Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

टाकाऊ वस्तू जमा करण्यासाठी ‘कलेक्शन पॉइंट्स’

$
0
0
कपडे, काचा, नायलॉन आणि ई-वेस्ट आदी स्वरूपातील टाकाऊ वस्तू गोळा करण्यासाठी सध्या ‘पूर्णम इकोव्हिजन’तर्फे काही कलेक्शन पॉइंट्स तयार करण्यात आले आहेत. नवश्या मारुती, बाणेर-बालेवाडी, पिंपळे सौदागर आणि डहाणूकर कॉलनी या भागात दर महिन्याला ठराविक दिवशी टाकाऊ वस्तू गोळा केल्या जातात. त्यांचा पुनर्वापर करून उपयुक्त वस्तूंची निर्मिती केली जाते. त्या वस्तू मॉडेल कॉलनीतील ‘प्लॅनेट आर’ या आउटलेटमध्ये विक्रीसाठी ठेवल्या जातात.

कँटोन्मेंटच्या निवडणुकांबाबत संभ्रमावस्था

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाची कार्यकारिणी एक वर्षासाठी बरखास्त करण्यात आली असून, याबाबतचा आदेश केंद्र सरकारकडून गुरुवारी बोर्डाकडे दाखल झाला आहे. चार जून २०१५ पर्यंत बोर्ड बरखास्त करण्यात येत असल्याचे आदेशात स्पष्ट केले असले, तरी निवडणुका केव्हा घ्यायच्या आणि त्रिसदस्यीय समिती कधीपासून अस्तित्वात येणार, याबाबत कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नाहीत.

बेकायदा टेकडीफोडीचा अहवाल सरकारला सादर

$
0
0
शिंदेवाडी दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या किसन राठोड यांच्या बेकायदा टेकडीफोड प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या समितीने आपला अहवाल नुकताच राज्य सरकारकडे सादर केला आहे.

शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात ३४५ मतदानकेंद्र

$
0
0
विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार साडेसातशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र, यानुसार पुणे जिल्ह्यात ३४५ मतदानकेंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.

पीककर्जाच्या वसुलीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

$
0
0
राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या पीककर्जाच्या वसुलीला येत्या डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा सरकारने बजेटमध्ये केली आहे. राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

वादळी वाऱ्यांमुळे कोसळले विजेचे टॉवर

$
0
0
प्रचंड वादळी वाऱ्यांमुळे महापारेषण आणि रिलायन्स कंपनीच्या चारशे किलोव्होल्ट क्षमतेच्या वीजवाहिनीचे ११ टॉवर्स विविध कोसळून पडले. त्यामुळे वीजवितरण ठप्प झाल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पाऊण ते दीड तासाचे लोडशेडिंग करण्यात आले.

निवडणूक डोळ्यासमोर असूनही अर्थसंकल्प निराशाजनक

$
0
0
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प निराशाजनक आहे. त्यात उद्योगांबरोबरच व्यापाऱ्यांनादेखील कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. एलबीटी, फ्लॅटवरील व्हॅटसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची संधी सरकारने गमावली आहे, असा सूर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) आयोजित चर्चासत्रात व्यक्त झाला.

‘आरटीओ’तील कामकाज थंडावले

$
0
0
कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच विविध तांत्रिक समस्यांमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज थंडावले आहे. पक्के लायसन्स, वाहन नोंदणी परवाने यासाठी नागरिकांना दोन-दोन महिने वाट पाहावी लागत आहे. लर्निंग लायसन्ससाठीच्या चाचणीचे २५ टर्मिनल्स बंद असल्याने नागरिकांचा वेळ वाया जात आहे. यावर तोडगा न निघाल्यास पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

जनुकीय बियाण्यांना मान्यता नको

$
0
0
जनुकीय बदल केलेल्या बियाण्यांबाबत मतभेद असतानाही माजी कृषीमंत्री शरद पवार आणि माजी पर्यावरणमंत्री वीरप्पा मोईली यांच्या आग्रहाने जनुकीय बदल केलेल्या बियाण्यांच्या चाचण्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

कीटकनाशक औषधांची आरोग्य विभागात वानवा

$
0
0
डेंगी, मलेरियाच्या डासांची पैदास शहरात होऊ नये, यासाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांची महापालिकेच्या आरोग्य विभागात वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असूनही अद्याप औषधांची खरेदी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कुंड्याखरेदीत आता मुख्याध्यापकही दोषी

$
0
0
शिक्षण मंडळातील कुंड्याखरेदीच्या वादग्रस्त प्रकरणात तत्कालीन अध्यक्षांनी राजीनामा देऊनही आता शाळेच्या मुख्याध्यापकांनाही दोषी धरण्यात आले आहे. मंडळाच्या सूचनेनुसारच ठेकेदाराकडून कुंड्यांची खरेदी करणाऱ्या मुख्याध्यापकांना शिक्षणप्रमुखांनी नोटीस बजावली आहे.

