Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नियम पाळा; अपघात टाळा

$
0
0
नवी दिल्लीमध्ये झालेल्या कार अपघातामध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. त्यावरून कोणताही किरकोळ अपघातही प्राणांतिक ठरू शकतो, हे कटू सत्य पुन्हा समोर आले. वाहन चालविताना काही साध्या गोष्टींकडे लक्ष पुरविले, तर या घटना आपण नक्कीच टाळू शकतो.

योगासह वेद, अध्यात्माचाही अभ्यास

$
0
0
योग, संस्कृत आणि अध्यात्मशास्र यांचे पदविका अभ्यासक्रम तर योग या विषयाचे पदवी आणि पदविका अभ्यासक्रम आज, सोमवारपासून सुरू होत असून लक्ष्मी व्यंकटेश चॅरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्ट पुणे येथे कालिदास संस्कृत विद्यापीठाचे केंद्र होत आहे.

शिंदेवाडी दुर्घटनेनंतरही महामार्गावरील काम संथगतीने

$
0
0
पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी येथील वाडेकर मायलेकींच्या मृत्यूला एक वर्ष उलटले असले तरी या मार्गावरील कामाच्या परिस्थितीत फारसा बदल झाल्याचे दिसत नाही.

मतदान अर्जावरील कार्यालयीन माहितीचाही भार मतदारांवरच

$
0
0
मतदारयादीत नावनोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पुन्हा एकदा नावनोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. नवीन नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, दुरुस्ती करणे यासाठी विविध नमुना अर्ज उपलब्ध केले आहेत.

‘धार्मिक ऐक्याशिवाय महासत्ता होणे नाही’

$
0
0
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जात-पात, धर्म यामध्ये भेदभाव न करता इतरांवर अन्याय केला नाही. महाराजांचे खासगी चिटणीस हे मुस्लिम होते तर त्यांची वाघनखे तयार करणारादेखील मुस्लिम समाजाचा होता. हिंदू-मुस्लिम यांचे ऐक्य झाल्याशिवाय भारत महासत्ता होणार नाही,’ असे मत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक संबंध परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. एस. एम. पठाण यांनी व्यक्त केले आहे.

भुयारी रेल्वेला परवानगी, डीपी रस्ता रखडला

$
0
0
रेल्वे प्रशासनाने ससाणे नगर येथील रेल्वेच्या भुयारी मार्गाला नुकतीच परवानगी दिली आहे; मात्र विकास आराखड्यातील रामटेकडी- सय्यदनगर या डीपी रस्त्याचे काम रखडले आहे. या मार्गातील नाल्यावरील दोन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे मात्र, रस्त्याच्या कामात बाधित बावीस घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.

अपंगांच्या कर्मशाळेतील अभ्यासक्रम कालबाह्य

$
0
0
अपंगांच्या सर्वांगीण पुनर्वसनाकरिता त्यांना व्यावसायाभिमुख शिक्षण देण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या कर्मशाळांमधील अभ्यासक्रम कालबाह्य झाले आहेत. ते अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याआधारे सुरू केलेल्या व्यवसायाच्या माध्यमातून दररोजचा घरखर्च भागविण्यासाठी पुरेसे पैसेही मिळत नसल्यामुळे सर्व अभ्यासक्रमांची प्रवर्गनिहाय फेरमांडणी करण्याची गरज आहे, अशी मागणी संयुक्त अपंग हक्क सुरक्षा समितीतर्फे अपंग कल्याण आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे.

भेसळ तपासण्यासाठी मोबाइल व्हॅन

$
0
0
अन्न पदार्थांसह दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ आता त्वरीत ओळखता येण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) ताफ्यात लवकरच चार मोबाइल व्हॅन (प्रयोगशाळा) दाखल होणार आहेत. त्यामुळे भेसळखोरांवर वॉच ठेवणे शक्य होणार असून त्यावर आळा घालता येणार आहे.

केळकर संग्रहालयाचे वैभव आणखी वाढले

$
0
0
पुण्याची शान असलेल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयातील दुर्मिळ वस्तूंचा ठेवा आता अधिक समृद्ध होऊ लागला आहे. गेल्या पाच वर्षांत पाचशेपेक्षा अधिक वस्तू संग्रहालयाला भेट मिळाल्या असून, सुमारे दीडशे वर्षे जुन्या असलेल्या वस्तू संग्रहालयाच्या देखणेपणात भर घालत आहेत.

