Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खूनप्रकरणी ५ जण अटकेत

$
0
0
दारू पिण्यावरून झालेल्या भांडणात एका मध्यमवयीन तरुणाचा पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाचही जणांना अटक केली आहे.

‘माहिती’च्या अध्यादेशाला वाटाण्याच्या अक्षता

$
0
0
माहिती अधिकार कायद्याच्या कलम चारच्या अंमलबजावणीसाठी सरकार केवळ अध्यादेशाच्या माध्यमातून कागदी घोडेच नाचवत आहे. २००५ पासून आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने सुमारे दहा वेळा कलम चारच्या अंमलबजावणीबाबत अध्यादेश काढले आहेत.

पाषाण तलावाला जोड अम्युझमेंट पार्कची

$
0
0
पुण्याच्या पश्चिम भागात भागात क्रीडांगण व्हावे, ही नागरिकांची मागणी आता पूर्ण होणार असून पाषाण परिसरात दहा एकर परिसरात क्रीडांगण, बाग आणि लहान मुलांसाठी अॅम्युझमेंट पार्क विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

OBC विद्यार्थ्यांच्या सायकली कुलूपबंदच

$
0
0
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना निकालाच्या दिवसापर्यंत सायकलसाठी प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पालिकेने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सायकली अद्याप कुलूपबंदच ठेवल्या आहेत.

‘यशवंतराव’ नाट्यगृहात असुविधांचा अंक

$
0
0
ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात असुविधांचा अंक रंगला आहे. नाट्यगृहातील अस्वच्छता, बंद पडलेले एसी, आवारातील घाणीचे साम्राज्य, मनुष्यबळाचा अभाव आदी समस्यांना कलाकारांना तोंड द्यावे लागते.

चोरट्याला पोलिस कोठडी

$
0
0
एकाला शिवीगाळ आणि मारहाण करून त्याच्याकडील ६० हजार रुपये असलेली बॅग हिसकावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला १६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सामाजिकतेची जाणीव हवी

$
0
0
‘मेळघाटात काम करणारे डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांचे कार्य म्हणजे त्याग आणि सेवा याचा संगम आहे. आजच्या तरुण पिढीने जंगलात जाऊनच काम करावे अशी अपेक्षा नाही. मात्र, तरुणांना आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव असायला हवी. कोल्हे दाम्पत्यांचे कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे,’ असे विचार ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांनी बुधवारी व्यक्त केले.

अॅडमिशनचा बहाणा : १ लाखाची फसवणूक

$
0
0
कॅम्प परिसरातील एका इंग्रजी शाळेत ‘एलकेजी’ला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने वानवडी येथील एका पालकाची एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कात्रज येथील एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुरुंगाच्या आवारात फटाके वाजवण्याचा प्रकार भोवला

$
0
0
जेलमधून आपल्या साथीदारांची सुटका झाल्याच्या आनंदात जेलच्या भिंतीबाहेर फटाके वाजवणाऱ्या दोघांना चांगलाच धडा मिळाला आहे. फटाके वाजवताना त्यांना पकडण्यास गेलेल्या जेलरक्षकांशी झटापट केल्याप्रकरणी या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली.

कासेवाडीत वीस गाड्यांची तोडफोड

$
0
0
किरकोळ वादातून दोन गटांत झालेल्या भांडणात एका टोळक्याने हातात तलवारी घेऊन वीस गाड्यांची तोडफोड केली. कासेवाडी परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत वातावरण होते. याप्रकरणी पोलिसांनी दंगल माजविल्याचा गुन्हा दाखल करून सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

मावळचा निकाल दुपारी दोनपर्यंत हाती

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीचा निकाल दुपारी दोनपर्यंत स्पष्ट होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी दिली. ‘मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल येथे होणार आहे.

फेरनिहाय आकडेवारी मिळणार

$
0
0
मतमोजणीच्या वेळी प्रत्येक टेबलवर उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक फेरीतील मतांची छापील आकडेवारी प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्रत्येक मशिनमध्ये किती मते मिळाली, याची आकडेवारी राजकीय पक्षांना जागेवरच उपलब्ध होणार आहे.

‘SRA’साठी ८५ टक्के रहिवाशांची संमती

$
0
0
शिवाजीनगर येथील झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी ८५ टक्के झोपडपट्टीधारकांनी संमती दिली आहे. त्यातील बहुतांश रहिवाशी ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरितही झाले आहेत. काही विशिष्ट मंडळी नियमबाह्य मागण्या करत नाहक अडवणूक करत असल्याचा आरोप विकसक सुशील पाटील यांनी केला आहे.

भूमिगत केबल टाकण्यासाठी प्रतिमीटरला ६ हजार रुपये

$
0
0
शहरातील रस्त्यांवर खोदकाम करून डक्टमध्ये केबल टाकण्यासाठी मोबाइल कंपन्यांसह टेलिफोन कंपन्यांना प्रतिमीटर तब्बल सहा हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या कंपन्यांकडून हे शुल्क वसूल करण्याचा निर्णय नुकताच स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

नदीपात्रातल्या रस्त्याबाबत पालिका आयुक्त आज भूमिका मांडणार

$
0
0
मुठा नदीपात्रात राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर आज, गुरुवारी नवी दिल्लीत सुनावणी होणार आहे. विठ्ठलवाडी ते वारजे रस्त्याचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे.

प्राणिसंग्रहालयाला सल्लागार नेमण्यासाठी फेरटेंडर

$
0
0
महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला देशातील आदर्शवत प्राणिसंग्रहालय करण्यासाठी सल्लागार म्हणून वनक्षेत्रात‌ील प्रख्यात तज्ज्ञ आर. एस. भदोरिया यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने नामंजूर केला.

अचानक आलेल्या पावसामुळे वीज खंडित

$
0
0
अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शहर व उपनगरांमधील अनेक परिसरात सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत महावितरणच्या वतीने दुरूस्तीचे काम सुरू होते.

‘एलबीटी’च्या विरोधात व्यापाऱ्यांचा असहकार

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात असहकार आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातील व्यापाऱ्यांनी घेतला आहे. येत्या दहा दिवसांमध्ये राज्य सरकारने एलबीटी हटवण्यासंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

नवरदेवाकडून कुष्ठरोग्यांना भेट

$
0
0
विवाह समारंभात आप्तस्वकीय, परिचितांसमोर संपत्तीचा बडेजाव करण्याऐेवजी समाजाने दूर केलेल्या कुष्ठरोगी माता-भगिनींना साड्यांचे वाटप करून भोरमधील नवरदेवाने समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.

वानवडीत महिलेचा विनयभंग

$
0
0
मॉलच्या गेटवर हटकल्याचा राग आलेल्या दोन इसमांनी महिला वॉचमनचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी दुपारी वानवडीमध्ये घडली. या प्रकरणी संबंधित महिलेने कोंढवा पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबावरून विकास भल्ला आणि वरुण मल्होत्रा या दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images