Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

परदेशी कर्मचाऱ्यांच्या ‘PF’वर नजर

$
0
0
परदेशी कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड जमा होतो की नाही, यावर आता एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनची (ईपीएफओ) नजर राहणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा होत नसल्यास त्या कंपनी किंवा कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

‘नैसर्गिक संपत्तीच्या अतिवापरामुळे धोका’

$
0
0
‘नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना आपण पर्यावरणाची हानी तर करत नाही ना, हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अतिवापरामुळे पुढच्या पिढीला त्याचे घातक परिणाम भोगावे लागणार आहेत,’ असे मत पर्यावरण अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

अश्लील अभिव्यक्तीविरुद्ध ‘अभिव्यक्ती’चे आंदोलन

$
0
0
पुरुषांना उत्पादनांकडे आकर्षित करण्यासाठी स्त्रियांना जाहिरातीत खेळणे म्हणून वापरणाऱ्या एका ‘परफ्युम’ कंपनीच्या जाहिरातींना अभिव्यक्ती संघटनेने मंगळवारी काळे फासले. ‘पीएमपी’तर्फे कॉलेज परिसरातील सर्व बसस्टॉपवर लावलेल्या या जाहिरातींच्या विरोधात आंदोलन करून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी काही फलक फाडून टाकले.

अपंग कल्याण आयुक्तालयात ४१५ नव्या पदांची मागणी

$
0
0
अपंग कल्याण आयुक्तालयाचे बळकटीकरण आणि अपंगांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तालयाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची ४१५ नवीन पदे भरण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

मोफत पीएमपी पासचा मार्ग अपंगांसाठी मोकळा

$
0
0
अपंगांना देण्यात येणाऱ्या मोफत पीएमपी पासचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या शुक्रवारपासून (दोन मे) अपंगांच्या पासचे नूतनीकरण करण्यात येणार असून, नवीन पासचे वाटपही केले जाणार आहे.

सोनसाखळी चोरणाऱ्या आणखी १० टोळ्या

$
0
0
पुणे पोलिसांनी सोनसाखळी हिसकावणारी टोळी गजाआड केली असली तरी आणखी दहा टोळ्या कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहे. या टोळ्या महाबळेश्वर पाठोपाठ लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणीही मुक्काम ठोकत पुणे शहरात गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

निधीअभावी विकासकामांच्या कंत्राटांना स्थगिती

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या परिसरातील नागरिकांसाठी हे वर्षे खड्ड्यांचे आणि विकासकामांविना जाणार आहे. कारण निधीअभावी यावर्षी नादुरुस्त झालेले रस्ते दुरुस्त करण्यात येणार नसून, विकासकामांच्या कंत्राटांना स्थगिती देण्यात आली आहे.

चोवीस वर्षांनी केली अटक

$
0
0
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी २४ वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांत दुर्गानंद वासुदेव नाडकर्णी (वय ७८, रा. गोवा) यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. कोर्टाने त्यांची १२ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. नाडकर्णी हे १९९०च्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते.

पुणे-मुंबई रेल्वेसेवा विस्कळित

$
0
0
पुणे ते लोणावळा मार्गावरील विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या रेल्वेगाड्यांना सकाळी अर्धा तास अडकून पडावे लागले. सकाळी आठ वाजून पाच ​मिनिटांनी परिस्थिती सुरळीत झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

शास्त्रीय नृत्याचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा

$
0
0
‘नृत्य हीच साधना, करू तिची आराधना’, ‘डान्स इज शॉर्टकट टू हॅपीनेस’ असे फलक घेऊन सह्यांची मोहीम राबवत शास्रीय नृत्याला लोकाश्रय मिळावा, नृत्यांचा समृद्ध वारसा पुढे चालावा, असे आवाहन शास्त्रीय नृत्य कलाकारांनी केले.

पुणेकरांची ‘अग्निपरीक्षा’

$
0
0
रणरणत्या उन्हामुळे पुण्याचा पारा दिवसेंदिवस चढतच चालला आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तापमानात वाढ होऊन पुण्यातील पारा ४०.६ अंशांवर पोहोचला. पुढील आठवडाभर पारा चाळीसच्या वरच राहणार असल्याने पुणेकरांना अग्निपरीक्षाच द्यावी लागण्याची चिन्हे आहेत.

‘वेंकीज’च्या फुटबॉल क्लबला राणीची भेट

$
0
0
ब्रिटनची राणी एलिझाबेथ आणि द ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी पुण्यातील वेंकीज समूहाच्या मालकीच्या इंग्लंडमधील ब्लॅकबर्न रोव्हर्स या फुटबॉल क्लबच्या ई वूड पार्कला नुकतीच भेट दिली. वेंकीज समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक व्यंकटेश राव आणि बालाजी राव यांनी इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांचे स्वागत केले.

शुक्राचार्य वांजळे यांचे जातप्रमाणपत्र रद्द

$
0
0
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य शुक्राचार्य वांजळे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द ठरविले आहे. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे जात पडताळणी समितीपुढे सादर करून फेरतपासणी करावी, असा आदेश कोर्टाने दिला आहे. शुक्राचार्य वांजळे हे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे बंधू आहेत.

आरोग्य खात्याकडे पुन्हा परवाना अधिकार

$
0
0
महापालिकेच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांना परवाना देण्याचा तसेच त्याचे तपासणी करण्याचे अधिकार पुन्हा महापालिकेच्या आरोग्य खात्याला देण्यात यावेत, असा ठराव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला.

डीपी रस्त्याबाबत एकवाक्यता नाही

$
0
0
शहराचा विकास आणि नियोजनाबाबत पालिकेतील अधिकाऱ्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचा प्रकार मंगळवारच्या स्थायी समितीमध्ये पुन्हा समोर आला.

‘कुंड्या’ अडकल्या आचारसंहितेच्या कचाट्यात

$
0
0
शिक्षण मंडळाने केलेली कुंड्यांची खरेदी आता निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. या संदर्भात मनसेकडून आचारसंहितेच्या भंगाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून त्यावर लवकरच चौकशी सुरू होणार आहे.

शिक्षण मंडळातील अनागोंदीने बलात्काराच्या चौकशीला ब्रेक?

$
0
0
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील गोंधळामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या चौकशीला ब्रेक लागला आहे. ही चौकशी तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन नवनियुक्त शिक्षण प्रमुखांकडून मंगळवारी देण्यात आले असले, तरी आता या चौकशीतून दोषींवर खरेच कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘लकी स्टोन’ पडला ३५ लाख रुपयांना

$
0
0
अंगठीत घालण्यासाठी लकी स्टोन देण्याच्या बहाण्याने एका बांधकाम व्यावसायिकाकडून ३५ लाख रुपयांचा चेक आणि त्याची इनोव्हा कार घेऊन दोघांनी पळ काढला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२ टक्केच पुणेकरांची दोनदा अंघोळ

$
0
0
पुण्याचे पालकमंत्री अजितदादांपासून राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार गिरीश बापट यांच्यापर्यंत सर्वांनीच पुणेकरांच्या दोनदा अंघोळ करण्यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ दोन टक्के पुणेकरच दोनदा अंघोळ करीत असल्याचे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

‘अनडिटेक्ट’ हत्यांचा पुन्हा तपास

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या, विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाचा खून असे गेल्या तीन वर्षांतील खुनाचे २३ गुन्हे उघडकीस आलेले नाहीत. पोलिस सहआयुक्त संजय कुमार यांनी पोलिस आयुक्तालयात मंगळवारी घेऊन प्रत्येक गुन्ह्याचा आढावा घेतला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images