Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लठ्ठपणाच्या पेशंटसह डॉक्टरांचेही रॅम्पवॉक...!

$
0
0
लठ्ठ व्यक्ती आणि रॅम्पवॉक म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना...? परंतु बॅरिअॅट्रीक सर्जरीमुळे कमी झालेल्या वजनामुळे आत्मविश्वास प्राप्त केलेल्या अनेक लठ्ठ पेशंटने चक्क रॅम्पवॉक करण्याचा आनंदच लुटत डॉक्टरांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.

आरती प्रभूंचे स्मारक साकारतेय

$
0
0
‘गेले द्यायचे राहूनी तुझे नक्षत्रांचे देणे’ अशा अजरामर कविता.. ‘कोंडुरा’, ‘रात्र काळी घागर काळी’सारख्या कादंबऱ्या.. ‘एक शून्य बाजीराव’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’ अशी नाट्यकृतींनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रतिभावान साहित्यिक चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभूंचे स्मारक आकार घेत आहे.

शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांचे हाल

$
0
0
शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची बाब अपंग कल्याण आयुक्तालयाकडे आलेल्या तक्रारींवरून समोर आले आहे.

विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या कॉलेजांवर कडक कारवाई

$
0
0
फ्रिशिपचे पैसे न मिळाल्याने विद्यार्थ्यांची लिव्हिंग सर्टिफिकेट, मार्क लिस्ट आणि डिग्री सर्टिफिकेट देताना कॉलेजांकडून होणाऱ्या अडवणुकीची जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.

शिस्तीच्या सवयीमुळे नियमबद्धता

$
0
0
लष्करी परिसरात असलेल्या वानवडी बाजार आणि फातिमानगर या वॉर्डावर लष्करी शिस्तीचा छाप आहे. लष्करी अधिकारी आणि कर्मचारी यांचा या भागात वावर असल्याने नागरी समस्यांची कमतरता राहणार नाही, याची काळजी बोर्ड आणि लोकप्रतिनिधी घेत असतात. त्यामुळे नकळत नागरिकांनाही शिस्तीची सवय लागली असल्याने नियमबद्धता हा या वॉर्डाचा विशेष झाला आहे.

दुर्लक्षामुळे संधी असूनही विकास नाही

$
0
0
‘बंगल्यांचा वॉर्ड’ अशी ख्याती असलेला परिसर म्हणजे पुणे कँटोन्मेंट बोर्डातील वॉर्ड क्रमांक पाच. भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठा असलेल्या या वॉर्डात नागरिकांचे ब्रिटिशकालीन वडिलोपार्जित बंगले आहेत. जुन्या आठवणींचा हा ठेवा डोळ्यादेखत कोसळताना पाहण्याचे दुर्दैवी भोग या वॉर्डातील नागरिकांना भोगावे लागत आहेत.

हिंजवडीत पुन्हा दुचाकीस्वाराला लुटले

$
0
0
सततची लूटमार, मारामारी आणि खुनाच्या मुद्यावरून हिंजवडी पोलिस स्टेशन सध्या गाजत आहे. दोनच दिवसांपूर्वी या भागात झालेल्या आयटी इंजिनीअरच्या खुनाचा अद्याप तपास लागलेला नाही, ते प्रकरण ताजे असतानाच सोमवारी पुन्हा एका मोटारसायकलस्वाराला आडवून, त्याला मारहाण करत लुटल्याची घटना घडली.

‘किरकोळ व्यापारात परदेशी गुंतवणूक नको’

$
0
0
‘किरकोळ व्यापारामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे किरकोळ व्यापारामध्ये परदेशी गुंतवणूक येऊ नये,’ अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका असल्याचे माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी स्पष्ट केले.

शांतता राखण्यासाठीचे सर्वपक्षीय आवाहन

$
0
0
‘महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर हल्ला करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय शक्ती करीत असल्याचा आरोप करून या षड्‌यंत्राला बळी न पाडता शिवप्रेमी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी शांतता राखावी,’ असे आवाहन पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दोन जून) केले.

