Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सुप्रियांच्या मतदारसंघात ६० वर्षांनंतरही पाणीटंचाई

$
0
0
बारामतीमधील जैनकवाडी येथील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहा दशकांनंतरही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. ग्रामस्थांना चार दिवसांतून एकदाच पाणी मिळते. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी वेळोवेळी केवळ आश्वासनांवरच बोळवण केल्याने अजूनही या ग्रामस्थांनी तहान भागू शकलेली नाही.

‘आधार’च्या धर्तीवर अपंगांसाठी कार्ड

$
0
0
विविध योजनांचा लाभ विनासायास घेणे शक्य व्हावे, यासाठी अपंगांना आधार कार्डाच्या धर्तीवर युनिक कार्ड उपलब्ध करून देण्याचा विचार सरकार करीत आहे. अपंगांना केंद्र-राज्य सरकारकडून अनेकविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

कंपनी कायद्याविरोधात दाद मागणार

$
0
0
जाचक आणि कडक अटींमुळे नवीन कंपनी कायदा त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे या कायद्यातील जाचक अटी शिथिल करण्यासाठी दाद मागण्याचा निर्णय ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या परिषदेत घेण्यात आला.

लाचखोर अधिकाऱ्यांना सरकारचे अभय?

$
0
0
लाचखोरांवर आरोपपत्र दाखल करण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) प्रस्तावांवर ९० दिवसांत ​निर्णय घेण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने केली असतानाही राज्य शासनाच्या विविध विभागांकडे २९८ प्रस्ताव पडून आहेत.

पर्यटनातून किल्ल्यांचे संवर्धन

$
0
0
इतिहासाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे किल्ले पर्यटनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुण्यातील सहा किल्ल्यांची त्यासाठी निवड करण्यात आली असून, त्यांच्या विकासाची ब्लू प्रिंटही तयार झाली आहे.

‘लर्निंग लायसेन्स’साठी आता ‘टोकन सिस्टिम’

$
0
0
लर्निंग लायसेन्स (शिकाऊ परवाना) काढण्यासाठी आरटीओमध्ये येणाऱ्यांना आता रांगेत उभे राहावे लागणार नाही. नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी आरटीओने टोकन सिस्टिम सुरू करण्याचे निश्चित केले आहे. येत्या आठवड्यापासून या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याचे ‘आरटीओ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पासपोर्टच्या तक्रारी आता थेट आयुक्तांकडे

$
0
0
पासपोर्ट व्हेरिफिकेशन करताना सर्वसामान्यांना पोलिस ठाण्यात येणारा अनुभव आता थेट पोलिस आयुक्त सतीश माथूर यांच्यासमोर पोचणार आहे. परकीय नोंदणी शाखेने गेल्या आठवड्यापासून दररोज ४० नागरिकांना मेल पाठवून त्यांचे अभिप्राय मागण्यास सुरुवात केली आहे.

‘क्रोसिन अॅडव्हान्स’चा पुण्यात तुटवडा

$
0
0
अंगदुखी, डोकेदुखीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘क्रोसिन अॅडव्हान्स’ या ५०० मिलिग्रॅमच्या गोळ्यांची किंमत राष्ट्रीय औषध दर निश्चिती प्राधिकरणाने (एनपीपीए) दोन रुपयांवरून ९४ पैसे करण्याचे आदेश दिल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून ही गोळी बाजारात उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे.

जादा दर आकारणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाईचा इशारा

$
0
0
राज्यातील सर्व रक्तपेढ्यांनी राष्ट्रीय रक्त धोरणाच्या नियमांची अंमलबजावणी करताना राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने (एनबीटीसी) निश्चित केलेल्या दरानुसारच रक्ताचे दर आकारावेत. त्यापेक्षा अतिरिक्त रक्कम घेतल्यास रक्तपेढ्यांची ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) अर्थात परवानाच रद्द करण्यात येईल, अशा इशारा राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांना दिला आहे.

