Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

फसवणुकीप्रकरणी एकाला अटक

$
0
0
कोथरूड येथील सर्व्हे नं. ८६/३, संगम चौक येथील जागेचा टीडीआर विक्रीसाठी असल्याचे भासवून रिअल इस्टेट व्यावसायिकाची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, नऊ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

युवकावर खुनी हल्लाप्रकरणी कोथरूडमध्ये चौघांना अटक

$
0
0
मित्राच्या भावाला पैशाच्या कारणावरून त्रास देऊ नकोस, असे समजावण्यास गेलेल्या युवकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

घरफोडीबद्दल तिघांना एक वर्ष सक्तमजुरी

$
0
0
शिवाजीनगर गावठाण येथील एक फ्लॅट फोडून ८० हजार रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी कोर्टाने तिघांना एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी. जी. मोडक यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

ऑनलाइन भाडेकरार सुविधेस अल्प प्रतिसाद

$
0
0
फ्लॅट किंवा दुकानाचे भाडेकरार ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याच्या सुविधेला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याचे आढळून आले आहे. दरमहा हजारो भाडेकरार करण्यात येत असताना दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांत फक्त अडीचशे भाडेकरारांची ऑनलाइन नोंदणी झाल्याचे समोर आले आहे.

अनैतिक संबंधांतून पतीचा खून

$
0
0
अनैतिक संबंधांतून प्रियकराच्या मदतीने त्याच्या साथीदारांकडून पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. दत्तवाडी पोलिसांनी ​तिला अटक केली असून, कोर्टात हजर करण्यात आले असता, दहा मेपर्यंत तिला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. निमसे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

अकरा मजली इमारतींसाठी १५९ कोटींचा प्रस्ताव

$
0
0
अकरा मजली इमारतीतील प्रस्तावित अद्ययावत ऑपरेशन थिएटर, सर्जिकल अतिदक्षता विभाग (आयसीयू),कान-नाक-घसा, नेत्रचिकित्सा, अस्थिरोग आणि बालरोग विभागांना लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह अन्य पायाभूत सुविधांसाठी आणखी १५९ कोटी रुपयांचा प्रस्ताव ससून हॉस्पिटल प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

‘कचरा गोळा करणाऱ्यांनाही मिळाव्यात आरोग्य योजना’

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तींना तसेच बायोगॅस प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांना महापालिकेच्या विविध आरोग्य योजनांचा फायदा देण्यात यावा, असा ठराव महापालिकेचे सभागृह नेते सुभाष जगताप आणि दत्तात्रय धनकवडे यांनी स्थायी समितीकडे मंजुरीसाठी ठेवला आहे.

‘बालचित्रवाणी’ने घेतला पुढाकार

$
0
0
शालेय अभ्यासक्रमातील घटक अधिक आकर्षक माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता ‘बालचित्रवाणी’ने पुढाकार घेतला आहे. यंदा पहिल्यांदाच संस्थेने पहिली आणि दुसरीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या सीडी बाजारात उपलब्ध करून दिल्या आहेत.

उड्डाणपुलाचे संथ काम

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट वसाहतीजवळ उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाच्या कामाची मुदत उलटूनही निम्मेही काम झाले नाही. त्यामुळे खर्चात भरमसाठ वाढ होत असून, नागरिकांनाही त्रास होत आहे.

‘पेन्शन’मध्ये टेन्शन

$
0
0
एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशन (ईपीएफओ) विभाग आणि पुणे कँटोन्मेंट बोर्ड यांच्यातील वादाचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. ‘ईपीएफओ’ विभागाने भाडे थकविल्यामुळे बोर्डाने​ लिफ्ट सेवा बंद केली असल्याने, पेन्शनबाबत चौकशीसाठी येणाऱ्या ज्येष्ठ ना​गरिकांनाही इमारतीचे मजले चढावे लागत आहेत.

