Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सिम्बायोसिस आता इंदोरमध्येही

$
0
0
शैक्षणिक गुणवत्तेसाठी जगभरात प्रसिद्ध असलेले सिम्बायोसिस आता इंदौरमध्येही कॅम्पस उभारत आहे. शनिवारी (६ जून) मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेसचे भूमीपूजन होणार आहे.

हिंदू राष्ट्रसेनेवर बंदी येणार?

$
0
0
‘हडपसर येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी संशयित असलेल्या हिंदू राष्ट्रसेना या संघटनेवर बंदी आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल,’ अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त सतीश माथुर यांनी गुरुवारी दिली. या प्रकरणी एकूण १७ जणांना अटक करण्यात आली आहे.

रामनदीच्या पात्रात पुराचा धोका

$
0
0
बावधन, भूगांव परिसरात टेकड्यांवरील खोदकाम व बांधकामांमुळे रामनदी पात्रामध्ये येणाऱ्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. रामनदी स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या एका गटाने याबाबत पाहणी केली असता डोंगरफोडीमुळे पाणी वेगाने नदीपात्रात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सलीम अली पक्षी अभयारण्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष

$
0
0
संगमवाडी येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याकडे पालिकेचे वारंवार दुर्लक्ष होत असून, कचऱ्यासह फुटक्या ड्रेनेज लाइन्समुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असल्याची टीका केली जात आहे.

मृत सादिकच्या कुटुंबास ५ लाखांची मदत

$
0
0
फेसबुक व सोशल मीडियात महापुरूषांची बदनामी करणाऱ्या मजकुरामुळे एका गटाच्या मारहाणीत मृत्यू झालेला पुण्यातील मोहसीन मोहंमद सादिक या या मयत युवकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शुक्रवारी मंजूर केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ‘अॅक्टिव्ह’

$
0
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गेल्या पाच महिन्यांमध्ये कारवाई करण्याचे प्रमाण वाढले असून विभागाच्या आठ परिक्षेत्रामध्ये एक जानेवारी ते ३१ मे २०१४ या कालावधीत एकूण ४५५ सापळा रचून कारवाई करण्यात आली. अपसंपदेचे २५, भ्रष्टाचाराचे १४ असे मिळून एकूण ४९४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस स्टेशनातच मिटणार किरकोळ घरगुती वाद

$
0
0
किरकोळ आणि क्षुल्लक वाटणाऱ्या कारणावरुनही अनेकदा घरात कलह निमार्ण होतात. वादाचे प्रमाण ​किरकोळ वाटणारे असले तरी कोणीच माघार न घेण्याच्या कठोर भूमिकांमुळे पोलिस स्टेशनच्या दारात वाद जाऊन पोहचतो.

'ना. गोखले यांना भारतरत्न द्या'

$
0
0
महात्मा गांधीचे राजकीय गुरू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना भारतरत्न मिळावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. गोखले यांचे स्मृतीशताब्दी वर्ष १९ फेब्रुवारीपासून सुरू झाले असून, या औचित्याने देशाचा हा सर्वोच्च नागरी किताब गोखले यांना मिळण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि सर्व्हंट्स सोसायटी ऑफ इंडिया या संस्थांच्या माध्यमातून सरकारदरबारी पाठपुरावा केला जाणार आहे.

सोनसाखळी चोरी : ५ जणांना पोलिस कोठडी

$
0
0
पौड रोड येथून पायी जात असलेल्या एका म​हिलेच्या गळयतील सोनसाखळी चोरीप्रकरणी कोथरूड पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. त्यांना कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

‘ओवीतला लांडगा’ देणार लांडग्याबद्दल विस्तृत माहिती

$
0
0
इसानपनीतीच्या गोष्टींमुळे प्रसिद्ध झालेल्या लबाड लांडग्याला पुणेकरांकडून ‘पुण्याच्या मानचिन्हा’चा मान नुकताच मिळाला असताना आता या ढोंग करणाऱ्या प्राण्याचा अधिवास आणि धनगर समाजाशी पिढ्यानपिढ्या त्याचे जुळलेले संबंध जाणून घेण्यासाठी वन विभागातर्फे लांडग्याचे ‘डॉक्युमेंटेशन’ करण्यात येते आहे.

