Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुला-मुठेतील प्रदूषण झाले कमी

$
0
0
सीओईपी इंजिनीअरिंग कॉलेज बोट क्लबतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘जलमैत्री’ या उपक्रमाअंतर्गत मुळा-मुठा नदीतील प्रदूषणाचा गेली आठ वर्षे अभ्यास करण्यात येत आहे.

उच्चस्तरीय समितीकडून रेल्वे अपघाताची चौकशी

$
0
0
दोन आठवड्यापूर्वी उरळी ते यवत मार्गावरील खामगाव रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या सिकंदराबाद- मुंबई दुरान्तो एक्स्प्रेसच्या अपघाताची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

‘एनडीए’चे आवार होणार बंदिस्त

$
0
0
संरक्षण दलाच्या तिन्ही शाखांचे एकत्रित प्रशिक्षण देणाऱ्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे संपूर्ण आवार आता बंदिस्त होणार आहे.

इंजिनीअरिंगच्या ‘ऑनलाइन’वर विद्या परिषदेत चर्चा

$
0
0
इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीविषयी पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या येत्या ३ जूनला होणाऱ्या बैठकीमध्ये व्यापक चर्चा होण्याचे संकेत विद्यापीठाच्या पातळीवरून दिले जात आहेत.

सिंहगड रोडवर तलवारीने वार करून तरुणाचा खून

$
0
0
सिंहगड रोडवर सिद्धार्थ कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पिंपळाच्या झाडाखाली गप्पा मारत बसलेल्या दोघा मित्रांवर पाच आरोपींनी तलवार व कोयत्याने वार केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला.

मायेच्या गोधड्या सातासमुद्रापार

$
0
0
पिढ्यान्‍‍पिढ्या चालत आलेला वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘इन्टॅक’ने या गोधड्यांना आधुनिक टच दिला असून, ‘एलिट क्लास’मध्ये सध्या डिझायनर महाराष्ट्रीयन गोधड्यांना चांगली मागणी आली आहे.

पुणे कँटोन्मेंट-‘एएफएमसी’ यांच्यात करार

$
0
0
पूर्व भागातील नागरिकांना उत्तम रुग्णसेवा मिळण्यासाठी पुणे कँटोन्मेंट बोर्ड आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेज (एएफएमसी) यांच्यात सामंजस्य करार केला जाणार आहे.

लहान बाळाला मारणारी आया ‘CCTV'त कैद

$
0
0
‘बीपीओ’ कर्मचारी असलेल्या दाम्पत्याच्या मुलाला सांभाळणाऱ्या ‘मेडसर्व्हंट’ने त्यांच्या चौदा महिन्याच्या तान्हुल्या मुलाला मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला आहे.

डिजिटल मायक्रोस्कोपवर ‘पुणेरी ठसा’

$
0
0
कॅन्सरसारख्या दुर्धर व्याधीचे नेमके निदान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा सूक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप) विकसित करण्यात पुण्यातील कंपनीला यश आले आहे.

आज सावलीही साथ सोडणार

$
0
0
‘सावली कधीही आपली साथ सोडत नाही,’ असे सांगितले जात असले, तरी आज (बुधवार) दुपारी तुमची सावली तुमची साथ सोडणार आहे.

पुण्याच्या निकालाला ४ वाजणार

$
0
0
उमेदवारांची मोठी संख्या आणि विविध कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी निवडणूक आयोगाने लागू केलेली बंधने यामुळे पुण्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती येण्यास सायंकाळी चार वाजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

२६ मेपासून पुन्हा मतदारनोंदणी

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीत गायब मतदारांच्या उद्रेकानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या २६ मेपासून पुन्हा मतदारनोंदणी सुरू होणार आहे.

मते न दिल्याने पाणी तोडले

$
0
0
‘निवडणुकीत मते न दिल्यामुळे शिरूरमधील काही गावांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे,’ असा आरोप करीत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी मंगळवारी प्रशासनाला धारेवर धरले.

पुणे पुन्हा सायकलींचे शहर

$
0
0
रोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या विविध तक्रारी भेडसावत असताना फिटनेससाठी व्यायामाला प्राधान्य देणारा वर्ग आता जीम, जॉगिंग, योगासने याबरोबरच सायकलिंगकडेही वळत आहे.

मान्सूनचे शुभवर्तमान...

$
0
0
यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याचा आणि सरासरीपेक्षा कमी पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनची चाहूल आता लागू लागली आहे. यंदाचा मान्सून निर्धारित वेळेच्या तीन दिवस आधीच म्हणजेच १७ मे रोजीच देशात हजेरी लावण्याची शक्यता आहे.

तरुणांना जाणीव हवीः आमटे

$
0
0
आजच्या तरुण पिढीने जंगलात जाऊनच काम करावे अशी अपेक्षा नाही. मात्र, तरुणांना आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव असायला हवी, असे विचार समाजसेवक प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

अभिनेता प्रियदर्शन जाधव यांना पुरस्कार

$
0
0
रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणच्या वतीने दिला जाणारा 'व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार' यंदा रंगकर्मी प्रियदर्शन जाधव यांना जाहीर झाला आहे. मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे

‘धवलबुक’ करतेय कर्तृत्ववानांच्या नोंदी

$
0
0
विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींच्या वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांच्या कात्रणांच्या नोंदी ठेवण्याचे काम सोलापूर येथील ‘धवलबुक वर्ल्ड रेकॉर्ड’ या नोंदणीकृत संस्थेकडून करण्यात येत असून, या संस्थेने आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक नोंद असलेली कात्रणे जपून ठेवली आहेत, अशी माहिती सोलापूर येथील धनंजय शिंदे आणि गणेश देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठी प्रकाशनविश्वात ‘प्रिंट ऑन डिमांड’चा ट्रेंड

$
0
0
पुस्तकांच्या हजारांच्या आवृत्ती काढण्याचा पायंडा आता मागे पडण्याच्या मार्गावर आहे. बाजारपेठेतील ‘मागणी तसा पुरवठा’ या सूत्राने मराठी पुस्तक प्रकाशनविश्वातही प्रवेश केला असून, आता शंभर पुस्तकांच्या आवृत्तीचा नवीन ट्रेंड रूजत आहे. त्यामुळे ‘आउट ऑफ स्टॉक’ पुस्तकांना वरदान मिळू शकणार आहे.

‘डेटा एंट्री’मुळे याद्यांमध्ये चुका

$
0
0
मतदारयाद्यांमधील चुका टाळण्यासाठी त्याच्या डेटा एंट्रीचे काम जिल्हा पातळीवर करू द्यावे, अशी मागणी पुणे व मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. डेटा एंट्रीच्या कामाचे केंद्रीकरण झाल्यामुळेच याद्यांमध्ये असंख्य चुका राहिल्याचे निवडणूक यंत्रणांना आढळले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images