Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बनावट नोटा : तरुणाला सक्तमजुरी

$
0
0
बनावट नोटांचा चलनात वापर केल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील एका तरुणाला सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश कालिदास वडणे यांच्या कोर्टाने सुनावली आहे.

आता भर मावाबंदीवर

$
0
0
राज्याबाहेरून चोरी-छुपे मार्गाने काही प्रमाणात गुटखा महाराष्ट्रात येत असला, तरी त्यालाही आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी स्पष्ट केले. एका कार्यक्रमानिमित्ताने ते पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कर्नाटक हापूसचा हंगाम लांबणार

$
0
0
यंदाच्या वर्षी कर्नाटक हापूस आंब्याचा हंगाम लांबणार असल्याने ‘नीलम’ आणि ‘तोतापुरी’ आंब्याचा हंगाम उशिराने सुरू होणार आहे. कर्नाटक हापूसचा हंगाम यंदा उशिरा सुरू झाला असल्याने जून अखेरपर्यंत त्याची आवक सुरू राहण्याची शक्यता आहे.

कांदा-बटाटा बाजार बंद

$
0
0
कांदा-बटाटा बाजारात हमालीचे काम करण्यासाठी टोळी पद्धत राबवण्याच्या विरोधात आडते छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनने मंगळवारपर्यं बंद पुकारला आहे. या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी बैठक बोलावली आहे.

पुणेकरांच्या जिभेला लिचीची रुची

$
0
0
आंबटगोड चवीच्या लिची फळाच्या खरेदीला पुणेकर अधिक पसंती देऊ लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लिचीचे उत्पादन अधिक असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात फळे दाखल झाली आहेत. येत्या आठवड्यात लिचीची आवक वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर त्याचे दर आणखी उतरतील.

महिला अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

$
0
0
औंध येथील सोसायटीच्या सदस्यांची नोंदणी करण्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना सहकार खात्यातील महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने शनिवारी दुपारी अटक केली. या प्रकरणी सहायक निबंधक नूतन श्रीकांत भोसले (४५, रा. साखर संकुल, शिवाजीनगर) आणि ग्रामसेवक विनोद भीमराव दुधाळ (३३, पौड, मुळशी) याला अटक करण्यात आली आहे.

बनावट प्रमाणपत्रांविरोधात विद्यापीठ पोलिसांकडे जाणार

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या बनावट पदव्या आणि प्रमाणपत्रे समोर येण्याच्या प्रकारांची सखोल चौकशी होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणांची चौकशी पोलिसांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्यात त्या विषयीची तक्रार पोलिसांकडे दाखल केली जाणार आहे.

दख्खनची राणी ८५व्या वर्षात

$
0
0
गेल्या ८४ वर्षांपासून पुणे-मुंबई मार्गावर अथक धावणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चे वैभव टिकवण्यासाठी या गाडीचा रेक बदलण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी

$
0
0
‘कर्जत येथील चंद्रभागा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये अनाथ मुलामुलींवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी रायगड महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आणि कर्जत पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

‘वाहन’ची गती मंदावली

$
0
0
प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) वाहनांच्या नोंदणीसाठी वापरण्यात येणारी ‘वाहन’ ही यंत्रणा बंद पडत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्या आठवड्यापासून हा प्रकार सुरू असून, आरटीओ प्रशासनाने ही यंत्रणा तात्काळ दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

स्किल्ड मायग्रेशन व्हिसासाठी ‘टोफेल’चा स्कोअर ग्राह्य

$
0
0
ऑस्ट्रेलियाचा स्किल्ड मायग्रेशन व्हिसा मिळवण्यासाठी आता ‘टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज फॉरीन लँग्वेज’ (टोफेल) या परीक्षेचा स्कोअर ग्राह्य धरणार आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियात जाऊ इच्छिणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांना ‘टोफेल’ देऊन व्हिसासाठी अर्ज करता येऊ शकेल.

इंजिनीअर खूनप्रकरणी कोणतेही धागेदोरे नाहीत

$
0
0
इन्फोसिस कंपनीत नोकरी करत असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या खुनाप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वरुण सेठी (३४, रा. सध्या रा. हिंजवडी, मूळ-पंजाब, भटिंडा) या सॉफ्टवेअर इंजिनीअरचा खून करण्यात आला आहे.

रस्ता काँक्रिटीकरणाचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करा

$
0
0
शहराच्या विविध भागांमध्ये सुरू असणाऱ्या रस्ता काँक्रिटीकरणाचेाच्या कामामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्यासाठी महापालिकेच्या स्टॅक कमिटीतर्फे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

भारतीय संस्कृतीचे जतन करणे आवश्यक

$
0
0
‘जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय संस्कृतीचे जतन करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे केले. चिंचवड-शिवतेजनगर येथे मातोश्री प्रतिष्ठान आणि ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित ‘आई महोत्सवा’च्या समारोप्रसंगी ते बोलत होते.

पेन्शनसाठी घरेलू कामगारांचा राज्यभर आंदोलनाचा इशारा

$
0
0
घर कामगार महिलांना महिना पाच हजार रुपये पेन्शन मिळावी आणि अन्य मागण्यांसाठी १२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी रविवारी दिला. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीआयटीयू) या संघटनेच्या वतीने साने गुरुजी स्मारक येथे घेण्यात आलेल्या घर कामगारांच्या महाराष्ट्रव्यापी परिषदेत ते बोलत होते.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आजपासून राज्यभर आंदोलन

$
0
0
राज्यातील ८० टक्के जनतेला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सरकारच्या आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांच्या विविध मागण्या मान्य करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने संतापलेल्या डॉक्टरांनी आजपासून (दोन जून) संपाचे हत्यार उगारले आहे.

महामार्गावर वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीला अटक

$
0
0
पुणे-सातारा महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबणाऱ्या वाहनचालकांना अडवून, धाक दाखवून त्यांची लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला राजगड पोलिसांनी मुद्देमालासह पकडले.

आता राज्यातही परिवर्तन घडणार

$
0
0
‘देशामध्ये नुकतेच परिवर्तन घडले आहे. राज्यातही असेच परिवर्तन घडेल. राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असून, पुण्यातील आठही जागांवर महायुतीचेच आमदार निवडून येतील. आगामी महापालिका निवडणुकांमध्येही महायुतीच विजयी होईल,’ असा विश्वास माहिती प्रसारण मंत्री तसेच वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी व्यक्त केला.

तात्पुरती संलग्न असलेली कॉलेज प्रवेशातून बाहेरच

$
0
0
विद्यापीठांकडून तात्पुरते संलग्नत्व मिळविणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेजांना इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचा निर्णय निदान पुढील काही काळ तरी तसाच राहण्याची शक्यता आहे.

खड्ड्यांची माहिती देण्यात शहरवासीय उदासीनच

$
0
0
रस्त्यावर पडलेल्या खड्डे कळवा, चोवीस तासात त्याची दुरूस्ती केली जाईल, या महापालिकेने सुरू केलेल्या उपक्रमाला पुणेकरांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा दिवसांत शहरातील विविध भागातून केवळ ५६ तक्रारी पालिकेकडे आल्या असून त्यातील १६ तक्रारींचे निवारण तातडीने करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images