Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सुलोचना यांना जीवनगौरव पुरस्कार

$
0
0
आपल्या सात्विक अभिनयाने गेली साठ वर्षे चित्रपटप्रेमींच्या मनात घर केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना यंदाचा ‘प्रभात जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

दोन लाखापर्यंत आधार

$
0
0
कुटुंबातील ‘कर्ता’ गेला तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. अशा कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी सरकारतर्फे '' पीडितांना नुकसानभरपाई '' ही योजना सुरु करण्यात आली आहे. पुण्यासाठी शिवाजीनगर कोर्टात या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

विवाहनोंदणीसाठी आता ऑनलाइन अपॉइंटमेंट

$
0
0
तासन् तास रांगेत थांबा..., कागदपत्रांची पूर्तता आहे की नाही तपासा..., साक्षीदारांना ताटकळत ठेवा... पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विवाह नोंदणीसाठी लागणारे हे सोपस्कार लवकरच इतिहासजमा होणार आहेत.

अर्थशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. नाडकर्णी यांचे निधन

$
0
0
अर्थशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. आनंद नाडकर्णी (वय ८९) यांचे नुकतेच ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन विवाहित कन्या असा परिवार आहे. फर्ग्युसन, बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अध्यापन केल्यानंतर गोखले अर्थशास्त्र संस्थेतून सहसंचालक म्हणून ते निवृत्त झाले होते.

पदाधिकाऱ्यांचा यंदाचा परदेश दौराही वादात

$
0
0
जपानमधील ओकायामा येथे गेलेले पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्याबाबतची कोणतीही माहिती अथवा तपशील पालिकेत उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे.

सिगारेटमधून चार हजार घातक रसायने पोटात

$
0
0
सामाजिकदृष्ट्या तंबाखू, गुटखा खाणे प्रतिष्ठेचे मानले जात नसल्याने अठरा वर्षापुढील मेट्रो सिटीमधील युवकांमध्ये आता स्मोकिंगचे प्रमाण वाढू लागले आहे.

ढोलताशा पथकांचे नेटवर्किंग सुरू

$
0
0
गणेशोत्सवाला सुमारे तीन महिने बाकी असतानाच शहरात पाऊस दाखल होण्यापूर्वीच ढोलताशा पथकांनी नेटवर्किंग सुरू केले आहे. फेसबुकवर पेजेस आणि व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून पथकात येऊ इच्छिणाऱ्यांशी ‘नेटवर्किंग’ करण्यात येत असून, तालमीसाठी जागांची पाहणी करण्यात येत आहे.

छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

$
0
0
विधवा सुनेने सासू-सासऱ्यांसह घरातील व्यक्तींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे पेटवून घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार चंदननगर, खराडी येथे घडला. या घटनेत तिची दोन्ही मुले भाजली असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

मानवविरहित रेल्वे गेट होणार बंद

$
0
0
हैदराबाद-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला यवतजवळील खामगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने येत्या वर्षभरात पुणे विभागातील मानवविरहित २१ फाटके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांची पुणे पोलिसांकडून मुस्कटदाबी

$
0
0
सरकारला सहकार्य करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांची पुणे पोलिसांकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला.

सीसीटीव्हीसाठी केबल ‘ओव्हरहेड’ टाका

$
0
0
शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्हीच्या केबलसाठी खोदकामास परवानगी द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले असले, तरी पालिकेने अद्याप त्यासाठी हिरवा कंदील दर्शविलेला नाही.

खड्डे, वाहतूक कोंडींने वैतागले येरवडावासीय

$
0
0
मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे येरवडा परिसरातील नागरी सुविधांची दैना उडाल्याने प्रशासनाने केलेले सर्व दावे फोल ठरले आहे . अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यवर वाहतूक कोंडी झाली होती , रात्री उशिरापर्यंत झाडे बाजूला काढून मशिनने त्यांचे तुकडे करण्याचे काम चालू होते.

कोरी रेशनकार्ड हरविल्यास अधिकारी, कर्मचारी जबाबदार

$
0
0
कोरी रेशनकार्डे गहाळ झाल्यास संबंधित तहसीलदार व अन्नधान्य वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट जबाबदार धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणे जिल्ह्यात कोऱ्या रेशनकार्डांची काळ्याबाजारात विक्री होत असल्याचे आढळून आल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे.

अनधिकृतपणे तिकिट काढणारे एजंट मोकाट

$
0
0
अधिकृत एजंट्सना आरक्षण केंद्रावर तिकीट काढण्यास रेल्वे प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली असली तरी दुसऱ्या बाजूला अनाधिकृतपणे तिकीटे काढणाऱ्या एजंटावर कारवाई करण्याचे धाडस रेल्वेकडून होत नसल्याचे समोर आले आहे.

राज्यातील ४९२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

$
0
0
पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी राज्यातील ४९२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आला असून पुणे शहर आणि इतर पोलिस दलांतील २३ निरीक्षकांच्या समावेश आहे. गुन्हे शाखेतील पाच निरीक्षकांची पुणे शहराबाहेर बदली झाली आहे.

एक्स्प्रेस-वेवर ट्रक जळाला

$
0
0
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर देवले गावच्या हद्दीतील किलोमीटर क्रमांक ६०जवळ मिठाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने ट्रक आगीत जळून खाक झाला आहे.

मालमत्ता विकल्यास ‘पेण अर्बन’चा कारभार पूर्ववत

$
0
0
पेण अर्बन बँकेतील सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांतून कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेल्या १५ मालमत्ता खरेदी केल्याची कबुली देणाऱ्या बँकेच्या संचालकाकडील ही मालमत्ता ताब्यात घेण्याची कार्यवाही सहकार खात्याने सुरू केली आहे.

गायब मतदारांना आजपासून नोंदणीची संधी

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारनोंदणीचे काम आजपासून पुन्हा सुरू होत आहे. शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात ६४ ठिकाणी या मोहिमेत नावे नोंदविणाऱ्या मतदारांना विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे.

‘प्रशिक्षित नर्समुळे ४० टक्के अर्भकांना जीवदान शक्य’

$
0
0
अमेरिका, तसेच आफ्रिकेतील देशांच्या तुलनेत भारतातील अर्भक मृत्यूच्या प्रमाणाची स्थिती चिंताजनक असून, हे प्रमाण कमी करण्यासाठी परिचारिकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास चाळीस टक्के अर्भकांचा मृत्यू टाळणे शक्य आहे.

वानवडीतील हॉस्पिटलसाठीची कोट्यवधींची इमारत धूळ खात

$
0
0
महापालिकेच्या भवन विभागाच्या दुर्लक्षामुळे वानवडी भागात हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेली तब्बल २६ हजार चौरसफूट जागा असलेली इमारत धूळ खात पडली आहे. पालिकेच्या भवन आणि आरोग्य विभागामध्ये नसलेल्या समन्वयामुळे गेले पाच वर्षांपासून ही कोट्यवधी रुपयांची इमारत पडून आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images