Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

यंदा पाऊसमान कमी?

$
0
0
भारतासह दक्षिण आशियाच्या बहुतांश भागात यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता ‘साउथ एशियन क्लायमेट आउटलूक फोरम’ने (सॅसकॉफ) व्यक्त केली आहे.

...अन् पालेकरांचे नाव वगळले!

$
0
0
मतदारयादीतून नाव वगळल्याबाबत पोलिसांकडे तक्रार करणारे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे नाव वगळले गेल्याचे कारण जिल्हा प्रशासनाने शोधून काढले आहे.

एक्स्प्रेस वेवर ६ महिन्यांत CCTV

$
0
0
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सतरा आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी निविदा भरल्या असून या कामाच्या निविदा येत्या २ मे रोजी उघडण्यात येणार आहेत. निविदा मंजूर झाल्यानंतर साधारणतः सहा महिन्यांत प्रत्यक्ष काम होणार आहे.

दीडशे बसचा ‘चक्का जाम’

$
0
0
बसेसची देखभाल करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील १५० बसेस बंद अवस्थेत असल्याने ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना बसची वाट पाहाण्यासाठी घाम गाळावा लागत आहे.

वंचितांसाठीच्या शाळेपुढे ‘प्रश्नचिन्ह’?

$
0
0
फासेपारधी समाजातील वंचित मुला-मुलींसाठी अमरावती जिल्ह्यातील काही युवकांनी एकत्र येत सुरू केलेली आश्रमशाळा शासकीय मान्यता व अनुदानाअभावी अडचणीत आली आहे.

आरोग्य योजनेसाठी साडेनऊ कोटी

$
0
0
शहरातील ४२ टक्के झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना आरोग्याच्या सेवा सुविधा सहजपणे उपलब्ध करता याव्यात यासाठी केंद्र सरकारकडून पुण्यासाठी नऊ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हुंडा न दिल्याने सुनेला विष पाजणाऱ्यांना अटक

$
0
0
व्यवसाय करण्यासाठी दहा लाख रुपये दिले नाहीत आणि लग्नात मानपान केले नाही, म्हणून पत्नीला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती, सासू, सासऱ्यांला पोलिसांनी अटक केली. त्यांना २६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

कराडमधील विद्यार्थ्याला एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती

$
0
0
जीनिअस टॅलेंट सर्चतर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत कराडमधील अमरसिंह अंकुश नांगरे या विद्यार्थ्याने १ लाख ११ हजार १११ रुपयांची शिष्यवृत्ती पटकावली आहे.

कोणी घरी नेतं का घरी...

$
0
0
मानसिक आजार झाला. तो बरा देखील झाला, पण कुटुंबातील एकही व्यक्ती घरी न्यायला आली नाही की, भेटायला आली नाही. ही व्यथा आहे, येरवडा हॉस्पिटलमधील सुमारे सव्वा दोनशे व्यक्तींची. यात जवळपास १०८ महिलांचा समावेश आहे.

एकीकडे बेसुमार वापर, तर दुसरीकडे टँकरने पाणी

$
0
0
ग्रामपंचायत क्षेत्रात होणारा अनिर्बंध पाणी पुरवठा आणि बांधकामांना वापरल्या जाणाऱ्या पाण्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे दक्षिण उपनगरात उंचावरील वस्त्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सिंगल स्क्रीन ‌थिएटरचा ऑनलाइन बुकिंगला विरोध

$
0
0
राज्यातील सर्व सिंगल स्क्रीन थिएटर्सनी ऑनलाइन बुकिंग सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले असले, तरी पुण्यात बहुतांश सिंगल स्क्रीनचा त्याला विरोध असल्याचे समोर येत आहे.

झरा भागवतो ठाकरवाडीची तहान

$
0
0
आंतरराष्ट्रीय विमानतळ व एमआयडीसी सारखे मोठे प्रकल्प येऊ घातलेल्या खेड तालुक्याच्या पूर्व भागात जऊळके खुर्द गावाच्या हद्दीतील ठाकरवाडच्या ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी रात्र रात्र जागून काढावी लागत आहे. पन्नास ते साठ घरांची ही वाडी असून पिण्याच्या पाण्यासाठीचा त्यांचा संघर्ष पिढ्यानपिढ्या सुरूच आहे.

महापालिकेचा जलतरण तलाव हवा

$
0
0
हडपसर सहायक आयुक्त कार्यालया अंतर्गत परिसरात महापालिकेचा एक ही जलतरण तलाव नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत लहान मुलांना पोहायला शिवकवायचे कोठे? अशी समस्या नागरिकांपुढे आहे.

पूर्वप्राथमिक प्रवेशाच्या शुल्कावरून गोंधळ

$
0
0
बालवाडीसह पूर्वप्राथमिक वर्गांच्या प्रवेशांसाठी शुल्क आकारण्याबाबत राज्याच्या शिक्षण संचालकांनी केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळामध्ये संचालकांनीच गुरुवारी नव्याने काढलेल्या आदेशामुळे भरच पडली आहे.

भेसळयुक्त ८७७ लिटर दूध जप्त

$
0
0
ग्लुकोज पावडर, सोयाबीन तेलाच्या घट्ट मिश्रणाची भेसळ दूधात करताना दूध उत्पादक संस्थाचालकाला अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रंगेहाथ पकडले. त्या उत्पादकाला पोलिसांनी अटक केली असून ‘एफडीए’ने ८७७ लिटर दूध जप्त करून नष्ट केले.

जलतरण तलावाची आणखी किती प्रतिक्षा

$
0
0
सुतारवाडी येथील जलतरण तलावाचे काम पूर्ण करून जलतरण तलाव नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मे महिन्यापर्यंत जलतरण तलावाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

‘जेईई-मेन’च्या ओएमआर उत्तरपत्रिका आजपासून पाहता येणार

$
0
0
पेन-पेपर पद्धतीने ‘जेईई-मेन’ ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘ओएमआर आन्सर शीट’च्या स्कॅन केलेल्या प्रती शुक्रवारपासून (२५ एप्रिल) वेबसाइटवर पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे २८ एप्रिलला ‘जेईई-मेन’ची ‘आन्सर की’ जाहीर होणार आहे.

याद्या गोंधळाचा अहवाल आज

$
0
0
मतदारयादीतून नावे गायब झाल्याच्या तक्रारींप्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज (शुक्रवारी) निवडणूक आयोगास अहवाल सादर करण्यात येणार आहे. या साडेबाराशे नागरिकांपैकी शंभराहून अधिक नावे यादीत असल्याचे आढळून आले आहे, तर काही नावे पूर्वीच वगळल्याचेही समोर आले आहे.

‘सेवानिवृत्तीनंतरही आम्ही घर सोडणार नाही’

$
0
0
महापालिकेच्या मालकीची घरे मिळावीत, यासाठी हजारो कर्मचारी ‘वेटिंग’वर असताना, दुसरीकडे पालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले साठहून अधिक कर्मचारी महापालिकेचे घर सोडण्यास तयार नाहीत. यामध्ये काही ‘माननीयांचा’ही समावेश असून, महापालिकेच्याच घरात राहण्याची ‘मनीषा’ त्यांनी ठेवली आहे.

वाहतुकीचा ताण कमी होणार

$
0
0
शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रोड’च्या (एचसीएमटीआर) भूसंपादन प्रक्रियेला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images