Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बालकाचा बुडून मृत्यू

$
0
0
उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पुण्यात मामाकडे राहण्यास आलेल्या आठ वर्षांच्या मुलाचा गंगाधामजवळील वर्धमान सोसायटीच्या जलतरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

मान्सून ५ जूनला केरळमध्ये

$
0
0
अंदमानमध्ये सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधी मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवलेला असतानाच मान्सूनचे केरळमधील आगमन मात्र काहीसे लांबण्याची शक्यता आहे.

पुण्यात 'नोटा'ही चालला

$
0
0
लोकसभा निवडणुकीतील एकाहून एक 'सरस' उमेदवार रिंगणात असतानाही या उमेदवारांपैकी 'कोणताही मतदार लायक नसल्याचा' निष्कर्ष काढून पुणे जिल्ह्यातील तब्बल ४१ हजार ७०० मतदारांनी 'नन ऑफ द अबाव्ह' (नोटा)चा अधिकाराचा वापर केला.

बालेकिल्ला राखला; पण मताधिक्य घटले

$
0
0
बारामती म्हणजे राष्ट्रवादी​ काँग्रेसचा बालेकिल्ला. हा किल्ला राखण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. मात्र, या किल्ल्याला महायुतीचे महादेव जानकर यांच्या माध्यमातून सुरुंग लागल्याची बोच खासदार सुप्रिया सुळे यांच्या मनात कायम सलणार आहे.

राष्ट्रवादी उरला फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरता

$
0
0
राष्ट्रवादी कॉँग्रेस फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरताच राहिल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले आहे. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात पक्षप्रमुख शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना विजयी होण्यासाठी परिश्रम करावे लागले.

'ईव्हीएम' असूनही मोजणीला उशीरच

$
0
0
प्रत्येक फेरीनंतर केली जाणारी कागदपत्रांची पूर्तता, मशीनमधील मते आणि प्रत्यक्षात उमेदवाराला मिळालेली मते याची पडताळणी, त्यावर खात्री झाल्यानंतरच निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर केला जाणारा निकाल यामुळे पुण्यासह चारही लोकसभा मतदारसंघांचे अंतिम निकाल हाती येण्यास सायंकाळ उजाडली.

शिरोळेंना कोथरूडमधून ९१ हजारांची आघाडी

$
0
0
पुण्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य घेत भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीवर निर्विवाद वर्चस्व राखले.

‘मकालू’वर आज फडकणार तिरंगा?

$
0
0
पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक आज (शनिवार) इतिहास रचण्याची शक्यता आहे. जगातील पाचव्या क्रमांकाचे शिखर मकालू सर करण्यासाठी शुक्रवारी रात्री गिरिप्रेमीचे दोन सदस्य रवाना होणार आहेत.

मावळमध्ये अजितदादांना धक्का

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोदी लाटेचा फायदा झाला, तर आघाडीला मात्र अति आत्मविश्वास नडल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार धक्का बसला.

बड्या नेत्यांचे गड भुईसपाट

$
0
0
'वर्षानुवर्षांचा विरोध विसरून एकत्र आलो, मतभेदांचे प्रदर्शन न करता प्रचार केला, साम-दाम-दंड-भेद अशी सगळी आयुधे वापरली, पण पब्लिक काय करेल, हे सांगता येत नाही...!'

मावळमध्ये भगवा फडकला

$
0
0
यंदाची निवडणूक मतदारांनीच हाती घेतली आहे. परिवर्तनाची हाक आणि मोदींना साथ या महायुतीच्या आवाहनाला पाठिंबा व्यक्त करत मावळ लोकसभा मतदारसंघाचा गड शिवसेनेने कायम राखला.

पुण्यात मोदी त्सुनामीची धडक

$
0
0
चौरंगी लढतीमुळे पुण्यातील निवडणूक अटीतटीची आणि चुरशीची होणार असल्याच्या शक्यतांना 'मोदी त्सुनामी' धडकली अन् अखेर एकतर्फी लढतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अनिल शिरोळे यांनी 'दिल्ली' गाठण्याची किमया साधली.

