Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्राण‌िसंग्रहालयाला नवे सल्लागार

$
0
0
पुणे महापालिकेचे कात्रज येथील राजीव गांधी प्राण‌िसंग्रहालय (कात्रज सर्पोद्यान) देशातील आदर्शवत प्राण‌िसंग्रहालय व्हावे, यासाठी सल्लागार म्हणून वनक्षेत्रातील प्रख्यात तज्ज्ञ आर. एस. भदोरिया यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव महापालिकेने स्थायी समितीसमोर मांडला आहे.

... तर लायसेन्स रद्द करा

$
0
0
आंबे पिकविण्यासाठी कार्बाइडसारख्या घातक रसायनांचा वापर केल्याचे सिद्ध झाल्यास गुलटेकडी मार्केट यार्डातील संबंधित व्यापाऱ्यांची लायसेन्स रद्द करण्याचे आदेश कृषि व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी दिले.

…आणि मी सुन्न झालो

$
0
0
हैदराबाद-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस यवतजवळील खामगाव येथे रेल्वे क्रॉसिंग करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकल्याने शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातातून प्रकाश बाळासाहेब बर्डे हा पंधरा वर्षांचा मुलगा बालंबाल बचावला आहे. मात्र भीषण अपघात डोळ्यांसमोर पाहिल्याने तो सुन्न झाला आहे.

प्रवेशाचे ‘इंजिनीअरिंग’ जुलैत

$
0
0
‘जेईई-मेन’चा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लागला असला आणि बारावीचा निकाल या महिन्याच्या अखेरीस अपेक्षित असला, तरी यंदा इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त मात्र जुलैमध्येच उजाडणार, अशी चिन्हे आहेत. इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया अनेक ‘जर-तर’ना सामोरी जाणार असल्याने यंदा ही वेळ ओढवली आहे.

सुपर बायकिंगची धूम जोरात

$
0
0
सिनेमामध्ये दिसणाऱ्या आणि भन्नाट आवाज करत सुसाट वेगाने धावणाऱ्या सुपर बाइकची क्रेझ आता देशात वाढू लागली आहे. देशात दर वर्षी सुमारे २७०० हून अधिक सुपर बाइक विकल्या जात आहेत. आयटी कंपन्या आणि कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची लाइफस्टाइल आणि योग्य वयात त्यांना मिळणारे लठ्ठ वेतन यामुळे सुपर बाइक कंपन्यांना भारतीय बाजारपेठ खुणावते आहे.

कार्बाइडच्या आंब्यांवर अघोषित बहिष्कार

$
0
0
आंबा पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कार्बाइडच्या संदर्भात आता ग्राहक जागरूक झाले असून, त्याबाबत व्यापाऱ्यांकडे विचारणा होऊ लागली आहे. इतकेच नव्हे, तर कार्बाइडचा वापर करण्यात आलेल्या आंब्यांवर अघोषित बहिष्कार टाकण्यापर्यंत ही जनजागृती दिसते आहे.

मॉरिशसचे आध्यात्मिक शिष्टमंडळ कासारवाडीत

$
0
0
‘आम्ही दूर असलो तरी हिंदू अध्यात्माचे संस्कार एकात्मतेचे दर्शन घडवितात. त्यामुळे धार्मिक मेळ्याच्या माध्यमातून साहित्य, संस्कृतीचा प्रसार करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत,’ असे मॉरिशसच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले आहे.

कामगारांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची गरज

$
0
0
‘असोसिएशन ऑफ सिव्हेलियन एम्प्लॉइज ऑफ कमांड आयईएमई वर्कशॉप, खडकी’ या कामगार संघटनेची दर दोन वर्षांनंतर निवडणूक होते. जूनमध्ये या संघटनेची निवडणूक पार पडणार आहे. या निमित्त वर्कर्स कमिटी आणि त्यातील कामगारांच्या इतर संघटनांची नुकतीच बैठक पार पडली.

१० हजार आंबे फेकले कचरा डेपोत

$
0
0
रासायनिक पावडरचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले दोन हजार किलो वजनाचे सुमारे दहा हजारांहून अधिक आंबे पिंपरी कॅम्पमधील दोघा व्यापाऱ्यांकडून महापालिकेच्या अन्न परवाना विभाग आणि शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केले.

