Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

समाजद्रोही प्रवृत्तींना थारा देऊ नका

$
0
0
‘महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकूर व फोटो पोस्ट करणाऱ्या समाजद्रोही प्रवृत्तींना थारा देऊ नये आणि संयम राखून शांतता पाळावी,’ असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले आहे.

विकृत घटकांचा संघटनांकडून निषेध

$
0
0
सोशल नेटवर्किंगवरून महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शहर-जिल्हा काँग्रेसतर्फे करण्यात आली. समाजातील या विकृत घटकांचा काँग्रेस निषेध करीत आहे, असे शहराध्यक्ष अॅड्. अभय छाजेड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जाळपोळीच्या ५२ घटना

$
0
0
फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांची आक्षेपार्ह छायाचित्रे अपलोड केल्याप्रकरणी कोथरूड व वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर शहरात सुरू झालेल्या हिंसाचारप्रकरणी ११७ जणांना अटक करण्यात आली असून अन्य १०१ जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस सहआयुक्त संजय कुमार यांनी दिली.

लोणावळ्यासह पिंपरीत रास्ता रोको

$
0
0
सोशल मीडियावरून झालेल्या महापुरुषांच्या अवमान प्रकरणाचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी रविवारीही (एक जून) उमटले. बंद, दगडफेक, निषेध रॅली, सभा, निदर्शने, रास्ता रोको करीत शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला.

मेट्रो, एसआरए आणि पीएमआरडीए…

$
0
0
राज्य सरकारकडे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याची निवडणुकीपूर्वीची अखेरची संधी तरी पुण्यातील आमदार विधिमंडळाच्या अधिवेशनात साधणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

नवीन गावे ‘वसविण्यास’ गरज तीन हजार कोटींची!

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी किमान दोन ते तीन हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार असून, त्यापैकी ९० टक्के निधी राज्य सरकारकडून मिळविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

वारकरी संघटनांचे धरणे आंदोलन

$
0
0
पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई देवस्थानच्या समितीसंदर्भात वारकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विठ्ठल मंदिर हा वारकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क असून, मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर वारकरी संप्रदायाने नेमलेलेच सदस्य असावेत, या मागणीसाठी राज्यभरातील वारकरी संघटना आठ जूनला नामदेव पायरीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.

नदीसुधार प्रकल्प पुण्यातही राबविणार

$
0
0
‘पुण्यातील नदीसुधार प्रकल्प अनेक वर्ष रेंगाळला आहे. अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर पुण्यातही वेगाने नदीसुधार प्रकल्प राबविण्याला तसेच बीआरटीमधील त्रुटी दूर करण्याला माझे प्राधान्य असेल.

सूत्रधाराचा शोध सुरूच

$
0
0
नागरिकांच्या भावना भडकवणारी महापुरुषांची आक्षेपार्ह छायाचित्रे कोणत्या ठिकाणावरून, कोणी अपलोड केली, त्याच्या ‘आयपी अॅड्रेस’चा शोध सुरू आहे. मात्र, फेसबुक बेवसाइटचे ‘यूआरएल’ अमेरिकेतील असल्याने त्यांच्याकडून माहिती मिळाल्याशिवाय पोलिसांना तपासाच्या पातळीवर कोणतीही हालचाल करणे शक्य नसल्याचे सह आयुक्त संजय कुमार यांनी स्पष्ट केले.

एसटीच्या ५३ गाड्या फोडल्या

$
0
0
महापुरुषांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्यामुळे शहराच्या झालेल्या दगडफेकीच्या घटनांचा फटका एसटी वाहतुकीला बसला. विविध महामार्गावर एसटीच्या ५३ गाड्यांवर दगडफेक झाली, त्यामध्ये एसटीचे सुमारे ५३ लाख रुपयांचे नुकसान झाले.

शांतता ‘लॉग-ऑफ’

$
0
0
सोशल मीडियावरून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर शनिवारी आटोक्यात आलेली पुण्यातील कायदा-सुव्यवस्था रविवारी दुपारपासून पुन्हा हाताबाहेर गेली. हाती भगवा घेतलेल्या टोळक्यांनी दटावणी करून शहरभर दुकाने बंद केली.

इथे पाहा बारावीचा निकाल

$
0
0
राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून यंदा राज्याचा एकूण निकाल सर्वाधिक म्हणजे ९०.०३ टक्के लागला आहे. या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी तुम्ही वर्षभर मेहनत घेतली आहे. तेव्हा तुम्हाला घवघवीत यश मिळणारच. तुमचा निकाल पाहाण्यासाठी क्लिक करा.

बारावीचा विक्रमी निकाल जाहीर

$
0
0
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निकालानं यंदा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून राज्यातील तब्बल ९०.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागानं यंदाच्या निकालातही बाजी मारली असून मुलींनीही आपली हुशारी पुन्हा सिद्ध केली आहे.

अंतर्गत मूल्यमापनाचा चमत्कार

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (बोर्ड) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये यंदा उच्चांकी निकालाची नोंद झाली आहे. यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या ११ लाख ९८ हजार ८५९ विद्यार्थ्यांपैकी एकूण १० लाख, ७९ हजार ३३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची घोषणा बोर्डातर्फे सोमवारी करण्यात आली.

मेळघाटाला मिळाला ‘मैत्री’चा हात

$
0
0
मेळघाटातील नागरिकांमध्ये वाड्यावस्त्यांवर जाऊन प्रबोधनाचे काम करण्यासाठी आता तेथील स्थानिक तरुणांची एक फळी तयार झाली आहे. शिक्षण, आरोग्य शिक्षण आणि शेती व संघटन यासाठी त्यांचे कार्य जोमाने सुरू आहे.

कृउबासत मार्केट यार्ड सोसायटीची घुसखोरी

$
0
0
प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील गट क्रमांक ५७१ मध्ये छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार गृहरचना सहकारी संस्थेने दक्षिणेकडील बाजूस अतिक्रमण केले असल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी पणन संचालकांकडे सादर केला आहे.

व्होल्वोचा स्वतंत्र स्टँड लालफितीतच

$
0
0
पुण्यातून ये-जा करणाऱ्या शिवनेरी व्होल्वो बसेससाठी स्वतंत्र स्टँड तयार करण्याची योजना एसटी प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली योजना लालफितीत अडकल्याचे समोर आले आहे. एसटी प्रशासनाने शंकरशेठ रोडवरील एसटीच्या जागेमध्ये शिवनेरी व्होल्वो बसेससाठी स्वतंत्र स्टँड तयार करण्याची योजना तयार केली आहे.

पालिकेचे कर्मचारी अद्याप निवडणुकीच्या कामातच

$
0
0
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांची अद्यापही निवडणूक शाखेच्या कामातून सुटका झाली नसल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांविना दैनंदिन कामकाज किती दिवस सांभाळायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शांतता कमिटी फक्त नावापुरतीच!

$
0
0
पोलिस स्टेशनमध्ये मोठा गाजावाजा करून स्थापन करण्यात आलेल्या शांतता कमिट्या पुण्यात गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या तोडफोडीत औषधालाही उरल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, टोळक्यांनी हाती भगवा घेऊन संपूर्ण शहर वेठीस धरल्याचे चित्र पुणेकरांनी पाहिले.

अनधिकृत फ्लेक्सवर येरवड्यात कारवाई

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींनी उभारलेल्या अनधिकृत फ्लेक्सवर संगमवाडी क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई केली आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर फ्लेक्स मोठ्या संख्येने उभारण्यात आले होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images