पालिकेचे नुकसान करणाऱ्या सल्लागार, अभियंत्यांना नोटिसा

$
0
0
रस्त्याची कामे देताना चुकीची दरपत्रके तयार करून पालिकेचे नुकसान करणाऱ्या सल्लागार आणि अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्यासह विभागप्रमुखांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. पालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणातच ही बाब समोर आल्याने ९८ लाख रुपयांचे नुकसान टळले आहे.

नामफलक म्हणून उभारली १८१ अनधिकृत होर्डिंग

$
0
0
पालिकेचे शुल्क वाचवण्यासाठी इमारतीच्या नामफलकाची परवानगी घेऊन प्रत्यक्षात बेकायदा होर्डिंग उभारण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या या स्वरूपाच्या तब्बल १८१ अनधिकृत होर्डिंगमुळे पालिकेचे उत्पन्न बुडत असल्याने त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

लांडगा, श्रृंगी घुबड ठरले पुण्याचे मानचिन्ह

$
0
0
वन्यजीवांविषयी देखील चोखंदळ असलेल्या पुणेकरांनी आकर्षक दिसणाऱ्या नव्हे तर, निसर्गसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘उमेदवारां’नाच मतदान करून वन्यप्राण्यांत लांडगा आणि पक्ष्यांमध्ये श्रृंगी घुबडाला पुण्याचे मानचिन्ह म्हणून विजयी केले आहे. वृक्षांच्या उमेदवारांमध्ये गणेर वृक्षाला सर्वाधिक मते मिळाली असून, फुलांच्या विभागात शिंदल मकोडी या फुलाने बाजी मारली आहे.

व्यवहारेंच्या राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण

$
0
0
पालिकेच्या शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे यांनी अखेर गुरुवारी राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण केली खरी; पण नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत मंडळाचा कारभार व्यवहारे यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंडळाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणीही सुरू झाली असून, पुढील आठवड्यात त्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

पाच महिन्यात ४५५ लाचखोरांना अटक

$
0
0
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ परिक्षेत्रामध्ये एक जानेवारी ते ३१ मे २०१४ या कालावधीत एकूण ४५५ सापळा रचून कारवाई करण्यात आली. अपसंपदेचे २५, भ्रष्टाचाराचे १४ असे मिळून एकूण ४९४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आढावकडून ‘जिब्राल्टर’ची खाडी पार

$
0
0
नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची जिद्द बाळगणाऱ्या पुण्याच्या अमोल आढावने आणखी एक पराक्रम केला आहे. त्याने नुकतीच जिब्राल्टरची खाडी पार केली. स्पेन ते मोरोक्का हे जवळजवळ १८ किलोमीटर अंतर ४ तास ५९ मिनिटांत पार केले. यासह अमोल सात समुद्र यशस्वीपणे पार केले.

खुनी हल्लाप्रकरणी एकास अटक

$
0
0
आळंदी येथील केळगाव येथे राहणाऱ्या एका तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता आठ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

मार्केटिंगच्या जोरावर मोदी यशस्वी

$
0
0
‘लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याइतके प्रभावी मार्केटिंग आतापर्यंत कोणीच केले नव्हते. सोप्या आणि प्रभावी घोषणा, सोशल मीडियाचा वापर, देशभरात प्रवास आणि मतदारांशी त्यांनी सुसंवाद साधला. हे सगळे नियोजनबद्ध होते. त्यामुळे मार्केटिंगच्या जोरावरच मोदी आणि भाजपने सत्ता मिळवली,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगांवकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीच्या बंडखोराशीच लढत

$
0
0
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार न दिल्याने आपली बाजू भक्कम झाली आहे. आता आपली लढत राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराशीच आहे,’ असा दावा पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images