Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘भांडारकर’चा निकाल जाहीर

$
0
0
भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यमान सदस्य प्रा. हरी नरके, श्रीकांत बहुळकर, पं. वसंत गाडगीळ, डॉ. मैत्रेयी देशपांडे यांच्यासह पंचवीस जणांनी विजय मिळवला असून, निवडून आलेल्या नियामक मंडळात १३ सदस्य प्रथमच संस्थेसाठी काम करणार आहेत.

आ. बापू पठारेंनी बांधली अनधिकृत शाळा, गेस्ट हाउस

$
0
0
‘वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी खराडीत अनधिकृत शाळा आणि गेस्ट हाउस उभारले आहे; तसेच बंगल्यासाठी जादा एफएसआयचा वापर केला आहे, तरीही पालिकेकडून अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी केला.

रेल्वे स्टेशन मास्तरला लुटले

$
0
0
लोणावळा-पुणे लोकलमध्ये रेल्वे स्टेशन मास्तर एन. जी. शेळके यांच्यावर चाकू हल्ला करीत त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल घेऊन चार चोरटे पसार झाले आहेत. ही घटना गुरुवारी (पाच जून) रात्री दहाच्या सुमारास घडली असून, गंभीररित्या जखमी झालेले शेळके यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.

एलबीटी अजिबात रद्द करू नका

$
0
0
‘जकात रद्द करून स्थानिक संस्था कराद्वारे (एलबीटी) महापालिकेला स्वयंपूर्ण करण्यासाठी उचललेले पाऊल मूठभर व्यापाऱ्यांसाठी सरकार मागे घेणार आहे का,’ अशी विचारणा करून ‘एलबीटी रद्द झाला, तर तीव्र लढा उभारण्यात येईल,’ असा इशारा महापालिका कामगार युनियनतर्फे शुक्रवारी देण्यात आला.

सर्वाधिक मुलीच कुपोषित

$
0
0
राज्यात शहरीभागापेक्षा ग्रामीण भागात दिसणाऱ्या सर्वाधिक कुपोषणाच्या स्थितीवर यशदाच्या संशोधकांनी बोट ठेवले असून त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.शहरातील झोपडपट्ट्यांमधील बालकांमध्ये कुपोषण आढळले असले तरी ग्रामीण आणि शहरी भागातील बालकांमध्ये मुलींमध्ये सर्वाधिक कुपोषण असल्याचेगी अहवालात स्पष्ट केले आहे.

...तर पगारापुरताच निधी उरणार!

$
0
0
व्यापाऱ्यांच्या दबावापुढे राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतलाच, तर कर्मचाऱ्यांच्या पगाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकल्पासाठी खर्च करण्याची ताकदच पालिकेकडे उरणार नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मान्सून केरळमध्ये

$
0
0
आठवडाभर प्रतीक्षा करायला लावलेला मान्सून अखेर शुक्रवारी केरळ किनारपट्टीवर येऊन थडकला. केरळबरोबरच तो दक्षिण अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि तमिळनाडूच्या काही भागांतही दाखल झाला आहे.

मराठीच्या संवर्धनासाठी ८० कोटी

$
0
0
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात मराठी भाषा संवर्धनासाठी ८० कोटी रुपयांची तरतूदीचे साहित्य वर्तुळातून स्वागत करण्यात आले आहे.

महापुरुषांची बदनामीः IP पत्त्यांचा शोध

$
0
0
फेसबुक व सोशल मीडियात टाकण्यात आलेला महापुरूषांची बदनामी करणारा मजकूर हा चार देशांतील आयपी अड्रेसवरून टाकण्यात आला होता, अशी पोलिसांना माहिती मिळाली आहे.

