Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गडबड, गोंधळ आणि बेशिस्तीचे जंक्शन

$
0
0
वाहनांच्या आणि माणसांच्याही कोंडीतून वाट काढून रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी नागरिकांचे सुरू असलेले प्रयत्न... स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्याही रेल्वेचा हॉर्न ऐकून होणारी पळापळ... जड बॅगांसह सावरत लहान मुलांना सांभाळण्याची कसरत करणारे पालक...

‘इन्हेलर्स थेरपी हा अस्थमावर सर्वोत्तम उपाय’

$
0
0
‘अस्थमाचे निदान कसे करावे याबाबत देशातील ८० टक्के डॉक्टरांना योग्य माहिती नाही. बहुतांश ठिकाणी ‘सीझनल इन्फेक्शन आहे,’ असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते,’ अशी खंत चेस्ट फिजिशियन डॉ. महावीर मोदी यांनी व्यक्त केली.

गुरुवार पेठेत सोनसाखळी चोरांना पकडले

$
0
0
गुरुवार पेठेतील राम मंदिरासमोरून ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने पाठलाग करत पकडण्यात आले. शोभा सुधाकर इंदारी (६६, रा. गुरुवार पेठ) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अभिप्राय देण्यात प्रशासनाची दिरंगाई

$
0
0
स्थायी समिती आणि शहर सुधारणा समितीमार्फत अभिप्रायासाठी पाठवण्यात आलेल्या विषयांवर एका महिन्यात निर्णय घेण्याचे बंधन पालिका प्रशासनाने झुगारून लावले आहे. स्थायी समितीच्या केवळ ३५ टक्के, तर शहर सुधारणा समितीच्या जेमतेम २० टक्के प्रस्तावांवर प्रशासनाने अभिप्राय दिला आहे.

‘किऑस्क’साठी ठेकेदारांची मनमानी

$
0
0
बहुउद्देशीय नागरी सुविधा केंद्राच्या (किऑस्क) माध्यमातून ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी महापालिकेने केलेला करार ठेकेदाराने बासनात बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या करारात पालिकेने घातलेल्या अटींकडे दुर्लक्ष करत ठेकेदार मनमानी पद्धतीने ही किऑस्क चालवित असल्याचे समोर आले आहे.

‘जेईई मेन’चा निकाल जाहीर

$
0
0
आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई-मेन’चा निकाल शुक्रवारी, दोन मे रोजीच रात्री उशिराने जाहीर करण्यात आला. अॅडव्हान्स परीक्षेला पात्र ठरण्यासाठीचा यंदाचा कट-ऑफ ११५ असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सविस्तर निकाल आज, शनिवारी जाहीर करण्यात येईल.

स्कॉलरशिपसाठी आता एकदाच अर्ज

$
0
0
सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांना आता प्रत्येक शैक्षणिक वर्षात नवीन अर्ज करण्याची गरज नाही. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षी एकदाच अर्ज केल्यानंतर त्यांना पुढील प्रत्येक वर्षामध्ये अर्जाविनाच स्कॉलरशिप देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.

बेसमेंटमधील पार्किंग कागदावरच

$
0
0
कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील इमारतींच्या बेसमेंटमध्ये असलेल्या हॉटेलवर कारवाई करून त्या जागा नागरिकांना पार्किंगसाठी खुले करण्याचा बोर्डाचा निर्णय कागदावरच राहिला आहे. नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे बोर्डाने कोणत्याही हॉटेलवर कारवाई केली नसल्याने सध्या सर्रासपणे बेसमेंटमध्ये हॉटेल चालविण्यात येत आहेत.

...म्हणून शिक्षिकेला मारहाण

$
0
0
नववीतील मुलगी नापास झाल्याच्या रागातून मुलीची आई आणि बहिणीने शिक्षिकेला मारहाण केल्याचा प्रकार आळंदी रोडवरील नानासाहेब परुळेकर विद्यालयात घडला. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आई आणि बहिणीली अटक करण्यात आली.

परदेशी विद्यार्थ्यांची पोलीस ‘हजेरी’

$
0
0
शैक्षणिक व्हिसाची मुदत संपुष्टात आल्यानंतरही विद्येच्या माहेरघरचा पाहुणचार झोडणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांची हजेरी आणि शैक्षणिक प्रगतीचा मासिक अहवाल पाठविण्याची सक्ती कॉलेजना करण्यात आली आहे.