मावळमध्ये पुन्हा भगवा

$
0
0
यंदाची निवडणूक मतदारांनीच हाती घेतली आहे. परिवर्तनाची हाक आणि मोदींना साथ या महायुतीच्या आवाहनाला पाठिंबा व्यक्त करत मावळ लोकसभा मतदारसंघाचा गड शिवसेनेने कायम राखला. येथून श्रीरंग बारणे सुमारे दीड लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आले आहेत.

सुप्रिया जिंकल्या; पण मताधिक्य घटले

$
0
0
बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी अपेक्षेप्रमाणे विजय साकारला. सुळे यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा ६९ हजार ७१९ मतांनी पराभव केला. मात्र, त्यांचे मताधिक्य घटल्याने या विजय राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरी​क्षण करणारा ठरला आहे.

आढळरावांची हॅट्‍‍ट्रि‍‍क

$
0
0
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम यांचा तब्बल तीन लाख एक हजार ७५८ मतांनी धुव्वा उडविला. मोदी लाटेवर स्वार होत विक्रमी मतांनी आढळराव यांनी विजयाची हॅट्‍‍ट्रि‍‍क साधली.

अबब...शिरोळे तीन लाखांनी जिंकले!

$
0
0
देशभरात उसळलेल्या मोदी लाटेवर स्वार होत भाजप-शिवसेना महायुतीचे अनिल शिरोळे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात तब्बल तीन लाखांच्या मताधिक्याने ऐतिहासिक विजय नोंदविला. आतापर्यंत पुण्याच्या खासदाराला मिळालेली सर्वाधिक मते, सर्वाधिक मताधिक्य आणि शहरातील सर्व सहा मतदारसंघांमधून आघाडी घेऊन निर्विवाद विजय मिळविण्याचा विक्रमही शिरोळे यांनी नोंदविला आहे.

गुन्हेगाराला ३१ वर्षांनी अटक

$
0
0
‘कानून के हाथ लंबे होते है,’ असा डायलॉग आपण सिनेमात अनेकदा ऐकतो. त्याची प्रत्यक्ष प्रचिती पुण्यात नुकतीच आली. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि ३१ वर्षांपूर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या कैद्याला पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले.

... तरीही मोदींवर टांगती तलवार

$
0
0
नेत्रदीपक बहुमत मिळवून भाजपचे नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तरीही त्यांची वाट सोप नक्कीच नसेल. काही खटल्यांची टांगती तलवार मोदींच्या डोक्यावर कायम आहे. या पैकी एकाही खटल्यात त्यांच्याविरोधात कोर्टाकडून जरादेखील प्रतिकूल निकाल किंवा एखादी कठोर टिप्पणी केल्यास करण्याचा आदेश दिल्यास मोदींच्या समोर मोठे राजकीय आव्हान उभे राहू शकते.

साधुचा त्रिशुळाने भोसकून खून

$
0
0
आळंदीत वैतागेश्वर मंदिरातील साधुबरोबर झालेल्या वादातून एका वेडसर तरुणाने साधुचा त्रिशुळाने भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी घडला. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या भाजपमध्ये नेतृत्वाची धुरा ‘जेननेक्स्ट’कडे जाणार?

$
0
0
वर्षानुवर्षे विरोधी पक्षात राहिल्यानंतर तब्बल तीन लाखांच्या मताधिक्याने पुणेकरांचा कौल लाभलेल्या शहरातील भारतीय जनता पक्षाला विजयाचे मोठे सलाइन मिळाले आहे. याचा फायदा घेऊन शहर भाजपचा नवा चेहेरा समोर आणण्याचे नियोजन सुरू झाले असून येत्या काही काळातच शहरात नेतृत्वाची नवी पिढी पुढे येईल, असे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images