Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विद्यार्थीफ्रेंडली रिक्षाला ‘आरटीओ’ची मान्यता

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणारे रिक्षाचे मॉडेल करण्यास परिवहन विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. मात्र शालेय वाहतुकीची रिक्षा तयार करण्यास एकाही उत्पादकाने पुढाकार घेतला नसल्याचे वास्तव आहे.

नियमबाह्य वाहतुकीवर दैनंदिन कारवाई

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि रिक्षांवर लवकरच कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील विविध भागांमध्ये दैनंदिन स्वरूपात ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.

परिवहन समिती स्थापनेचा आदेश धूळखात पडून

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी सर्व शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश वेळोवेळी बजाविण्यात आले असले, तरी त्याकडे अद्याप दुर्लक्षच करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

सहा आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0
एक कोटीच्या खंडणीसाठी केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींच्या पोलिस कोठडीत आठ जूनपर्यत वाढ करण्यात आली आहे.

नोकरीच्या आमिषाने १७ जणांची फसवणूक

$
0
0
दिघी येथील टाटा कम्युनिकेशनमध्ये नोकरीला लावण्याच्या ​अमिषाने १७ व्यक्तींकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली.

सोनसाखळी चोरीच्या शहरात पाच घटना

$
0
0
पाषाण-बाणेर रोड आणि वानवडी येथे सोनसाखळी हिसकावल्याच्या दोन घटना घडल्या असून त्यामध्ये सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावण्यात आले आहेत तर पिंपरी-चिंचवड आणि सांगवी परिसरातही सोनसाखळी हिसकावल्याच्या तीन घटनांमध्ये साडेसात तोळ्याचे दागिने हिसकावण्यात आले आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भारतात जटील

$
0
0
भारतात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा असल्याची खंत इस्रायलचे वाणिज्य प्रतिनिधी इयान डिव्हॉन यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि एन्व्हॉरमेंटल क्लब ऑफ इंडियातर्फे ‘जागतिक पर्यावरण दिवसा’ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सोनोरी गावाला पाणीटंचाईच्या झळा

$
0
0
पुरंदर तालुक्यातील सोनोरी या छोट्या गावास घोरवडी प्रकल्पातून पाणीपुरवठा करीत असलेल्या वाहिन्या जास्त दाबाने वारंवार फुटत असल्याने गावास तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते.

‘कमला नेहरू’तील खरेदीच्या चौकशीचे आदेश

$
0
0
महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये तीन वर्षापूर्वी खरेदी करण्यात आलेल्या आणि आजपर्यंत विनावापर नादुरूस्त झालेल्या वैद्यक‌ीय उपकरणांची तपासणी केली जाणार आहे. या सर्व उपकरणांची तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांना दिले आहे.

‘डॉग स्क्वाड’च्या नशिबी ‘कुत्र्याचे’ जिणे

$
0
0
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) डॉग स्क्वाडला जागा नसल्याने श्वानांना हलाखीच्या परिस्थितीत राहावे लागत आहे. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात त्यांच्यासाठी बांधण्यात आलेली इमारत पूर्णपणे खिळखिळी झाली आहे, तर येथील श्वानांना (डॉग) प्रशिक्षण देणारे कर्मचारी झोपडपट्टीपेक्षाही वाईट परिस्थितीत राहतात.

रत्नागिरी हापूसचा भाव वाढला

$
0
0
आंब्याचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आल्यामुळे आवक कमी झाली असून कर्नाटक आणि रत्नागिरी हापूस आंब्याच्या दरात वाढ झाली आहे. रविवारी बाजारपेठेत कर्नाटक हापूसच्या पाच ते सहा हजार आणि रत्नागिरी हापूसच्या एक ते दीड हजार पेट्यांची आवक झाली.

बाबांचा वसा पुढे चालवतोय…

$
0
0
‘न सांगितलेल्या, पण अनुभवलेल्या संस्कारात वाढलो. वाट खडतर असतानाही बाबांचा वसा पुढे चालवतोय,’ अशी भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.

सरकारचा संघर्षाशी सामना

$
0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बडे नेते संचालक असलेल्या राज्य बँकेची चौकशी, गारपीटग्रस्तांचे प्रश्न आणि कायदा सुव्यवस्था अशा विषयांवर अधिवेशनाच्या उत्तरार्धात उद्यापासून विधीमंडळात चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

LBT चा निर्णय २ दिवसांत घेणार

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या अंमलबजावणी मधील (एलबीटी) त्रुटी दूर करण्यासाठी येत्या दोन दिवसात राज्य सरकार व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. या बैठकीनंतरच एलबीटीबाबतचा अधिकृत निर्णय घेण्यात‌ येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

शहरात पीएमपीच्या २३ बस फोडल्या

$
0
0
भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली अहिंसेची शिकवण लक्षात घेऊन आंबेडकर कार्यकर्त्यांनी शांत रहावे असे आवाहन विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्वांना मिळणार मोफत आरोग्य विमा

$
0
0
खासगी वैद्यकीय सुविधांचा खर्च आकाशाला भिडत असताना सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार उपचारसुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकार आता सर्वांसाठी मोफत वैद्यकीय-आरोग्य विमा योजना लागू करण्याबाबत विचार करीत आहे.

राष्ट्रपुरुष विटंबनेचे पडसाद

$
0
0
सोशल मीडियातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कथित विटंबना झाल्याच्या घटनेचे पडसाद रविवारी पुण्यासह राज्यभर अनेक ठिकाणी उमटले. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर; तसेच मराठवाड्यातील अनेक भागांत तणाव निर्माण झाला. काही ठिकाणी बंद पाळून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

दारूच्या भांडणातून खून; २ अटकेत

$
0
0
दारू पिताना झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून एकाचा खून केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपीला कोर्टासमोर उभे केले असता कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

‘रात्र वणव्याची’ मालिका दूरदर्शनवर

$
0
0
राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या कादंबरीवर आधारित ‘रात्र वणव्याची’ ही मालिका दूरदर्शनवर अवतरणार आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर गारूड करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच छोट्या पडद्यासाठी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.

सहा रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित

$
0
0
पुण्यासह कोल्हापूर शहरातील रक्तपेढ्यांच्या केलेल्या तपासणीत काही त्रुटी आढळल्याने सहा रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली आहे. तर कोल्हापुरातील एका रक्तपेढीचा परवाना रद्द केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>