Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महानगरपालिका अनभिज्ञच...!

$
0
0
शहरातील कोणताही रस्ता खोदू नये, असे महापालिका आयुक्तांचा आदेश डावलून गेले दोन दिवस कर्वेरोडवर खोदला जाणारा रस्ता कोणी खोदला, याची कोणतीही माहिती प्रशासनाला नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर यांनीच स्थायी समितीच्या बैठकीत हा रस्ता कुणी खोदला याची माहिती नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

जाहिरात दरांतही घोटाळा

$
0
0
कुंड्या खरेदी, साहित्य खरेदी यापाठोपाठ आता शिक्षण मंडळात जाहिरातींच्या दरांमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करून त्याचा अहवाल लेखी स्वरूपात सादर करण्याची मागणी काँग्रेसने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

रस्तेखोदाईचा कारभार आतबट्ट्याचा

$
0
0
शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल दीडशे किलोमीटर रस्ते केबलसाठी खोदण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. या खोदाईतून पालिकेला ३० कोटी रुपयांचे शुल्क मिळाले असले, तरी त्याच्या दुरुस्तीवर त्याहून अधिक निधी खर्च करावा लागत असल्याने ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशा स्थितीला तोंड द्यावे लागत आहे.

शहरी गरीब योजना औषध खरेदीला मुहूर्त

$
0
0
महापालिकेच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या शहरी गरीब योजनेसाठी तातडीने तीन महिन्यांची औषध खरेदी करण्यास स्थायी समित‌ीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून ही खरेदी रखडली होती.

अक्षय्य तृतीयेनिमित्त आंब्यांची आवक वाढली

$
0
0
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली आहे. मार्केट यार्डमधील बाजारपेठेत बुधवारी २० ते २३ हजार पेटी आंब्यांची आवक झाली, त्यामध्ये रत्नागिरी हापूसच्या आठ हजार पेट्या आणि कर्नाटक हापूसच्या १२ ते १५ हजार पेट्यांचा समावेश आहे.

एसटी-RTO ची संयुक्त मोहीम रेंगाळली

$
0
0
खासगी गाड्यांना आळा घालण्यासाठी एसटीकडून पावले उचलण्यात आली असली तरी संपूर्ण पुणे जिल्ह्यात या गाड्यांची तपासणी करण्यासाठी अवघी दोनच पथके कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला ठेंगा

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त गाव अभियानाच्या अंमलबजावणीला नोकरशाहीने यंदा ठेंगा दाखविला आहे. पुणे विभागात यंदा या अभियानासाठी मंजूर केलेल्या निधीपैकी दहा टक्केही निधी खर्च झालेला नाही.

डीपीवरील हरकतींची सुनावणी सोमवारपासून

$
0
0
आचारसंहिता शिथिल झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यावरील (डीपी) हरकती-सूचनांच्या सुनावणीचा मुहूर्त महापालिकेने निश्चित केला आहे. येत्या सोमवारपासून (५ मे) सुनावणी सुरू होणार असून, आगामी दोन महिन्यांमध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

‘तथ्यशोधन समिती’ तपासणार जमीन दुष्परिणाम

$
0
0
पेट्रोल आणि ऑईलच्या टाक्यांमुळे दुषित झालेल्या विहिरीच्या पाण्याचा अभ्यास करण्यासाठी ‘स्वतंत्र तथ्यशोधन समिती’ स्थापन करा आणि तीन आठवड्यात निरीक्षण अहवाल सादर करा,’ असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

स्कॉलरशिप पेपर सेटर्सना आता विशेष प्रशिक्षण

$
0
0
स्कॉलरशिपच्या परीक्षांसाठीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये होणाऱ्या चुका टाळण्यासाठी या पुढे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पेपर सेटर्सना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शिक्षणहक्क प्रवेशासाठी पुन्हा संधी

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला येत्या सोमवारपासून (५ मे) सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी हुकलेल्या पालकांसोबतच, पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या मात्र अपेक्षित शाळांमधून प्रवेश न मिळालेल्या पालकांनाही या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या पाल्यांसाठीचे प्रवेश निश्चित करता येणार आहेत.