डासांची उत्पत्ती आढळल्यास दंड

$
0
0
घरात साठविलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित नागरिकांना दररोज एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. शहरातील डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या उपविधी २०१३ (नियमावली) पालिकेच्या मुख्य सभेने नुकतीच मंजुरी दिली आहे.

साने गुरुजींची लोकप्रियता कायम

$
0
0
आदर्शवादी जीवन, संस्कारमूल्यांचे शिक्षण मनोरंजक पद्धतीने देणाऱ्या साने गुरुजींच्या पुस्तकांची लोकप्रियता आजही कायम आहे. साने गुरुजींची पुस्तके कॉपीराइटपासून मुक्त झाली असल्याने त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय असलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केले असून, सर्वच पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

रक्ताची विक्री नव्या दरानेच

$
0
0
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेबरोबर (एनबीटीसी) राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिलेल्या आदेशानुसार रक्ताचे नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार रक्ताची विक्री करण्याचा निर्णय रक्तपेढ्यांची बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

एलबीटीबाबत निर्णय नाही

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याबाबत सरकारप्रमाणेच महापालिकांमध्येही संभ्रमावस्था असून, मुख्यमंत्र्यांसमवेत मंगळवारी झालेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. राज्यातील काही महापालिकांतर्फे एलबीटी रद्द करण्याचा आग्रह धरण्यात आला.

धनंजय देसाईला येरवड्यात अटक

$
0
0
हडपसर येथील दंगलीत तरुणाच्या खूनप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याला मंगळवारी दुपारी येरवडा जेलमधून अटक करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात खुनाची ही घटना कटाचा एक भाग होती, हे स्पष्ट झाल्यावरच देसाईला अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिसांना गांभीर्य कळले नाही

$
0
0
सोशल मीडियावरून महापुरूषांबाबत करण्यात आलेले आक्षेपार्ह पोस्ट आणि त्यानंतर शहराच्या विविध भागांमध्ये झालेल्या हिंसक घटना पूर्वनियोजित असून, त्यांचे गांभीर्य पोलिसांना कळले नाही, अशा शब्दांमध्ये शांतता समितीच्या सदस्यांनी मंगळवारी पोलिसांना धारेवर धरले.

लाचखोर तलाठी जेरबंद

$
0
0
मावळ तालुक्यातील चांदखेड गावच्या तलाठ्याला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सकाळी अटक केली

दंगल घडविणारे भरणार नुकसानभरपाई

$
0
0
हिंसक घटनांमध्ये सहभागी झालेल्या मुलांच्या पालकांना पत्र पाठवून या दंगलीच्या काळात झालेल्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान त्यांच्याकडून वसूल केले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त स‌तीश माथूर यांनी सांगितले.

‘मास्टर की’ चोरीनंतर ५० पंपांचे लॉक बदलले

$
0
0
लोणीकाळभोर येथील फिलिंग स्टेशनमधून ‘मास्टर की’ चोरीचा प्रकार झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील सर्वच पंपाची लॉक बदलण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील ३५७ पैकी ५० पंपावर नवीन लॉक बसवण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ठिकाणची लॉक बसवण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.

मावळातील लाचखोर तलाठी जेरबंद

$
0
0
मावळ तालुक्यातील चांदखेड गावच्या तलाठ्याला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सकाळी अटक केली. सोमाटणे फाटा येथे बालाजी स्नॅक्स हॉटेलजवळ सापळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्राप्तिकरातून सूट देण्यात यावी

$
0
0
‘अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना प्राप्तिकरातून सूट देण्यात यावी. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी शिखर बँक उभारण्यात यावी, तसेच एक लाखांऐवजी तीन लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा इन्शुरन्स काढण्यात यावा,’ आदी मागण्या नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज लिमिटेड अर्थात नॅफकबचे व कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे नुकत्याच केल्या.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images