Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यातील ४ मतदारसंघांत ६२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

$
0
0
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या लाटेच्या प्रभावात पुणे जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह आम आदमी पक्ष आणि मनसेची अक्षरशः दाणादाण उडाली. पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांत निवडणूक लढविणाऱ्या ७१ पैकी ६२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

शहर काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार का?

$
0
0
केंद्रीय स्तरापासून स्थानिक पातळीपर्यंत मोदी लाटेमुळे काँग्रेसची धूळधाण उडाल्याने संघटनात्मक फेरबदल होण्याचे संकेत दिले जात आहेत. पुण्यातही काँग्रेसला तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याने आगामी विधानसभेपूर्वी शहर काँग्रेसची पुर्नबांधणी केली जाण्याची दाट शक्यता आहे.

आज ‘पराभव’ चिंतन

$
0
0
शहराच्या लोकसभा इतिहासातील सर्वांत दारूण पराभवानंतर खडबडून जाग्या झालेल्या काँग्रेसने आज (रविवारी,१८ मे) शहरातील पदाधिकाऱ्यांची आत्मचिंतन बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पराभवाच्या कारणमीमांसेसह भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीनेही विचार होण्याची शक्यता आहे.

‘CISEC’च्या १२ वी चा निकाल जाहीर

$
0
0
इंडियन स्कूल सर्टिफिकेट (आयएससी) अभ्यासक्रमाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. परंतु, ‘कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स’ची (सीआयएससीई) वेबसाइट हँग झाल्याने पुण्यातील ‘आयएससी’च्या विद्यार्थ्यांना सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा निकाल पाहता आला नाही.

वाहतूक पोलिसावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा

$
0
0
हरियाणा पासिंगच्या कारचा पुण्यात कर भरण्याच्या बहाण्याने वाहतूक पोलिसाने ५५ हजार रुपये लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वाहतूक पोलिसाविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आह.

‘डीपी’ची सुनावणी उद्यापासून

$
0
0
हरकती-सूचना नोंदविणाऱ्या अनेक नागरिकांना त्याबद्दलची माहिती न मिळाल्याने; तसेच सुनावणीसाठी मिळणाऱ्या कमी वेळाबाबत आक्षेप घेण्यात आल्याने लांबणीवर ढकलण्यात आलेल्या विकास आराखड्यावरील (डीपी) सुनावणीला सोमवारपासून (१९ मे) पुन्हा सुरुवात होणार आहे.

कंपन्यांचा कल ‘एनर्जी ऑडिट’कडे

$
0
0
विजेची वाढती टंचाई आणि विजेच्या दरात गेल्या काही वर्षांत झालेली वाढ यामुळे उत्पादन खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने वीज बचतीचा मार्ग कंपन्या अवलंबत आहेत. बचतीची नेमकी कल्पना येण्यासाठी कंपन्यांमध्ये ‘एनर्जी ऑडिट’ करून घेण्याचा कल पुण्यामध्ये वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीचा अविरल रावत ठरला ‘सुपर पेसर’

$
0
0
ताशी १३९ किलोमीटर वेगाने चेंडू टाकून दिल्लीचा अविरल रावत ‘बीसीसीएल-महाराष्ट्र टाइम्स’ने आयोजिलेल्या ‘सुपर पेसर’ मोहिमेचा हिरो ठरला. महान वेगवान गोलंदाज आणि मोहिमेचे मुख्य मार्गदर्शक कोर्टनी वॉल्श यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या राष्ट्रीय अंतिम फेरीत त्याने ही कामगिरी केली.

‘लाइट रेल’चा खर्च मेट्रोपेक्षाही अधिक

$
0
0
शहरातील दहा हजार कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो प्रकल्पाचे घोंगडे अद्याप केंद्र सरकारच्या दरबारी भिजत पडले असतानाच, शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान साडेपाच हजार कोटी रुपयांची ‘लाइट रेल’ राबविण्याचा प्रस्ताव पालिकेसमोर आला आहे.

प्राण‌िगणनेचा कालावधी बदलणार

$
0
0
वळवाच्या पावसाचे आगमन अलिकडे सरकल्याने पुढील वर्षीपासून अभयारण्यांमधील प्राण‌िगणना एक महिना अगोदर करण्यात येणार आहे. पावसामुळे गेल्या काही वर्षांपासून भीमाशंकरसह पश्चिम महाराष्ट्रातील जंगलांमध्ये बुद्धपौर्णिमेला ढगाळ हवा आणि धुक्यामुळे वन्यप्राण‌िगणनेला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वनाधिकाऱ्यांनी दोन वेळा ‘मचाणा’वरची गणना करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

भाडेकरार ऑनलाइन करण्यावर भर

$
0
0
शहरातील फ्लॅटचे भाडेकरार (लिव्ह अॅन्ड लायसन्स) घरबसल्याच करण्याच्या दृष्टीने नोंदणी व मुद्रांक विभाग प्रयत्नशील असून, हे भाडेकरार विनावकील ऑनलाइन करण्याचाही विभागाचा प्रयत्न आहे.

मान्सून आज अंदमानात

$
0
0
दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेस शनिवारपर्यंत दाखल होण्याची शक्यता असलेला मान्सून आता एक दिवस उशिरा म्हणजेच आज (रविवारी) दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

लोकप्रियता ‘पावर’लेस ?

$
0
0
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जे पानिपत झाले, त्याची जबाबदारी कोण घेणार या प्रश्नाचे उत्तर निकालानंतर दुसऱ्या दिवशीही मिळू शकले नाही. राष्ट्रवादीचा दारूण पराभव म्हणजे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मतदारांनी दाखविलेला अविश्वास असल्याचेच सिद्ध होते आहे; पण त्याबाबत कोणीच थेट बोलायला तयार नसल्याने ही झाकली मूठ कोण उघडणार असाच प्रश्न आहे.

'मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

$
0
0
राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाचा धुरळा उडू लागलाय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांनी केली आहे.

मोदींनी कपटीपणाने निवडणूक लढविली

$
0
0
'लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा झालेला विजय हा भाजपचा नसून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजय आहे. त्यांनी कपटीपणाने निवडणूक लढविली,' अशी टीका सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष भाई वैद्य यांनी केली.

मतदारयादीची होणार तपासणी

$
0
0
विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत शंभर टक्के मतदारांची घरोघरी जाऊन खातरजमा करण्यात येणार आहे. नावे वगळणे आणि चुका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

पुणे माओवाद्यांच्या नकाशावर

$
0
0
मुंबईशी जवळीक साधणारे, मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले, बुद्धिवंतांचा भरणा असलेले, तसेच माओवाद्यांबद्दल सहानुभूती दर्शवणारे बुद्धिवंतही पुण्यात आहेत. त्यामुळे हे शहर माओवाद्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

पुण्याच्या हद्दवाढीवर शिक्का?

$
0
0
शहराच्या हद्दीलगतच्या ३४ गावांचा समावेश पुणे पालिकेमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले असून, त्याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर घेतला जाणार असल्याचे समजते.

वादळी पावसाने शहरात दाणादाण

$
0
0
शहर व उपनगरामध्ये मंगळवारी दुपारनंतर झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याबरोबरच घरांचे पत्रे उडण्याचे प्रकार उपनगरात घडले. झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडून वीज खंडित होण्याच्या घटना शहरात घडल्या.

फर्ग्युसनमध्ये सावरकर स्मरण

$
0
0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजच्या होस्टेलमध्ये ते १९०२ ते १९०५ या काळात राहत असलेल्या खेालीत तरुणांसह ज्येष्ठ सावरकर प्रेमींनी बुधवारी गर्दी केली होती.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images