शिक्षणहक्कांच्या अडचणींना वाटाण्याच्या अक्षता

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेश प्रक्रियेमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने, शहरातील पालकांनी बुधवारी थेट शिक्षण आयुक्तांकडे धाव घेतली.

‘लर्निंग आउटकम’चा घेणार विशेष आढावा

$
0
0
राज्यातील विद्यार्थी आपल्या शैक्षणिक आयुष्यात नेमके काय शिकले, याचा आढावा आता शिक्षण विभागामार्फत घेतला जाणार आहे. त्यासाठी ‘अॅक्सेंच्युअर’ या खासगी क्षेत्रातील कंपनीच्या मदतीने राज्यात ‘लर्निंग आउटकम’विषयीचा विशेष प्रकल्प राबविला जाणार असून, त्यासाठीची प्राथमिक प्रक्रियाही सुरू झाली आहे.

कंटेनरखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू

$
0
0
हडपसर-सासवड रस्त्यावर सातववाडी येथे कंटेनर व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील अडीच वर्षांची चिमुरडी ठार झाली, तर तिची आई जखमी झाली आहे. हा अपघात बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला.

पुण्यातील डॉक्टरला सहा महिन्यांची कैद

$
0
0
सोनोग्राफीचा एफ फॉर्म अपूर्ण भरणे, सोनोग्राफीचे कारण न लिहिणे या बाबींद्वारे गर्भलिंगनिदान व प्रसवपूर्व तंत्र कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याप्रकरणी बाणेरच्या डॉ. विनीत महाजन यांना सहा महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली.

‘ससून’च्या ४० वर्षांच्या रेकॉर्डचे डिजिटायझेशन

$
0
0
ससून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या पेशंटच्या न्यायवैद्यकीय कागदपत्रांसह कोर्टास आवश्यक ठरणारे पुरावे आणि मेडिकल कॉलेजच्या चाळीस वर्षांपासूनच्या महत्त्वाच्या रेकॉर्डचे लवकरच डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.

अतिक्रमणविरोधी कारवाई नागरिकांच्या रोषाची धनी

$
0
0
विठ्ठलवाडी ते वारजे दरम्यान नदीपात्रातील रस्त्यात येणारी इमारत पाडण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या फौजफाट्याला नागरिकांच्या रोषाखातर बुधवारी परत फिरावे लागले. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने ‘ब्लू लाइन’मधील बांधकामे पाडण्याचे आदेश दिल्याने कारवाई होणारच, असा पवित्रा पालिकेने घेतला आहे.

पावसाचा हलकासा दिलासा

$
0
0
वाढत्या उकाड्याने हैराण झाल्यानंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना अखेर जोरदार पावसाने हुलकावणी दिली आणि हलक्या सरींवरच पुणेकरांना समाधान मानावे लागले. कमाल तापमान ४० अंशांवर असतानाच किमान तापमानाने पंचविशी ओलांडल्याने पुणेकर घामाघूम झाले होते.

जप्त केलेल्या पैशांचे कोडे उलगडेना

$
0
0
निवडणुकीदरम्यान पोलिसांनी रोकड जप्त केल्यास ती सरकारदरबारी जमा होते आणि त्यानंतर संबंधितांना कोर्टामार्फत ही रक्कम सोडवून आणावी लागते. त्या प्रमाणे पुण्यात जप्त झालेले साडेसहा लाख रुपये कोर्टामार्फत सोडविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मानवाधिकार समितीच्या अध्यक्षाने मागितली खंडणी

$
0
0
मानवाधिकार समितीचे लोणावळा शहराध्यक्ष शकील बागवान यांनी घरदुरुस्ती करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीकडून दमदाटी करून २० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images