Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महायुतीला २४ ते ३० जागा?

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महायुतीला मिळतील, असा अंदाज निवडणूक विश्लेषक डोबा एजन्सी रुरल कम्युनिकेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. महायुतीला २४ ते ३० जागा, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १३ ते १९ जागा मिळण्याचा अंदाज संस्थेने वर्तविला आहे.

'फुलराणी' धावणार कात्रजमध्ये

$
0
0
लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली पेशवे उद्यानाती‌ल फुलराणी मिनी ट्रेन आता कात्रजमध्येही धावणार आहे. कात्रज परिसरातील आजी-आजोबा उद्यानातील पाचशे मीटरच्या ट्रॅकवर धावणार असलेल्या ‘फुलराणी’चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ‘फुलराणी’साठी आवश्यक असलेले स्टेशन उभारण्यासाठी स्थायी समितीने नुकतीच ५३ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली असून, हे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे.

अर्ध्या तासाच्या पावसाने दैना

$
0
0
अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या पुणेकरांना बुधवारी सायंकाळी मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने दिलासा मिळाला असला, तरी अर्धाच तास झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडून ‌वीजपुरवठा खंडित झाला.

बोनी कपूर यांच्या कारला अपघात

$
0
0
बॉलीवूडचे प्रसिद्ध सिनेनिर्माते बोनी कपूर कार अपघातात थोडक्यात बचावले.

मूळ आदेशाचे काय?

$
0
0
सदनिकेचा ताबा द्यावा किंवा कन्व्हेयन्स करून द्यावे, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कलम २७ अन्वये अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, बिल्डरला ​शिक्षा झाल्यावर आमच्या मूळ आदेशाचे काय, अशा प्रकारचे बरेच प्रश्न ‘ग्राहक देवो भव’ या सदराच्या विविध वाचकांकडून ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे सतत येत आहेत.

पालिकेच्या तिजोरीत मिळकतकराचे दोनशे कोटी

$
0
0
शहरातील तब्बल अडीच लाख मिळकतकरधारकांनी पालिकेच्या सवलतीचा लाभ उठवत दोनशे कोटी रुपयांचा मिळकतकर पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे. सवलतीत कर भरण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत असून, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मिळकतकर स्वीकारण्यात येणार आहे.

कलावंतही घुमवणार ढोल-ताशा

$
0
0
गणेशोत्सवातील कार्यक्रमांना सेलिब्रिटी म्हणून हजेरी लावणारे मराठी कलावंत आता ढोल-ताशा घुमवणार आहेत. पुण्यातील कलाकारांनी एकत्र येऊन ‘कलावंत ढोल-ताशा पथका’ची स्थापना केली असून, येत्या गणेशोत्सवात ही मंडळी ढोल-ताशा बांधून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

हॉस्पिटलच्या सुशोभिकरणावर उधळपट्टी

$
0
0
महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये शहरातील गोरगरीब नागरिकांना चांगली आरोग्य सेवा रास्त‌ दराने उपलब्ध करून देण्याची गरज असताना शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काच्या औषधोपचारांसाठी दारोदार फिरण्याची वेळ आली आहे.

‘यशवंतराव’चे कलादालन सजणार

$
0
0
बालगंधर्व रंगमंदिर कलादालनाच्या धर्तीवरच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील कलादालनाचे रुपडे लवकरच पालटणार आहे. कलादालनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, जुलैअखेरीपर्यंत सुसज्ज कलादालन कलाकारांना उपलब्ध होणार आहे.

बारामतीचा निकाल सर्वांत आधी

$
0
0
बारामती लोकसभा मतदारसंघात केवळ नऊ उमेदवार असल्याने राज्यात बारामतीचा ​निकाल सर्वांत अगोदर म्हणजे दुपारी बारा वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, मोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन दुपारी चारपर्यंत अधिकृतपणे निकाल जाहीर होऊ शकेल, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुळे मताधिक्य राखणार का?

$
0
0
बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी प्रचारात आणलेली ‘जान’ आणि आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार माजी सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांच्या ‘आरोपांच्या फैरी’ यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे मताधिक्य राखणार का, हीच बारामतीतील निकालातील औत्सुक्याची बाब आहे.

MBAच्या पेपरफुटीमागे दडलंय काय?

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या एमबीए परीक्षांसाठीच्या पेपर सेटरच्या पॅनलमध्ये परीक्षेपूर्वी अचानक काही बदल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अनअनुभवी प्राध्यापकांनाही पेपर सेटिंगसाठी नेमण्यात आल्याने ‘व्हॉट्स अॅप’वरील पेपरफुटी हे केवळ एक उदाहरण असून, त्यापाठीमागे अनेक भानगडी दडल्या असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

कोरेगाव पार्कमध्ये वाहतुकीत बदल

$
0
0
पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी कोरेगाव पार्क भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मतमोजणीमुळे वाहनचालकांची गैसोय होऊ नये यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरेगाव पार्कला छावणीचे स्वरूप

$
0
0
पुणे लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी मतमोजणीच्या वेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला आहे. पोलिस आयुक्त सतीश माथुर यांनी गुरुवारी सायंकाळी कोरेगाव पार्कमधील मतमोजणी केंद्राची पाहणी करून बंदोबस्ताचा आढावा घेतला.

वाढलेले मतदान ठरवणार कारभारी

$
0
0
तब्बल अडीच लाखांनी वाढलेले मतदान..., देशभरातील वातावरण..., तरुणाईची मते..., प्रचारयंत्रणा...आणि स्वपक्ष-मित्रपक्षांचा सहभाग... गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ पुण्यात रंगलेल्या मतसंग्रामाचा विजय अशा विविध घटकांमधून आकार घेणार आहे.

अंदाज ‘अपना अपना’

$
0
0
निवडणुकीचा निकाल हाती येण्यास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना शहरातील सर्वच उमेदवारांनी आपलाच विजय होईल, असा दावा केला आहे. आपापल्या विजयासाठी त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने गणितेही मांडली आहेत.

सोशल मीडियातही ‘अब की बार...’

$
0
0
केंद्रात कोणाची सत्ता येणार, याचे अंदाज वृत्तपत्रे, टीव्ही अशा विविध माध्यमांतून घेतले जात असतानाच सोशल मीडियानेही ‘एनडीए’च्या बाजूने कौल दर्शवला आहे. नेटिझन्सच्या संदेशांमध्ये ‘मोदी इफेक्ट’चा बोलबाला अधिक असल्याचे दिसून येत आहे.

पुण्याचा खासदार कोण?

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर निकालासाठीची बरोब्बर ३० दिवसांची प्रतीक्षा अखेर उद्या, शुक्रवारी संपणार असून, पुण्याच्या सुभेदारीवर हक्क कोणाचा, या फैसल्यावर दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचा घरचा आहेर

$
0
0
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही पक्षाचे महापालिकेतील नेते ठाम भूमिका घेत नसल्याने शहरातील अनेक प्रकल्प रखडल्याची टीका पक्षाच्या शहराध्यक्षांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली.

अॅम्युनिशन फॅक्टरी रडावर

$
0
0
इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) दहशतवादी असदुल्लाह अख्तर याने खडकी येथील अॅम्युनिशन फॅक्टरी आणि परिसराची रेकी केल्याची माहिती यंत्रणांच्या तपासादरम्यान उघड झाली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images