तोडफोड : आरोपींना जामीन

$
0
0
विश्रांतवाडी येथील कळस चौकात दगडफेक करून चार पीएमपी गाड्यांची तोडफोड करून सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

धायरी उड्डाणपुलाच्या उद‍्घाटनाला मुहूर्त

$
0
0
गेल्या अनेक दिवसांपासून उद‍्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या धायरी फाटा येथील कै. रमेश वांजळे उड्डाणपुलाच्या उद‍्घाटनासाठी महापालिकेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या मंगळवारी (१० जून) सकाळी १० वाजता महापौर चंचला कोद्रे यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद‍्घाटन केले जाणार आहे.

धनंजय देसाईच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0
धार्मिक तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पत्रकांची छपाई करून ती वितरीत केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

विधानसभेला राष्ट्रवादीला हव्या अधिक जागा

$
0
0
पाच वर्षांपूर्वीप्रमाणे लोकसभेत जास्त जागा मिळणाऱ्या पक्षाला विधानसभेत अधिक जागा, हे सूत्र आगामी निवडणुकीतही राबविले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करत, विधानसभेला अधिक जागा लढविण्याचा मनसुबा राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी जाहीर केला.

पुणे पोलिस अपयशी

$
0
0
फेसबुकवर महापुरुषांच्या झालेल्या बदनामीनंतर पुण्यात निर्माण झालेला तणाव आणि हडपसर येथे झालेल्या मोहसीन मोहंमद सादिक या मुस्लिम तरुणाच्या मृत्यूला पुणे शहर पोलिस दलाचे अपयश कारणीभूत असल्याचा ठपका राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी शनिवारी ठेवला.

मतदार नोंदणीची महामोहीम

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीतील गायब मतदारांच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात मतदार नोंदणीची महामोहीम हाती घेण्यात येत आहे. येत्या सोमवारपासून (९ जून) शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील तब्बल तीन हजार ठिकाणी मतदार नोंदणीचे काम सुरू होणार आहे.

दोन तासांचे लोडशेडिंग

$
0
0
महापारेषण आणि रिलायन्स कंपनीचे टॉवर्स कोसळल्याने विजेची तूट निर्माण झाल्याने शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात शनिवारी दीड ते सव्वादोन तासांचे लोडशेडिंग करण्यात आले. ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने पुणेकरांचे हाल झाले.

मेट्रोसाठी प्रदीर्घ प्रतीक्षा

$
0
0
राज्याच्या राजधानीतील मेट्रो रविवारपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असताना, पुणे मेट्रोचा प्रवास फक्त कागदावरून कागदाकडे याच दिशेने सुरू आहे. केंद्र सरकारची तत्त्वतः मान्यता मिळूनही स्वतंत्र कंपनी स्थापनेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी पुणेकरांना अद्याप प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.

पिचडांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा

$
0
0
धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध दर्शविल्यामुळे राज्याचे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या पुतळ्याची बारामतीत अंत्ययात्रा काढण्यात आली. या प्रकारानंतर पोलिसांनी ‘रासप’च्या दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

पुण्यातील मुस्लिम दहशतीखाली!

$
0
0
शुक्रवारचा दिवस... दुपारी १.३० ची वेळ... हडपसरमधल्या मशिदीत मुस्लिम धर्मीय रोजच्यासारखेच नमाज पढण्यासाठी जमले होते... पण, त्यापैकी अनेकांचा पेहेराव, ‘लुक’ बदललेला होता... काही तरुण पठाणीऐवजी शर्ट-पँट घालून आले होते, तर काहींनी दाढ्या काढून टाकल्या होत्या...

पेन्शनरांनो, ऑनलाइनचा मार्ग अवलंबवा

$
0
0
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शनरांना आपण जिवंत असल्याचे प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) बँकेत सादर करावे लागते. ते न केल्यास पुढील जानेवारीपासून पेन्शन काढली जात नाही. पण प्रमाणपत्र वेळेवर देऊनही दोन वेळा (२०११ व २०१४) माझ्या खात्यावर पेन्शन जमा न होण्याची परिस्थिती निर्माण झाली. बँकेत चौकशी केली, तेव्हा असाच प्रकार अनेक सेवानिवृत्तांच्या बाबतीत घडल्याचे कळले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images