Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘एक्स्प्रेस वे’वर अपघात; एक ठार

$
0
0
पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर टाटा सफारी आणि ट्रकच्या अपघातात टाटा सफारीमधील एकजण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास लोणावळ्याजवळील सिंहगड कॉलेज समोर झाला.

डीपी रोडच्या क्राँक्रिटीकरणाचा ‘उद्योग’

$
0
0
गल्लीबोळातील रस्त्यांच्या क्राँक्रिटीकरणासाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या महापालिका प्रशासनाने म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान सुस्थितीत असलेला डीपी रोड क्राँक्रिटीकरणासाठी खोदण्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे रस्ता खोदताना निर्माण होणाऱ्या वाहतुकीचे कोणतेही नियोजन न करता आणि वाहतूक पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता हा रस्ता खोदण्याचा ‘उद्योग’ केला जात आहे.

राजकीय वैमनस्यातून नगरसेवकासह तेरा अटकेत

$
0
0
पूर्वीच्या राजकीय वैमन्यस्यातून झालेल्या वादावादीचे पर्यावसान भांडणात झाले आणि त्यातून झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर सांगवीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्यासह १३ जणांना पोलिसांनी अटक केली.

रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्यांच्या संख्येत ३ वर्षांत वाढ

$
0
0
अनधिकृतपणे रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने मोहिमा राबवण्यात येत असल्या तरी गेल्या तीन वर्षांमध्ये नियम तोडून रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्यांच्या संख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

विकास अन् पर्यावरणाची सांगड पुणेकरांसाठी योग्य

$
0
0
पर्यावरणीय समस्याबाबत पुणेकर सर्वाधिक जागरूक असून या समस्या सोडविण्यासाठी विकास आणि पर्यावरणाची सांगड घालण्याबाबत ते आग्रही आहेत. वेगाने वाढणारी लोकसंख्या, विकासकामे आणि प्रदूषणामुळेच शहरातील वातावरण बदलत असल्याचे मत ९० टक्के पुणेकरांनी व्यक्त केले आहे.

त्यांच्यासोबतच्या त्या पंधरा दिवसांची आठवण येतेय

$
0
0
‘‘अरे पहिल्यांदा यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करा...’ कितीही धावपळ असो... कोठेही प्रवासात असो, मुंडेसाहेब प्रथम सुरक्षारक्षक, वाहनचालक यांची आस्थेने विचारपूस करत असत. त्यांनी कधीही आमच्या खाण्यापिण्याचे हाल होऊ दिले नाहीत...

‘अच्छे दिन आएंगे’ म्हणताना असे कसे झाले?

$
0
0
लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेत आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा सोशल मीडियाही केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने हादरला. ‘मंगळवारचा सूर्य उगवतानाच मावळला,’ ‘महाराष्ट्राने लोकनेता गमवला’, ‘मराठी नेत्यांना दिल्ली सुखाने जगू का देत नाही’, ‘अच्छे दिन आएंगे म्हणताना असे कसे झाले’, अशा स्टेटसमधून नेटकरांनी मुंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

लोकांच्या मनातले ओळखणारा नेता

$
0
0
महिन्या-दीड महिन्यापूर्वीची घटना. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात धनगर समाजाच्या मेळाव्यास भाजप नेते गोपीनाथ मुंडे उपस्थित होते. उपस्थित मंडळींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून काहीशा नाराजीचे वातावरण होते. एक-दोनदा तर श्रोत्यांपैकी काही कार्यकर्त्यांनी मुंडे यांचे भाषण रोखून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

तसाच हातात हात... तशीच गप्पाष्टकं... आणि तीही अखेरचीच!

$
0
0
मला मंत्रिपद मिळेल की नाही, हे ठाऊक नाही. नियतीच्या मनात काय असते, ते कोणी जाणले आहे? पण, एक गोष्ट नक्की. भाजपचे सरकार केंद्रात येणार! त्यानंतर पुन्हा नक्की निवांत भेटू. पुण्यात येऊन गप्पा झोडायला मला नेहमीच आवडते. पण, आता आधी लगीन कोंढाण्याचे आहे...

