Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

युवती खून प्रकरणी दोघे ताब्यात

$
0
0
तळेगाव रेल्वे स्टेशन येथे प्रवासी बॅगेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेह प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दोघा संशयितांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित ताब्यात आले असले तरी तरुणीचा ओळख पटवण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

पं. संगमेश्वर गुरव यांचे निधन

$
0
0
किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. संगमेश्वर गुरव (वय ८२) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने धारवाड येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.

लोणावळ्यात विजेचे खांब जमीनदोस्त

$
0
0
लोणावळा आणि खंडाळा परिसरात झालेल्या तुफानी पावसामुळे वीजपुरवठ्याचे ३७ खांब जमिनदोस्त झाले आणि अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. ‘महावितरण’चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत केला.

अडीचशे कोटींच्या वीजचोऱ्या उघड

$
0
0
गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध भागांमध्ये तब्बल २४३ कोटी रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. या आर्थिक वर्षात राज्यात उघडकीस आलेल्या वीजचोरीच्या सव्वाआठ हजार प्रकरणांमधून दीडशे कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

‘भामा आसखेड’ला अखेर गती

$
0
0
भामा आसखेड धरणातील सुमारे अडीच टीएमसी पाणी पुणे शहराला देण्याच्या योजनेला अखेर गती मिळाली असून, या योजनेअंतर्गत चाकणजवळील कुरुळी येथे उभारण्यात येणाऱ्या दोनशे एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धिकरण प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

हवा बिघडली...

$
0
0
‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, हरित पुणे’ असे ब्रीद रंगविले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र पुण्यातील पर्यावरणाची स्थिती झपाट्याने खालावत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि उद्योगांकडून धुडकावले जाणारे पर्यावरणविषयक निकष, यामुळे प्रदूषण धोकादायक परिस्थितीकडे ‘आगेकूच’ करीत आहे.

तीन विद्यार्थ्यांना मारहाण

$
0
0
पार्किंगचे पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून पार्किंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याने ससून हॉस्पिटलच्या नर्सिंग शाखेच्या तृतीय वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांसह नातेवाइकालाही लोखंडी सळईने मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. त्यातील एक विद्यार्थी गंभीर जखमी आहे.

दुचाकी चोराला अटक

$
0
0
रात्री-अपरात्री घरी परतण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या ‘डीजे’ला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाने अटक केली. बुलेट, पल्सर यांसारख्या ११ दुचाकी या चोरट्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

अनिर्बंध उपसा पडणार महागात

$
0
0
जमिनीतून बेकायदा भूजल उपसा करून त्याचा व्यापारी उपयोग करणाऱ्यांवर कडक निर्बंधांची अंमलबजावणी करावी, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नुकतेच दिले आहेत.

हॉस्पिटल स्वच्छतेकडे दुर्लक्ष?

$
0
0
महापालिकेच्या मालकीची शहरातील तीन हॉस्पिटल खासगी डॉक्टरांना चालवण्यासाठी दिल्यानंतरही समाधान न झालेल्या महापालिका प्रशासनाने पालिकेच्या मालकीची खराडी आणि दापोडी येथील आणख‌ी दोन हॉस्पिटल खासगीकरणाद्वारे चालवण्यास देण्याचा घाट घातला आहे.

डीपी रस्त्यांसाठी हात आखडता

$
0
0
खोदाईमुळे झालेली शहरातील रस्त्यांची दुरवस्था सुधारण्यासाठी पालिकेतर्फे सुमारे ५० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली जात असताना, त्यापेक्षा तिप्पट निधी गल्लीबोळांच्या सुशोभीकरणावर खर्च करण्याचा नगरसेवकांचा इरादा आहे.

मातृत्वाच्या हुंकाराला वेबचे क्लिक

$
0
0
जागतिक मातृदिन येत्या रविवारी साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मातृत्वाच्या ट्रेंडचा वेध घेणारी ही मालिका… मातृत्वाची चाहूल लागल्यानंतर बाळाचा पहिला ‘टॅ-हॅ’ अनुभविण्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘न्यूक्लिअर फॅमिली’तील भावी मातेच्या हुंकाराला वेबसाइट्सचे क्लिक मायेचा आधार देत आहे.

एसटी स्टँडवर प्लॅटफॉर्म तिकीट!

$
0
0
एसटी स्टँडवरील बजबजपुरी रोखण्यासाठी रेल्वेच्या धर्तीवर पुण्यातील एसटी स्टँडवर प्लॅटफॉर्म तिकीट योजना राबवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. पुण्यातील तिन्ही स्टँडवर ही योजना राबवण्याचे नियोजन असून, प्लॅटफॉर्म तिकिटासाठी दोन रुपये आकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

डेक्कनचा ‘मोदी’ पुण्यात तेजतर्रार

$
0
0
डेक्कन जिमखाना क्लबचा साजन मोदी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुण्यात आयोजित केलेल्या ‘सुपर पेसर’ मोहिमेचा हिरो ठरला. त्याने ताशी १३० किलोमीटर वेगाने चेंडू टाकला.

तळेगावातील बॅगेचं गुढ उकललं

$
0
0
तळेगाव रेल्वे स्टेशनवर बुधवारी एका बेवारास बॅगेत सापडलेल्या तरुणीची ओळख पटली असून तिची हत्या नायजेरियन नागरिकांनी केली, असा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एसटीचे आंदोलन

$
0
0
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे चार जून रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलने करण्यात येणार आहेत.

पुण्यहिरकणी महोत्सव

$
0
0
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘फँड्री’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने पुण्यहिरकणी महोत्सव शुक्रवारी सुरू झाला. अनाथ हिंदू महिलाश्रमातील विद्यार्थिनींच्या हस्ते फुगे सोडण्यात आले. चित्रपट पाहण्यासाठी पुणेकर चित्रपटप्रेमींनी गर्दी केली होती.

मसापची ‘पत्रिका’

$
0
0
महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्यिक चर्चांऐवजी पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगतो आहे. परिषदेचे मुखपत्र साहित्य पत्रिकेतील एका लेखातील चुकीमुळे पत्रिकेच्या संपादकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या संपादकांनी परिषदेचे एकूण आर्थिक कामकाजच बेकायदा असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

बहाई नेत्यांच्या सुटकेची मागणी

$
0
0
गेल्या सहा वर्षांपूर्वी इराणमध्ये शिक्षा भोगणाऱ्या सात बहाई नेत्यांची सुटका करण्याची मागणी बहाई समाजाने केली आहे. या प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला असून या बहाई नेत्यांची सुटका करण्यासाठी भारताने प्रयत्न करावेत, असे त्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले असल्याचे ज्योती मेहता यांनी सांगितले.

बाल दीर्घांक

$
0
0
भिक्षुक ब्राह्मणाला मिळालेली सोन्याची वाटी... त्या वाटीमुळे त्या बदललेले आयुष्य... शेजाऱ्याला त्या वाटीचा वाटलेला हव्यास... आपल्यालाही ती वाटी मिळावी म्हणून त्याने धडपड केल्याने त्याची झालेली फजितीचे नाट्य ‘सोन्याची वाटी’ या कृष्णदेव मुळगुंद लिखित नाटिकेतून उलगडले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images