Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वासंतिक संगीत नाट्य महोत्सव

0
0
भरत नाट्य मंदिर, पुणे निर्मित ‘वासंतिक संगीत नाट्य महोत्सव’ सध्या संस्थेच्या सभागृहात सुरू आहे.

आवाज ‘सक्षम’ हवा

0
0
महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होते आहे. मात्र, पुराव्यांअभावी आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. याविरोधात लढण्यासाठी सक्षम महिला स्वयंसेवकांची पथके स्थापन करण्यात येणार आहेत

कुटुंब जोडणारे समुपदेशन केंद्र

0
0
अनेक पिढ्या चालत आलेली कुटुंबव्यवस्था टिकून राहावी, कुटुंबातील नातेसंबंध दृढ व्हावेत आणि व्यक्तींमधील संवाद वाढावा यासाठी ‘कर्वे समाजसेवा संस्थे’चे कौटुंबिक सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत आहे.

प्रयोगातून शिका दहावीचे विज्ञान

0
0
‘प्रत्यक्ष प्रयोगातून १० वीचे विज्ञान शिका’ ही दहावीमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांसाठीची कार्यशाळा मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केली आहे. १० व ११ मे रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत नळस्टॉपजवळील ‘लोकायत’ येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त...

लग्नातील खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत

0
0
लग्नासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून गणेश आणि गौरी हरपळे या नवविवाहित जोडप्याने ५१ हजार रुपयाचा निधी दुष्काळग्रस्तांना दिला.

निगडीत तरुणाचा मृतदेह

0
0
निगडीतील पीसीएमसी कॉलनीजवळील एका इमारतीमध्ये शुक्रवारी (९ मे) एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर जखमांच्या खुणा आढळून आल्याने तरुणाच्या खून झाल्याचे वर्तवण्यात येत आहे.

‘नोडल ऑफिसर’ सोडविणार पेन्शनरांच्या तक्रारी

0
0
पेन्शनरांकडून येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याने, त्या सोडविण्यासाठी एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशन (इपीएफओ) ​विभागाच्या प्रत्येक कार्यालयांमध्ये ‘नोडल ऑफिसर’ नेमण्याचा आदेश या विभागाच्या मुख्यालयाकडून देण्यात आला आहे.

पुणे कँटोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती सुधारली

0
0
आर्थिक डबघाईला आलेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती सुधारली असून, मोडीत काढलेल्या २५ कोटी रुपयांच्या ठेवी पुन्हा जमा झाल्या आहेत. त्यामुळे बोर्डाच्या हद्दीत आगामी काळात विकासकामे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस

0
0
पिंपरी- चिंचवड शहरामध्ये शुक्रवारी (९ मे) दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना पावसामुळे काही काळ दिलासा मिळाला. पिंपळेगुरव, सांगवी, दापोडी भागामध्ये गारांचा पाऊस झाला.

उदागे खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाई व्हावी

0
0
मोशी येथील माणिक उदागे खूनप्रकरणी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत कामचुकार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शुक्रवारी आंदोलनात करण्यात आली.

भोरला नळजोडीसाठी अनुदान मिळणार

0
0
पुणे जिल्ह्यात दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्धाच्या विकासाकरिता महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या खासगी नळजोडणीसाठी व वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने २ कोटी ३८ लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान पंचायत समितीमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे.

नीरा देवघरमध्ये ३२; तर भाटघर धरणात १२ टक्के पाणीसाठा

0
0
शेतीसाठी पूर्व भागातील तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे आणि कडक उन्हामुळे भाटघर व नीरा देवघर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. सध्या भाटघरमध्ये १२ तर निरा देवघरमध्ये ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

खेडमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न

0
0
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाडा येथे गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न केला. बँकेत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी प्रथम सीसीटीव्ही आणि सायरनच्या वायरी तोडून टाकल्या. सुदैवाने बँकेतील पैसे असलेल्या ठिकाणी चोरट्यांना पोहचता न आल्याने सर्व पैसे सुरक्षित राहिले.

पावणेचार लाखांचा गांजा जप्त

0
0
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शहरात विक्रीसाठी आणलेला २० किलो गांजा जप्त केला असून, एका आरोपीला अटक केली आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत पावणेचार लाख रुपयांचा ४५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

विवाहितेची आत्महत्या

0
0
शेतातील कामे करता येत नाहीत तसेच बंगला बांधण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणावेत यासाठी होत असलेल्या मारहाणीला कंटाळून विवाहितेने चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात उडी मारून आत्महत्या केली.

प्लॅटफॉर्म तिकीट योजना

0
0
पुण्यातील बसस्थानकावर राबवण्यात येणारी प्लॅटफॉर्म तिकीट योजना यशस्वी करण्यासाठी बसस्थानकाच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्याचे एसटी प्रशासनाने निश्चित केले आहे.

वांजळेंच्या जातपडताळणीबाबत येत्या सोमवारी सुनावणी

0
0
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शुक्राचार्य वांजळे यांच्या जातपडताळणीसंदर्भात येत्या १२ मे रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, आपले जात पडताळणी प्रमाणपत्र कोर्टाने रद्द ठरविले असले, तरी सदस्यत्वापासून अपात्र ठरविले नसल्याचे स्पष्टीकरण वांजळे यांनी दिले आहे.

पुणे-नाशिक रस्त्याचे चौपदरीकरण

0
0
पुणे-नाशिक रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास गती देण्यात आली असून खेड ते सिन्नर या टप्प्यातील २६ गावांतील जागांच्या संपादनाचे प्रस्ताव भूसंपादन कार्यालयाकडे आले आहेत. या टप्प्यात खेड, आंबेगाव व जुन्नर या तीन तालुक्यातील सुमारे २७ लाख चौरस मीटर जागा संपादित करण्याचे नियोजन आहे.

प्रदक्षिणा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश

0
0
श्री क्षेत्र आळंदी येथे आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांना चालताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रदक्षिणा मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे विशेष बाब म्हणून प्राधान्याने ३१ मे पूर्वी बुजविण्याचे आदेश खेडचे प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे यांनी आळंदी नगरपालिकेला दिले आहेत.

‘मॅजेस्टिक सिटी’ला ‘लँडस्केपिंग’ पुरस्कार

0
0
आशिया खंडात आर्किटेक्ट क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या ‘आर्टिस्ट इन काँक्रिट अॅवॉर्ड’ संस्थेतर्फे वाघोलीतील ‘मॅजेस्टिक सिटी’ प्रकल्पाला ‘बेस्ट लँडस्केपिंग’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images