दुरांतोची ट्रॅक्टरला धडक, पाच ठार

$
0
0
हैदराबादहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या दुरांतो एक्स्प्रेसने शनिवार सकाळी रेल्वे क्रॉसिंग करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॅक्टरमधून प्रवास करणाऱ्या मजुरांपैकी की पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर सातजण जखमी आहेत.

गौरी गाडगीळने केला 'आई 'ला सलाम

$
0
0
तारे तारकांची मांदियाळी, बहारदार संगीत आणि नृत्य आणि 'जुळुनी येती रेशीमगाठी'च्या प्राजक्ता-ललित या लोकप्रिय जोडीसह पुण्याची ख्यातनाम गौरी गाडगीळने आपापल्या 'आई'ला केलेला 'सलाम' यामुळे येथील महाराष्ट्र दिन सोहळा जेवढा आनंद दायी, जल्लोषपूर्ण ठरला तेवढाच तो भावपूर्णही ठरला.

विविध स्कॉलरशिप योजनांपासून विद्यार्थी वंचित

$
0
0
पुणे विद्यापीठाने आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या विविध स्कॉलरशिप योजनांचा तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा निधी अद्याप संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूच शकला नसल्याचे आता समोर आले आहे.

‘घोकंपट्टी नको; संकल्पना स्पष्ट हव्यात’

$
0
0
राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षांना सामोरे जाण्यासाठी पुणेकर विद्यार्थ्यांना घोकंपट्टी उपयोगाची नाही, हे यंदाच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. ‘जेईई-मेन’ या परीक्षेमधून आयआयटी प्रवेशासाठी होणाऱ्या ‘जेईई-अॅडव्हान्स्ड’ला पुण्यातून ३५ हजारांपैकी हजारभर विद्यार्थीही पात्र होऊ शकले नसल्याचे चित्र आहे.

पोलिस आयुक्तालयातील सर्व्हर रूमला आग

$
0
0
पुणे पोलिस आयुक्तालयातील तळमजल्यावरील सर्व्हर रूमला शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत कम्प्युटर, सर्व्हर, ​प्रिंटर, वायरलेस सेट जळून खाक झाले. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

उष्णतेच्या झळांमध्ये अवचित गारव्याची झुळूक

$
0
0
दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे पुण्यात शनिवारी थेट उन्हाचा कडाका जाणवला नसला, तरीही गरम वाऱ्याच्या झोतांनी पुणेकर हैराण झाले होते. शहराच्या काही भागांत अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने शहरात रात्री साडेआठपर्यंत अर्धा मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

फक्त कौटुंबिक कायद्यातच असमानता

$
0
0
‘देशात समान नागरी कायदा नाही, म्हणून देशात एकात्मता नाही,’ असे म्हणणे चुकीचे आहे. फक्त कौटुंबिक कायदे वगळता इतर सर्व बाबतीत देशात समान नागरी कायदा अस्तित्वात आहे.

‘अपेडा’ आणि केंद्राने वेळीच उपाय करायला हवा होता

$
0
0
आंबा व भाजीपाला निर्यातीवर युरोपीय महासंघाने घातलेल्या बंदीसंदर्भात राज्याचे कृषि व पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केंद्रीय कृषी विभाग आणि ‘अपेडा’कडे बोट दाखविले आहे. ‘युरोपातील अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी दिलेल्या भेटीनंतर अपेडा व केंद्रीय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक होते,’ अशी टिपण्णी त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

रस्ते दीडपट करण्यास पालिका प्रशासन अनुकूल

$
0
0
समाविष्ट २३ गावांतील रस्ते दीडपट करण्याच्या प्रस्तावावर महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. दीडपट रस्त्यांचा अहवाल नगररचना विभागामार्फत लवकरच राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठविण्यात येणार आहे.

रस्तारुंदी, मेट्रो आणि आरक्षण बदलावर सुनावणी

$
0
0
लक्ष्मी रोडवरील सोन्या मारुती चौक..., लाल महाल ते फडके हौद..., केळकर रोड... यासह कसबा, नारायण, रास्ता, सदाशिव, शनिवार, सोमवार, शुक्रवार अशा पेठांमधील भागांत विकास आराखड्यात (डीपी) दाखवण्यात आलेल्या रस्तारुंदीबाबतच्या हरकतींची सुनावणी सोमवारपासून (पाच मे) होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images