तीन महिन्यांत पाच लाख पर्यटकांची भेट

$
0
0
डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिकच्या विविध मालिकांमध्ये दिसणारे वन्यप्राणी प्रत्यक्षात दिसतात तरी कसे हे अनुभवण्यासाठी हौशी पुणेकरांनी यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला विशेष पसंती दिली. गेल्या तीन महिन्यात प्राणी संग्रहालयात तब्बत पाच लाख पर्यटकांनी हजेरी लावली.

महापालिकेने केली ७० लाखांची बचत

$
0
0
पीएमपी आणि एसटीच्या पावलावर पाऊल टाकत पालिकेने गेल्या डिसेंबरअखेरीपासून खासगी पंपांवरून डिझेल खरेदी सुरू केल्याने अवघ्या चार महिन्यांत तब्बल ७० लाख रुपयांची बचत होऊ शकली आहे.

माध्यमांचे लोकशाहीकरण होण्याची आवश्यकता

$
0
0
‘प्रसिद्धीमाध्यमे ही कोणाची जहागिरी नाही. आपल्या पूर्वजांनी लढून ती निर्माणे केली आहेत. सध्याच्या कॉर्पोरेट काळात माध्यमांचेही लोकशाहीकरण होण्याची गरज आहे. तसेच पत्रकारांनी आपले श्रम कंपन्यांना विकले, तरी आत्मा विकता कामा नये,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी मांडले.

मोक्का आरोपीने केली कारागृहात धक्काबुक्की

$
0
0
न्यायालयीन बंदीला जागा करून देण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकाला मोक्कातील एका आरोपीने धक्काबुक्की करून शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच येरवडा कारागृहात घडला. या प्रकारणी जेल अधीक्षकांनी विशेष मोक्का न्यायालयात पत्राद्वारे कळविले आहे.

‘सहजानंद’मधील वृक्षतोडीवरून वाद

$
0
0
हिरव्यागार वनश्रीने समृद्ध असलेल्या सहजानंद सोसायटी परिसरातील काही झाडे तोडण्यावरून सोसायटीमध्ये वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात परस्परविरोधी दावे करण्यात येत असून पुणे महापालिकेने सोसायटीला नोटीस बजावली आहे.

माणसाला निरागसतेचे सोंग घेणे अशक्य

$
0
0
‘माणूस नेहमी हसतखेळत जीवन जगतो. मात्र, परिस्थितीनुसार त्याचे हसणे बदलते. हसण्यामागील भावना बदलतात. माणसाला निरागसतेचे सोंग घेता येत नाही,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी मांडले.

पालेभाज्यांसह फळभाज्याही महाग

$
0
0
उन्हाचा कडाका कायम असल्यामुळे पालेभाज्यांबरोबरच काही फळभाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा, गवार, भेंडी, टॉमेटो, दोडका, फ्लॉवर, सिमला मिरची आणि शेवगा यांच्या दरामध्ये वाढ झाली असून हिरवी मिरची, काकडीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे. रविवारी मार्केट यार्डमधील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याच्या १५० ते १६० गाड्यांची आवक झाली.

ज्ञान, तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी समर्पणाची गरज

$
0
0
दरवर्षी सहा लाख इंजिनीअर देशात तयार होत असताना त्या प्रमाणात ज्ञान आणि तंत्रज्ञान निर्मिती होत नसल्याची खंत व्यक्त करून ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी समर्पणाची आवश्यकता असल्याचे मत पद्मभूषणप्राप्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ ज्येष्ठराज जोशी यांनी मांडले.

‘राष्ट्रवादी’कडून नार्वेकरांना ‘बक्षिसी’

$
0
0
विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त रिक्त झालेल्या बारा जागांपैकी एका जागेवर मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. या माध्यमातून पक्षाने त्यांना बक्षिसी दिली आहे. मात्र, काँग्रेसकडून आझम पानसरे यांची शिफारस न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

पीएमपी वाढवणार स्कूलबसची संख्या

$
0
0
गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये शाळांसाठी दिलेल्या बसेसच्या संख्येत यंदा पीएमपीकडून वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पीएमपीकडे कंडक्टरची संख्या पुरेशी नाही, त्यामुळे नवीन कंडक्टर आल्यानंतर बसच्या संख्येत वाढ करण्यात येणार असल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शालेय वाहतुकीचा तिढा सुटणार की चिघळणार?

$
0
0
एकविसाव्या शतकातील शहरांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची समस्या भेडसावेल, असे भाकीत पूर्वी कुणी केले असते तर त्यावर चटकन विश्वास ठेवणे कठीणच गेले असते, नाही का? आता मात्र बहुतांश शहरांतील लाखो विद्यार्थी व पालकांसाठी शालेय वाहतूक ही डोकेदुखी ठरली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images