स्वतंत्र पासिंग हवे होते का?

$
0
0
कॉलेज पातळीवर अंतर्गत (इंटर्नल) आणि प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षांमधून वाटली जाणारी गुणांची खैरात रोखण्यासाठी इंटर्नल आणि एक्स्टर्नल परीक्षेत स्वतंत्र पासिंग ठेवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) विचाराधीन होता.

दाभोलकर हत्येचा तपास सुरू

$
0
0
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाला सुरुवात केली. हायकोर्टाच्या आदेशानुसार दाभोलकर हत्येचा तपास ‘सीबीआय’ला देण्यात आला होता. त्यानुसार ‘सीबीआय’ने पुणे पोलिसांकडून कागदपत्रे मागवून घेत मंगळवारी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

मान्सून दोन दिवसांत केरळमध्ये

$
0
0
सर्वांना प्रतीक्षा असलेला मान्सून येत्या दोन दिवसात केरळच्या किनारपट्टीवर थडकण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासात मान्सून केरळ, दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग आणि तामिळनाडूच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली.

‘गेले द्यायचे राहून...’

$
0
0
गोपीनाथ मुंडे पदवीधर नसल्याचा आरोप गेल्या काही दिवसांमध्ये विरोधक करू लागले होते. त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांचे डिग्री सटिफिकेट पुण्याचे नवे खासदार अनिल शिरोळे यांनी विद्यापीठातून काढून घेतले होते.

मनसेची तटस्थतेची परंपरा कायम

$
0
0
गेल्या काही दिवसांत गाजावाजा करीत निवडणुकीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात अचानक आपली तलवार म्यान केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी समाप्त झाली, तेव्हा मनसेकडून अर्ज न आल्याचे स्पष्ट झाले.

‘अच्छे दिन’ ते सन्नाटा

$
0
0
केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या आठवड्याभरात आनंदाच्या वातावरणाशी जुळवून घेतलेल्या शहर कार्यालयावर सोमवारी सकाळी अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाची घटना कळताच, पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शहर कार्यालयात मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संप स्थगित

$
0
0
विविध प्रलंबित मागण्यांपैकी काही मागण्यांची येत्या दहा दिवसांत अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन राज्य सरकारकडून मिळाल्यानंतर संपावर गेलेल्या राज्यातील बारा हजार डॉक्टरांनी बुधवारी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.

‘हेलिकॉप्टर’च्या सापडल्या ७० जाती

$
0
0
‘हेलिकॉप्टर’ अशा टोपण नावाने प्रसिद्ध असलेले चतूर आणि टाचण्या या कीटकांच्या तब्बल सत्तर जाती गरवारे कॉलेजच्या‘बायोडायर्व्हसिटी’ विभागाच्या विद्यार्थ्यांनी जैवविध्याने नटलेल्या महाराष्ट्रातील पश्चिम घाटात शोधल्या आहेत.

महापालिका लावणार ३ हजारांवर झाडे

$
0
0
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात तीन हजारापेक्षा अधिक झाडे लावली जाणार आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

महाबळेश्वरमध्ये निवडुंग बहरला

$
0
0
भारतातील सर्वात उंच निवडुंग म्हणून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेला महाबळेश्वर येथील सरकारी दुग्ध शाळेत आसणारा निवडुंग सध्या फुलांनी बहरला आहे. त्याची फुले ब्रम्हकमळासारखी दिसत असून, ती अत्यंत सुवासिक व पांढरी शुभ्र दिसतात.

गरुडच बनले औषधांचे शिकार

$
0
0
जनावरांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या डायक्लोफिनॅक या औषधाने हजारो गिधाडांना नष्ट केल्यानंतर आता ‘स्टेप इगल’ ही गरुडाची जात या औषधाची शिकार बनली आहे. राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या दोन गरुडांच्या मृत्यूचे कारण डायक्लोफिनॅक औषध असल्याची धक्कादायक माहिती अभ्यासकांनी प्रसिद्ध केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images