Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पावसाळी झाकणे अखेर बदलली

$
0
0
सातारा रस्ता बीआरटी मार्गावरील अहिल्यादेवी चौकात काकडे ज्वेलर्ससमोरील मार्गावरील ‘पावसाळी चेंबरची जाळी तुटल्याने अपघाताचा धोका’ असे वृत्त ‘मटा’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर अपघात घडण्यापूर्वीच लोखंडी जाळी काढून त्या ठिकाणी नवे झाकण बसवण्यात आल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

अपघातप्रकरणी गेटमनला अटक

$
0
0
खामगाव फाटा येथील रेल्वे व ट्रॅक्टर ट्रॉली यांच्यातील अपघातास कारणीभूत ठरलेल्या जयपाल धर्मपालसिंग यादव (वय ३२, रा. यवत रेल्वे स्टेशन) या गेटमनला अटक करण्यात आली आहे.

डिप्लोमा प्रवेश वेळेवर होणार का?

$
0
0
इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘जर-तर’मध्ये अडकले असले, तरी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशांवर काही परिणाम होण्याची शक्यता नाही. दहावी आणि बारावीनंतर उपलब्ध असलेल्या डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया या दोन्ही इयत्तांचे निकाल जाहीर झाल्यावर लगेचच सुरू करण्यात येणार आहे.

‘आयटीआय’ऑनलाइनमध्येही त्रुटी

$
0
0
मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच पार पडणार आहे. येत्या पंधरवड्यात याबाबतची अधिसूचना काढण्यात येण्याची शक्यता आहे.

कीटकनाशके खरेदीचा प्रस्ताव पुन्हा ‘स्थायीत’

$
0
0
चार महिन्यांपूर्वी जास्त किंमत आल्याने पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने फेटाळलेला कीटक प्रतिबंधक औषध खरेदीचा प्रस्ताव पुन्हा एकदा मंजुरीसाठी स्थायी समितीत आला आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळच्या ठेकेदारानेच हा प्रस्ताव दिला असून या वेळेस या औषधांच्या किंमतीत चक्क निम्म्याने फरक पडला आहे.

पालेभाज्यांनाही लागल्या उन्हाच्या झळा

$
0
0
उकाड्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली असून, पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. कांदा, बटाटा, घेवडा, मटार यांचे दर १० ते २० टक्यांनी वाढले आहेत. तर, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. रविवारी मार्केट यार्डमधील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याच्या १५० ते १६० गाड्यांची आवक झाली.

महिलेकडून कंडक्टरच्या श्रीमुखात

$
0
0
महिला प्रवाशाबरोबर असभ्य वर्तन करणाऱ्या पीएमपी कंडक्टरला महिलेने श्रीमुखात भडकवल्याचा प्रकार डेक्कन कॉलेज चौक ते होळकर ब्रीजच्या दरम्यान घडला. कंडक्टरने पंचिंग करण्याच्या पंचने महिलेला मारहाण केली असल्याने विश्रांतवाडी पोलिसांनी कंडक्टरला अटक केली.

हॅलेच्या उल्का पाहण्याची आकाशप्रेमींना आज संधी

$
0
0
हॅलेच्या धूमकेतूमुळे निर्माण होणाऱ्या तेजस्वी उल्का पाहण्याची संधी आकाशप्रेमींना आज, सोमवारी रात्री मिळणार आहे. शहरापासून दूर अंधाऱ्या आकाशात पाहिल्यास सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत ताशी ५५ या प्रमाणात हॅलेच्या उल्का दिसू शकणार आहेत. कुंभ राशीतून हा उल्कावर्षाव होणार आहे.

पिंपरी महापालिकेचे ६४ स्वच्छतागृहांसाठी धोरण

$
0
0
तरंगत्या लोकसंख्येसाठी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने धोरण तयार केले असून, ते मान्यतेसाठी स्थायी समितीच्या बैठकीसमोर ठेवण्यात आले आहे. या धोरणानुसार शहरात ६४ ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

होमिओपॅथच्या ८०० डॉक्टरांनाच अॅलोपॅथी प्रॅक्टिसची मुभा?

