Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आता नवी महापालिका कधी?

0
0
महापालिकेच्या हद्दीत आणखी ३४ गावांचा समावेश निर्णय झाला; आता पुण्याच्या पूर्व भागासाठी नवी महापालिका कधी जाहीर करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हद्दवाढीमुळे पुण्याचे क्षेत्रफळ दुपटीने वाढणार असून, नागरी सुविधा पुरविण्याचा ताण पालिकेवर पडणार आहे.

अजितदादा… राजीनामा द्या!

0
0
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याची निःपक्ष चौकशी होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पुण्यात शुक्रवारी केली. भाजपने अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कारवाईची मागणी केली आहे.

विकासकामांचे प्रस्ताव आले ‘फास्ट ट्रॅक’वर

0
0
‘लोकसभेपाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नियोजित कामांचे प्रस्ताव आठ दिवसांत सादर करा,’ असा आदेश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिला.

रखडलेला मान्सून पुन्हा वेग घेणार

0
0
मागील आठ-दहा दिवसांपासून मान्सूनची थंडावलेली वाटचाल या आठवड्यात पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे. अंदमान-निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागरात अडकलेल्या मान्सूनची येत्या चार दिवसांत प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पालखी तळांच्या जागा विकसनाच्या विळख्यात

0
0
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांवरील पालखी तळांच्या जागा वाढत्या नागरीकरणामुळे विकसनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. या जागा पालखी तळासाठी आरक्षित करण्यासंदर्भात राज्य सरकारने अद्याप निर्णय न घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

मिळकतकराच्या वसुलीचे ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण

0
0
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांतच अपेक्षित उत्पन्नापैकी ६० टक्के वाटा गोळा करण्यात मिळकतर विभागाने यश मिळवले आहे. तब्बल साडेचार लाख पुणेकरांनी मे अखेरपर्यंतच्या सवलतीचा लाभ उठवत, पालिकेच्या तिजोरीत ४४० कोटी रुपये जमा केले आहेत.

बीआरटी मार्गावर अपघात; एक ठार

0
0
सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्गात पीएमपीएमएल बसच्या चाकाखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बी. टी. कवडे चौकात ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बसचालकाला मारहाण करून बसच्या काचा फोडल्या.

महापुरुषांच्या बदनामीमुळे शहर, जिल्ह्यात तणाव

0
0
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आदी महापुरुषांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यामुळे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या काही भागांमध्ये तणाव निर्माण झाला.

कोणी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद् भवत नाही

0
0
‘राज्य सहकारी बँकेसंदर्भात झालेल्या तक्रारींची चौकशी होणार असून, त्याबाबत आत्ताच कोणताही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. यामध्ये सर्वांनाच आपली बाजू मांडण्यास संधी आहे.

पतसंस्थांना ‘एनओसी’ हवीच

0
0
‘राज्य सरकारच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय (एनओसी) मल्टिस्टेट पतसंस्थांना केंद्राने थेट परवानगी देऊ नये, असे पत्र राज्य सरकारकडून नव्या केंद्र सरकारला देण्यात येणार आहे,’ अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी दिली.

आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर

0
0
‘विधानसभेच्या निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय घेण्यात येईल,’ असे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले. निवडणुकांमधील मुद्दे वेगवेगळे असल्याने नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभेच्या निकालापेक्षा विधानसभेच्या निकालात मोठी तफावत दिसेल, असा दावा त्यांनी केला.

जादा दराने मुद्रांक शुल्कवसुली

0
0
शहरात ३४ गावांच्या समावेशाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसतानाच, नोंदणी व मुद्रांक विभागाने मात्र तातडीने एक टक्का जादा दराने मुद्रांक शुल्काची वसुली करण्याचा फतवा काढला. मात्र, या संदर्भात जोरदार आक्षेप घेण्यात आल्याने खात्याने हा ‘फतवा’ सायंकाळी तातडीने मागे घेण्यात आला.

चौकशी तर पूर्ण होऊ द्या

0
0
‘राज्य सहकारी बँकेला झालेल्या तोट्यासंदर्भात अद्याप जबाबदारी निश्चित झालेली नाही. चौकशी पूर्ण झालेली नसताना कोणालाही दोषी समजून आरोप करणे योग्य ठरणार नाही,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी म्हटले आहे.

महाराजांच्या अवमानाने तणाव

0
0
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यामुळे शनिवारी शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या काही भागांमध्ये तणाव निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, तर काही ठिकाणी पीएमपीच्या २० बसेसच्या काचा फोडण्यात आल्या.

दिमाखदार संचलन, प्रात्यक्षिक

0
0
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १२६ व्या तुकडीसाठीचे राष्ट्रपतींचे सुवर्णपदक हरियाणाच्या राहुल कडियान याने पटकावले. उत्तरप्रदेशचा विवेक यादव याने रौप्यपदक तर जम्मू-काश्मीरच्या सूर्यप्रकाशने कांस्यपदक पटकावले.

‘मराठी सिनेसृष्टीचे पाय खेचू नका’

0
0
पुणे - मराठी भाषा आणि संस्कृती जतन करण्यात मराठी सिनेमाचे योगदान मोठे आहे , सध्याच्या व्यापारी युगात आपली जुनी धोरणे पायदळी तुडवून मराठी सिने सृष्टीचे पाय खेचले जातील अशा प्रकारचे समीक्षण कृपया थांबवा अशा स्वरुपाची आवाहने येथे आज झालेल्या 'सलाम पुणे 'च्या 'थेट भेट- थेट संवाद' कार्यक्रमात रसिकांनी केली.

वाहनचालकांना लुटणाऱ्यांना अटक

0
0
पुणे-सातारा महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबणाऱ्या वाहनचालकांना अडवून, धाक दाखवून त्यांची लूटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला राजगड पोलिसांनी मुद्देमालासह पकडले.

पेपर तपासणीची अद्याप बिले थकली

0
0
पुणे विद्यापीठासाठी परीक्षांची कामे करणाऱ्या प्राध्यापकांना यंदा आपल्या मानधनापासून वंचितच राहावे लागले आहे. विद्यापीठासाठी पहिल्या सत्राचे पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकांना दुसऱ्या सत्राच्या परीक्षांसाठीची तपासणी अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतरही पहिल्या सत्रासाठीचे मानधन मिळाले नसल्याची ओरड करण्यात येत आहे.

महसूल विभागात दस्तांचे होणार स्कॅनिंग

0
0
जमीन महसुलाशी संबंधित महत्त्वाच्या दस्तांचे दस्तांचे स्कॅनिंग करण्याच्या टेंडरला राज्य शासनाने मान्यता दिली असून, महसूल विभागातील सुमारे २६ कोटी दस्तांचे स्कॅनिंग करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. स्कॅनिंग झाल्यानंतर सातबारा उतारे, फेरफार, खाते उतारा आदी दस्त कम्प्युटरवर उपलब्ध होणार आहे.

‘त्याच्या’ अटकेची पोस्टही बोगस

0
0
फेसबुकवर शिवाजी महाराज व महापुरुषांची आक्षेपार्ह छायाचित्रे अपलोड करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले असून त्याचे नाव निहाल खान आहे, असा संदेश त्याच्या छायाचित्रासह फेसबुक व व्हॉट्स अॅपवर फिरत होता. मात्र, पोलिसांनी अशा कोणत्याही व्यक्तीला अटक केलेली नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images