महामंडळ करणार स्वतःच्या मालकीच्या ‘व्होल्वो’ची खरेदी

$
0
0
एसटीच्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा, म्हणून एसटी महामंडळाने स्वत:च्या मालकीच्या २५ व्होल्वो गाड्या खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. ‘येत्या २० जून रोजी होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीमध्ये या बसची खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे,’ असे महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी ‘मटा’ला सांगितले.

धायरी उड्डाणपूल खुला करण्याची मागणी

$
0
0
‘सिंहगड रोडवरील धायरी व आजूबाजूच्या परिसरातील वाहनचालकांसाठी उपयुक्त ठरणारा धायरी फाटा उड्डाणपूल दोन दिवसांत सुरू करावा; अन्यथा आंदोलन करून वाहनचालकांसाठी पूल खुला केला जाईल,’ असा इशारा काँग्रेसने पालिकेला दिला आहे.

राज्य सरकार तातडीने बरखास्त करा

$
0
0
विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांच्या बाबतीत राज्य सरकार द्वेषभावना ठेवून वागत आहे. आतापर्यंत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये शिक्षकांच्या बाजूने लागलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्यास सरकार तयार नाही, त्यामुळे महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे करणार असल्याचे महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष प्रा. ए. टी. सानप यांनी सांगितले.

उद्योगनगरी आखणार पर्यावरण धोरण

$
0
0
वृक्षारोपण, व्याख्याने, प्रदर्शन, वृक्षवाटप या उपक्रमांनी पर्यावरण दिन पिंपरी-चिंचवड परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त गुरुवारी आणि शुक्रवारी (पाच आणि सहा जून) शहर आणि परिसरात विविध उपक्रम घेण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात विविध कार्यक्रम घेण्यात आले.

हायकोर्टाच्या आदेशाने गडबडले पिंपरी पालिका प्रशासन

$
0
0
गेल्या मे महिन्यात हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे निर्मूलनासाठी नव्याने समर्पित यंत्रणा न निर्माण केल्यास अवमानाच्या भीतीपोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रस्ताव तयार करून शासन मान्यतेसाठीचे काम गांभीर्याने हाती घेतले आहे.

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा नगरसेवकांविरोधी सूर

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाची कार्यकारिणी बरखास्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा वर्षांत नगरसेवकांनी कोणती ठोस विकासकामे केली, ते दाखविण्याचे आव्हान सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.

मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज

$
0
0
मराठी भाषा सल्लागार समितीने मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याबाबत प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून मराठीचे जतन, संवर्धन आणि विकास करण्याचा हेतू आहे.

मराठी भाषा संवर्धनासाठी ८० कोटींची तरतूद

$
0
0
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात मराठी भाषा संवर्धनासाठी ८० कोटी रुपयांची तरतूदीचे साहित्य वर्तुळातून स्वागत करण्यात आले आहे. भाषाविषयक उपक्रम राबविण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरणार असला, तरी त्याचा योग्य पद्धतीने विनियोग होण्याचीही अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी आंदोलन

$
0
0
‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतं देत नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय,’ अशा घोषणा.. बालवाडीचा समावेश शिक्षणहक्कात करावा, आरक्षणाची नियमावली जाहीर करावी, असे फलक घेऊन शिक्षण हक्क कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी बालभारतीच्या प्रवेशद्वाराबाहेर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.

पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची मुलांसह आत्महत्या

$
0
0
पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आपल्या दोन्ही मुलांसह लोहगाव येथील खाणीतील पाण्यात उडी मारून जीव दिल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाकल केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images