Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘ग्लिरिसिडिया’ची जागा स्थानिक झाडे घेणार

$
0
0
पुण्याच्या टेकड्यांवर दिसणारे ‘ग्लिरिसिडिया’चे आच्छादन काही वर्षात गायब होणार असून त्याऐवजी कडूलिंब, चाफा, वड, पिंपळ, चिंच अशी स्थानिक झाडे पाहायला मिळणार आहेत. टेकड्यांवरील मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी वन विभागातर्फे स्थानिक झाडे लावून ग्लिरिसिडियाची झाडे काढून टाकण्यात येणार आहे.

गारपीटग्रस्तांना तीनशे कोटींचे वाटप

$
0
0
पुणे विभागातील चार जिल्ह्यांमधील गारपीटग्रस्त पावणेचार लाख शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणखी १४० कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

पालिकेच्या तिजोरीत जमला ११५ कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स

$
0
0
मिळकतकराच्या माध्यमातून एक महिन्याच्या काळात पालिकेच्या तिजोरीत ११५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला असून या महिनाभरात तब्बल ५१ हजार मिळकतदारांनी पालिकेकडे प्रॉपर्टी टॅक्स भरला आहे.

आपल्याच आदेशाला पालिकेकडून वाटाण्याच्या अक्षता

$
0
0
पुणेकरांच्या हितासाठी यापुढील काळात कोणत्याही परिस्थितीत पावसाळा होईपर्यंत रस्ते खोदाईला परवानगी दिली जाणार नाही. तसेच, शहरातील कोणताही रस्ता यापुढील काळात खोदला जाऊ नये, या महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षत‌ा लावत शहरातील अनेक भागातील रस्ते सर्रास खोदले जात असल्याचे समोर आले आहे.

आता गाइड्स तपासणार

$
0
0
‘बालभारती’कडून बाजारात आणल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांच्याच सोबतीनेच खासगी प्रकाशकांकडून प्रकाशित केल्या होणाऱ्या गाइड्स आणि शालेय अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांची ‘बालभारती’कडून पडताळणी केली जाणार आहे.

शहरात रक्ताचा तुटवडा

$
0
0
उन्हाळ्यात कॉलेजांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटली आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या विविध गटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्ताची मागणी पूर्ण करण्यासाठी रक्तदाते, तसेच स्वयंसेवी संस्थांकडे रक्तपेढ्यांची धावाधाव पुन्हा सुरू झाली आहे.

एमकॉमची परीक्षा लांबणीवर

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे येत्या ५ मेपासून घेण्यात येणाऱ्या एमकॉमच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा आता १० मेपासून सुरू होणार असून, त्या विषयीचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

‘शिक्षण मंडळ बरखास्त करा’

$
0
0
आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमध्ये अडकलेले पालिकेचे शिक्षण मंडळ तातडीने बरखास्त करून सर्व अधिकार आयुक्तांनी स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

सचिनचा सत्कार : ‘मुहूर्ता’ची प्रतीक्षा

$
0
0
विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा खास मानपत्र देऊन सत्कार करणाऱ्या पालिकेने भारतरत्न सचिन तेंडुलकरचा सत्कार विस्मरणाच्या ‘पिच’वर पाठविला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सचिनच्या सत्काराचा ठराव दोन वेळा मंजूर करूनही त्यासाठी पालिका अद्याप ‘मुहूर्ता’च्या शोधात आहे.

लोणावळ्यात खंडणीप्रकरणी अटक

$
0
0
मानवाधिकार समितीचे लोणावळा शहराध्यक्ष शकील बागवान यांनी घरदुरुस्ती करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीकडून दमदाटी करून २० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

बालभारतीकडून गाइड्सची परीक्षा

$
0
0
‘बालभारती’कडून बाजारात आणल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांच्याच सोबतीनेच खासगी प्रकाशकांकडून प्रकाशित केल्या होणाऱ्या गाइड्स आणि शालेय अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांची ‘बालभारती’कडून पडताळणी केली जाणार आहे. शालेय पाठ्यपुस्तकांच्या पातळीवर होणारे वाङ्मयचौर्य पडताळून पाहण्यासाठी ‘बालभारती’ने हे पाऊल उचलले आहे.

