्याची मुभा मिळाल्याने रक्ताचे दर वाढले असून, त्यापेक्षा जादा दर आकारले जातात की काय यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रक्तपेढ्या तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

शिवाजीनगरमध्ये डॉक्टरला लुटले

$
0
0
शिवाजीनगरमधील नरवीर तानाजीवाडी येथे एका ‘एमबीबीएस’ डॉक्टर तरुणाला दोघा तरुणांनी लुटल्याचा प्रकार मंगळवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदस्य नेमणुकीत घोळ

$
0
0
महापालिकेने नेमलेल्या वृक्ष प्रधिकरण समितीमधील घोळ बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेने या समितीवर नेमलेले सदस्य सुधीर नाईक हे स्वयंसेवी संस्थेचे विद्यमान सदस्य नसल्याची माहिती समोर आली आहे.

पुन्हा धुमाळ यांची वर्णी

$
0
0
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांची पुन्हा वर्णी लागली आहे. गुरुवारी झालेल्या शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने धुमाळ यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता.

प्रॉपर्टी टॅक्सची थकबाकी मोठी

$
0
0
मोकळ्या जागांवर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेले भोगवटा पत्र घेतल्यानंतरही शहरातील अनेक मोकळ्या जागांवर मिळकत कर विभागाच्या वतीने प्रॉपर्टी टॅक्सची नोंद केली जाते. हा प्रॉपर्टी टॅक्स भरला जात नसल्याने वर्षानुवर्षे हा टॅक्स वाढतो आहे.

ट्रेंडी सॅक आणि दप्तरे

$
0
0
छोटा भीम, अँग्री बर्ड्स, स्पायडरमॅन, सोफिया, अॅना मोंटाना अशा विविध कार्टून्सच्या प्रतिमा असलेल्या सॅक आणि दप्तरे विद्यार्थ्यांना खुणावत आहेत. शालेय विद्यार्थ्यांकडून ट्रेंडी सॅक आणि दप्तरांना मोठी मागणी असून, यंदा किमतींमध्ये सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर थांबे

$
0
0
प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एसटीने प्रवाशांच्या सोयीसाठी महामार्गाला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर थांबे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये दहा थांबे उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून देऊन शेड बांधून देण्याची विनंती एसटीकडून करण्यात आली असल्याचे एसटीच्या पुणे विभागाचे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी सांगितले.

गैरकृत्ये करणारी केंद्रे घटली

$
0
0
गैरकृत्ये करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांची संख्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. कारवाई केल्यामुळे बेकायदेशीररीत्या लिंगनिदान करणाऱ्या केंद्रांचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांत एकाही केंद्रावर छापा टाकण्यात आलेला नाही; मात्र शहरातील केंद्रांची नियमितपणे तपासणी होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images