टिळक रोडवर लूटमार

$
0
0
टिळक रोड, स्वारगेट परिसरातून रात्री बे-रात्री प्रवास करताना सावधान! दुचाकीवर फिरणारे चोरटे चॉपरच्या धाकाने नागरिकांना लुटत असल्याचे प्रकार घडले आहेत. उपनगरांमध्ये घडणारे गुन्हे शहराच्या मध्यवस्तीत घडू लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे, तर पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

सर्पदंशाच्या इंजेक्शनची गुणवत्ता खालावली

$
0
0
सरकारी पातळीवरील अनास्थेमुळेच सर्पदशांवरील लशींची गुणवत्ता खालावली असून, राज्यभरात लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेशंटला किमान दहा ते तीस इंजेक्शन देऊनही विष उतरण्यास अडचणी येत आहेत.

अपंगांच्या बंद शाळातील शिक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत

$
0
0
राज्यातील बंद पडलेल्या अपंगांच्या अनुदानित शाळा व कर्मशाळांमधील अंदाजे दीडशे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून नोकरीसाठी अन्य ठिकाणी नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

विवेकानंद जयंती : राज्य सरकारचे दुर्लक्ष

$
0
0
स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्तच्या देशात आणि राज्यात सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांना नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला असतानाही, राज्य सरकारने मात्र या उपक्रमांकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार ‘स्वामी विवेकानंद सार्ध शती समारंभा’च्या राज्य समितीने रविवारी केली.

वर्षभरात २ लाख पासपोर्टचे वितरण

$
0
0
परदेशात जाण्याच्या संधींमध्ये वाढ होत असल्यामुळे पुण्यातील पासपोर्ट कार्यालयाने पासपोर्ट वितरणाचा नवा टप्पा पार केला आहे. गेल्या वर्षभरामध्ये पासपोर्ट कार्यालयाने तब्बल दोन लाख पासपोर्ट दिले असून, वीस हजार तत्काळ पासपोर्टचे वितरण झाले आहे.

शालेय मुलींच्या मदतीसाठी दक्षता समिती

$
0
0
शाळेतील मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार, छेडछाड, टिंगलटवाळी, शिक्षकांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी धमकाविणे या गोष्टींना आळा घालण्यासाठी राज्य पातळीवर प्रत्येक शाळेत ‘शालेय पोलिस दक्षता समिती’ स्थापन करण्याचा शिक्षण विभागाचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी दिली.

जमिनीच्या वादातून गजाने मारहाण

$
0
0
जमिनीच्या वादातून बालेवाडी येथे शिवाजी श्रीपत बालवडकर यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या पत्नी व मुलांना गजाने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.काँग्रेसचे कार्यकर्ते व केंद्रीय दूरसंचार समितीचे सदस्य शरद महादेव बालवडकर व त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी शिवाजी बालवडकर यांच्या घरावर हल्ला केला. त्यांना गज, लोखंडी हत्यारे व काठ्यांनी मारहाण करण्यात आली.

अवैध बांधकामांबाबत पुरंदरमध्ये संभ्रम

$
0
0
पुरंदर तालुक्यातील बांधकामे अवैध असल्याचा निकाल मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर आता महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ कायद्यान्वये कोणावर कारवाई होणार, की हे दोन लाख १३ हजार स्क्वेअर फुटाचे बांधकाम नियमित होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा गडबडून गेली आहे.

उपनगरांमध्ये अवैध वाहतूक फोफावली

$
0
0
वाढत जाणारा तापमानाचा पारा, सावलीत थांबण्यासाठी बसची शेड नाही, रणरणत्या उन्हात लहान मुले आणि सामान हातात घेऊन एस. टी.ची वाट बघत ताटकळणे, बसण्याचीही सोय नाही असे विदारक चित्र आहे, येरवड्यातील गुंजन चौकातील.

आळंदी येथील कामांची पाहणी

$
0
0
आळंदी येथे विकास आराखड्याअंतर्गत चालू असलेल्या काही कामांची पाहणी खेडचे प्रांताधिकारी हिम्मतराव खराडे व आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी करून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.

वनजमिनीतील अतिक्रमणाने कामात अडथळा

$
0
0
कुरण येथील जुन्नर वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी खड्डे करण्याचे काम सुरू असताना वनक्षेत्रात अतिक्रमण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोकशासन आंदोलनाच्या ४० कार्यकर्त्यांवर जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images