ट्रॅव्हल कंपनीला धडा शिकवला

$
0
0
ग्राहक राजा आहे, मात्र त्याने चिकाटी व धैर्याने लढा दिला पाहिजे आणि स्वतःचे राजेपण टिकवून ठेवले पाहिजे.

मॉलमधील खरेदीत हवी सावधानता

$
0
0
भरपूर व्हरायटी, हवी ती वस्तू निवडण्याचे स्वातंत्र्य आणि आकर्षक सवलती यामुळे मॉलमध्येच खरेदी करण्याचा ट्रेंड अलीकडे वाढीस लागला आहे. मॉलमधील खरेदी सोयीची असली, तरीही डोळे उघडे ठेवून सजगपणे ही खरेदी करायला हवी. कारण छोट्या छोट्या गोष्टींत आपली फसवणूक होऊ शकते. त्याविषयी...

‘महारोजगार’मुळे घरबसल्या नोकरीच्या संधींवर क्लिक

$
0
0
शिक्षण झाले आहे, नोकरीच्या शोधात आहात. मग, तुम्हाला कोठेही खेटे घालण्याची किंवा पैसे भरून प्लेसमेंट एजन्सीचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. तुम्ही आठवी पास असा किंवा इंजिनीअर, एमबीए. राज्य सरकारची ‘महारोजगार’ वेबसाइट तुम्हाला घरबसल्या नोकरी मिळवून देऊ शकते.

‘एआरएआय’मध्ये २४ मे रोजी ‘ओपन डे’चे आयोजन

$
0
0
हनुमान टेकडीजवळ असणाऱ्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) मध्ये कोणत्या प्रकारचे संशोधन होते, इथे कोणते काम चालते, याची नागरिकांना माहिती व्हावी, म्हणून संस्थेने दर महिन्याला ‘ओपन डे’ चे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे.

भारतीय संगीत शिका केवळ पन्नास रुपयांत

$
0
0
संगीत शिक्षणसाठी खासगी क्लासेसमध्ये हजारो रुपये प्रवेश शुल्क आकारले जात असताना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने दरमहा केवळ पन्नास रुपयांमध्ये गायन, वादन आणि नृत्य शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. संगीत शिकू इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनाही सुरू करण्यात येत आहेत.

अपंग विद्यार्थ्यांची गैरसोय पडणार महागात

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या विविध इमारतींमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रकरण विद्यापीठाला चांगलेच महागात पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विद्यापीठाच्याच रिफेक्टरीत तळमजल्यावर डबे खाण्यास मज्जाव करण्यात आलेल्या अपंग विद्यार्थ्यांनी अशा सर्व गैरप्रकारांविरोधात आवाज उठवला असून, अपंग कल्याण संचालनालयामार्फत कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

परीक्षा ‘७०-३०’ पॅटर्ननुसारच

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या पुढे ‘७०- ३०’ पॅटर्ननुसार अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय इंजिनीअरिंग विद्याशाखेने घेतला आहे. या परीक्षांसाठी पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीनेच परीक्षा सुरू ठेवण्यात येणार असून, येत्या ३ जानेवारीला विद्यापीठाच्या अॅकेडमिक कौन्सिलमध्ये इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन परीक्षांसह या पॅटर्नबाबतही अंतिम धोरण ठरविण्यात येणार आहे.

एमएच-सीईटी राज्यात सुरळीत

$
0
0
पुण्यातून १४ हजार १४५ विद्यार्थ्यांनी गुरुवारी एमएच-सीईटी दिली. मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी झालेल्या या परीक्षेला राज्यभरातून १ लाख ५३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

औषधविक्रेत्यांना फटका

$
0
0
औषध विक्रीचा परवाना, फार्मसिस्ट बदल, दुकानाच्या जागेत वाढ यासारख्या विविध कारणांसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) कराव्या लागणाऱ्या अर्जाच्या ‘ऑनलाइन’ सुविधेतच आता त्रुटी आढळून आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना दाखले तातडीने द्या

$
0
0
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले रहिवास, जात व उत्पन्नाचे दाखले तातडीने देण्यासाठी मेळावे घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images