‘एलबीटी’वरून पुन्हा संघर्ष

$
0
0
स्थानिक संस्था कराबाबतचा (एलबीटी) प्रश्न न्यायप्रविष्ट असून राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्यास महाराष्ट्र राज्य महानगरपालिका आणि नगरपालिका कर्मचारी संघटना फेडरेशनने विरोध दर्शविला आहे. तरीही एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

अभ्यास दौरा नव्हे, सहलच

$
0
0
जपानमधील प्रकल्पांचा अभ्यास आणि शहराच्या विकासात त्याचा अंतर्भाव करण्यासाठी स्वखर्चाने दौऱ्यावर गेलो होतो, असा दावा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी केला. मात्र, जपान भेटीचे फलित मिळालेच पाहिजे, ही अपेक्षा गैर असल्याची सबब पुढे करत पदाधिकाऱ्यांनी दौरा नाही, तर वैयक्तिक सहल असल्याच्या आरोपांना पुष्टीच मिळवून दिली.

निमंत्रण महापौरांना, पदाधिकाऱ्यांचा सहभाग कसा?

$
0
0
जपान येथील ओकायामा शहरात आयोजित बैठकीसाठी आणि परिषदेसाठी आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्यात सहभागी होऊन महापौरांसह प‌ालिकेतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका, केंद्र सरकारची आणि जपान सरकारची फसवणूक केल्याचा आरोप केला जा‌त आहे.

बेंचना मिळेना ‘बसण्याची जागा’

$
0
0
प्रभागातील नागरिकांना बसण्यासाठी लाखो रूपये खर्च करून देण्यात आलेले शंभरहून अधिक लोखंडी बेंच हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात धुळखात पडून आहेत. गेले दोन महिन्यांपासून हे बेंच पडून असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी ठेकेदाराकडून आलेले बेंच, बसविण्याची जागा निश्चित न झाल्याने हे बेंच पडून आहेत.

पोलिस अधिकाऱ्याला मारहाण

$
0
0
दगडफेक करून जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडणाऱ्या लोकांच्या जमावाने हिंजवडी पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकाऱ्याला दगड आणि काठ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

तोडफोडप्रकरणी ८ जणांना अटक

$
0
0
बोपखेल येथील एका धार्मिक स्थळाची तोडफोड करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. कोर्टाने त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

बहाण्याने अनेकांना लाखोंचा गंडा

$
0
0
वडदरा, सासवड रोड आणि खेड शिवापूर येथे सात लाख रुपयांत रो-हाऊस देण्याच्या अमिषाने अनेकांची ७० ते ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

$
0
0
जनता वसाहत परिसरात एका तीन वर्षाच्या मुलीचा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी मूळचा रायगड येथील असलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. हा तरुण नुकताच त्या परिसरात राहण्यासाठी आला होता.

‘व्हॉट्स अॅप’वर अपलोड करताय?

$
0
0
‘व्हॉट्स अॅप’वर आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्रे अपलोड करणाऱ्या काही संशयितांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. दंगल माजवण्याच्या उद्देशानेच या तरुणांनी हा मजकूर पसरवल्याचा पोलिसांना संशय असून, त्या दृष्टीने त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे.

पिंपरीत नगरसेवकासह १३ अटकेत

$
0
0
पूर्वीच्या राजकीय वैमन्यस्यातून झालेल्या वादावादीचे पर्यावसान भांडणात झाले आणि त्यातून झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर सांगवीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्यासह १३ जणांना पोलिसांनी अटक केली.

मिरचीपूड डोळ्यात टाकून २० लाख लंपास

$
0
0
खेड शिवापूरजवळ पेट्रोल पंपावर जमा झालेली दोन दिवसांची २० लाख ५७ हजारांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना लुटल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात दुचाकीवरील दोघा आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images