तुरुंगातून पळालेले आरोपी अटकेत

$
0
0
कोपरगाव जेलमधून चार दिवसांपूर्वी गज तोडून पळालेले चार आरोपी मंचर आणि शिर्डी पोलिसांनी वाफगाव घाटात जेरबंद केले. जेलमधून पळालेल्या पाच आरोपींपैकी चारजण दुचाकीवरून वाफगाव घाटातून चालले असल्याची माहीती गुप्त बातमीदाराकडून पोलीसांना मिळालेली होती.

इंजिनीअरिंग कॉलेज चौकात वाहतुकीची कोंडी

$
0
0
संथ गतीने सुरू असणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे इंजिनिअरिंग कॉलेज चौकातील वाहतूक कोंडी पुणेकरांना त्रासदायक ठरत आहे. इंजिनिअरिंग कॉलेज चौकातून संगमवाडीकडे जाणाऱ्या वाहनांची संचेती हॉस्पिटलच्या पुलापर्यंत येणारी रांग, पाटील इस्टेटपासून वाकडेवाडीपर्यंत लागणारी वाहनांची रांग यातून मार्ग काढण्यात वाहनचालकांचा वेळ खर्ची पडत आहे.

शनिवार पेठेत नगरकर वाड्याला आग

$
0
0
शनिवार पेठेत लाकडी बांधकामातील नगरकर वाड्याला शुक्रवारी लागलेल्या आगीत तीन खोल्या जळून खाक झाल्या. यावेळी पेट घेतलेले दोन एलपीजी गॅस सिलिंडर फायर ब्रिगेडच्या जवानांनी वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज जवानांनी व्यक्त केला.

दोन्ही पाय गमावलेल्या तरुणाला मदतीचे आवाहन

$
0
0
वडगाव स्टेशनवरून कान्हे येथे जाण्यासाठी रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या सचिन बाळू कांबळे या ३२ वर्षांच्या तरुणाचा अपघात झाल्याने त्याने दोन्ही पाय गमावले. व्यवसायाने पेंटर असलेल्या या तरुणाची आर्थिक स्थिती हालाखिची आहे.

‘पुणे तृतीयपंथी विकास समिती’ची स्थापना

$
0
0
सरकारने जाहीर केलेल्या योजना तसेच प्रस्तावित तृतीयपंथी कल्याणकारी बोर्डातील कामकाजाची माहिती शहरातील तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पुणे तृतीयपंथी विकास समिती’ची बुधवारी स्थापना करण्यात आली.

‘महावितरण’कडून कामांची दखल

$
0
0
ग्राहक सेवा, वीजवाहिन्या व उपकेद्रांची विनाअपघात तांत्रिक दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या १२ यंत्रचालक व ४४ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा महावितरणच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन कामगारदिनी गौरव करण्यात आला. महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महावितरणच्या रास्ता पेठ येथील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हडपसर उड्डाणपूल नागरिकांसाठी असुरक्षित

$
0
0
शहराच्या विविध भागात सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या कामाच्या ठिकाणी नागरिकांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे सजग नागरिकांनी पालिकेच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्याकडे पालिकेने डोळेझाकच केली आहे.

‘बीभत्स जाहिरात फलकांवर हवी कारवाई’

$
0
0
व्यावसायिकतेच्या नावाखाली जाहिरातींमध्ये होणारे स्त्री प्रदर्शन चिंताजनक विषय ठरत असून जाहिरातीसंदर्भात शहरात बीभत्स फलक लावण्यात आल्यास त्यावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे अभिव्यक्ती संस्थेच्या अलका जोशी यांनी सांगितले.

पालिका उपायुक्त मोरे यांच्या निलंबनाची मागणी

$
0
0
बांधकाम व्यावसायिकाच्या हितासाठी महापालिकेने नियम धाब्यावर बसवून झोपडपट्टी निर्मूलन विभागाचे उपायुक्त द. गा. मोरे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नाहक त्रास देत असल्याचा आरोप जनअदालत संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images