$
0
0
होमिओपॅथना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा देताना एका वर्षाचा फार्मकोलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे त्यांना सक्तीचे करण्यात आले. मात्र, सरकारी एमबीबीएस कॉलेजमध्येच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याने सोळा कॉलेजमधून एका वर्षात केवळ आठशे होमिओपॅथना अॅलोपॅथची प्रॅक्टिस करता येणे शक्य होणार आहे.

‘उदय’च्या ‘दुनियादारी’ची साठी

$
0
0
एसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा हक्काचा कट्टा..कॅरमचा अड्डा, चविष्ट इडली-सांबार, पोहे, मिसळ आणि एसपीडीपीची खासियत.. गाजलेल्या ‘दुनियादारी’ कादंबरीमध्ये संदर्भ असलेल्या ‘उदयविहार’ने नुकताच हीरक महोत्सव साजरा केला.

ऑनलाइन प्रवेशासाठी आजपासून दुसरी फेरी

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी शहरात आजपासून ऑनलाइन प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार आहे. www.rtemaharashtra.in या वेबसाइटच्या माध्यमातून त्यासाठीचे अर्ज सादर करता येणार आहेत.

मार्केट यार्डमध्ये गेटबंद आंदोलन

$
0
0
विक्रीसाठी आणलेल्या आंब्याच्या पेट्या उतरवून घेण्यास नकार दिल्यामुळे कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी मार्केट यार्डच्या गेटवर रविवारी सकाळी गेटबंद आंदोलन केले. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

‘डीपी’च्या सुनावणीस कागदपत्रेच नाहीत

$
0
0
शहराच्या विकास आराखड्यावरील (डीपी) हरकती आणि सूचनांवर आजपासून (सोमवार) सुनावणी घेण्याची तयारी महापालिकेने केली असली तरीही, संबंधित समितीत‌ील सदस्यांना अद्यापही महापालिकेने डीपीची महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध करून दिली नसल्याचे समोर आले आहे.

१५ रेल्वे फाटके होणार बंद

$
0
0
मानवरहित १५ रेल्वे फाटके बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. येत्या वर्षभरात ही सर्व फाटके बंद करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पुणे-हावडा दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघाताची घटना घडल्यानंतर मानवरहित रेल्वे फाटकांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दिवे घाटात बस जळून खाक

$
0
0
पुण्याहून पंढरपूरकडे जाणाऱ्या एसटी बसला (एमएच- ०६, एस-८३७०) अतंर्गत वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे रविवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दिवे घाटात आग लागली. प्रसंगावधान दाखवून चालकाने प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितल्याने मोठी दुर्घटना टळली.

वाँटेड दहशतवाद्याचा पुण्यात वावर

$
0
0
मोजीबुल्लाह जबीर अन्सारी (वय २४, रा. रांची, झारखंड) या ‘इंडियन मुजाहिदीन’च्या (आयएम) दहशतवाद्याने पुण्यात आणि साताऱ्यात वास्तव्य केल्याचे राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला पकडून देणाऱ्यांना ‘एनआयए’ने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

इंजिनीअरिंग प्रवेशाला मुहूर्त जुलैचाच

$
0
0
‘जेईई-मेन’चा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लागला असला आणि बारावीचा निकाल या महिन्याच्या अखेरीस अपेक्षित असला, तरी यंदा इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त मात्र जुलैमध्येच उजाडणार, अशी चिन्हे आहेत.

जुन्या पीएमपी बस निकामी करा

$
0
0
‘पुण्यातील रस्त्यावर धावणाऱ्या पीएमपीच्या सात वर्ष जुन्या असणाऱ्या बस आरटीओने पीएमपीला चालवू देऊ नयेत,’ असा सल्ला पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी आरटीओ प्रमुखांना देत ‘पीएमपी’ला घरचा आहेर दिला. सजग नागरिक मंचातर्फे ‘पीएमपी बस प्रवास सुरक्षित होईल का?’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

‘अभिजात दर्जासाठी दबावगट हवा’

$
0
0
‘तमिळ, कन्नड, तेलुगू या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी तेथील राजकीय नेत्यांनी सर्व स्तरांवर मोठा दबावगट निर्माण केला. त्याच धर्तीवर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राजकीय दबावाबरोबरच साहित्यिक संस्थामार्फत; तसेच नागरिकांमधूनही दबाव वाढवला पाहिजे,’ असे मत मराठीचे अभ्यासक विनय मावळणकर यांनी नुकतेच व्यक्त केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images